Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सोयीच्या राजकारणाने जिल्ह्यातून हद्दपार

$
0
0
‘काँग्रेसचा पराभव काँग्रेसच करू शकते’ हे नेत्यांचे वाक्य यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नेत्यांनीच तंतोतंत खरे ठरवल्याने जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाली आहे.

यशाला धुसफुशीची किनार

$
0
0
शिवसेनेनेला या निवडणुकीत जिल्ह्यात घवघवीत सहा जागांवर यश मिळाले. दहापैकी निम्म्याहून अधिक जागा जिंकत धनुष्यबाणाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.

पाहुण्यांची सोय, सेटलमेंटचा दणका

$
0
0
नेत्यांनी पक्षापेक्षा स्वःताची पाहिलेली सोय, कार्यकर्ते लांब राहिले आणि नेत्यांनी सगेसायऱ्यांशी साधलेली जवळिकता, घराण्यातील वाद, नेत्यांनी पक्ष बाजूला ठेवून स्वार्थासाठी केलेली सेटलमेंट यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिल्हयात मोठा दणका बसला.

‘दौलत’चे धुराडे यंदा पेटणार?

$
0
0
तालुक्याची अस्मिता व जनतेचे आर्थिक वैभव असलेला हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखाना गेले तीन हंगाम बंद आहे. चौथ्या हंगामातही कारखाना बंद राहण्याची चिन्हे दिसत असताना पुणे येथील मुजावर नामक कंपनीने कारखाना चालवायला घेवून सद्यस्थितीला थकीत लाईट बिल भरले आहे.

शिवसेनेचा पॅचवर्कसाठी रास्ता रोको

$
0
0
जयसिंगपूर-शिरोळ तसेच सांगली- कोल्हापूर मार्गावर खड्डे पडल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. वाहनधारकांना या रस्त्यांवरून जाताना कसरत करावी लागत आहे.

मतलबी लोकांचा ‘स्वाभिमानी’त भरणा

$
0
0
‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शेतकऱ्यांना फारसे काही मिळणार नाही. मोठमोठी आश्वासने द्यायची आणि नंतर कारखानदारांशी जुळवून घ्यायचे, असा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे ‘स्वाभिमानी’ हे कारखानदारांचे अपत्य आहे,’ असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला.

शेतकऱ्यांना दर, कारखान्यांना पॅकेज

$
0
0
बाजारातील साखरेचा दर, आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेच्या किंमती, होणारी निर्यात आणि राज्य बँक देणार असलेले कर्ज यावर यावर्षी उसाला किती दर मिळणार हे अवलंबून असणार आहे.

दिवाळीत सव्वासात कोटींचे उत्पन्न

$
0
0
दिवाळी म्हणजे अनेकांच्या मूळ गावी जाण्याचा, सुटी म्हणून भटकंतीला जाण्याचा हंगाम होय. दिवाळीतील वाढत्या प्रवासाचा फायदा राज्य परिवहन महामंडळाला चांगलाच झाला आहे.

हिरकणी कक्षाबाबत संभ्रम

$
0
0
लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या स्तनदा मातांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने मध्यवर्ती बसस्थानक परिसरात हिरकणी कक्ष सुविधा दिली असली तरी गरजेनुसार महिलांना या कक्षाची मागणी करण्याची सूचना दर्शवणारा फलकच कक्षावर नसल्याने महिलांकडून हिरकणी कक्षाचा वापर होत नसल्याचे चित्र आहे.

यंदाचा आराखडा २१५ कोटींचा

$
0
0
जिल्हा नियोजन मंडळाला जिल्ह्याच्या वार्षिक योजनेसाठी मिळालेले १९० कोटी रुपये विविध विकासकामांसाठी खर्च झाले आहेत. यामध्ये ४० कोटी रुपये रस्त्यांच्या बांधणीसाठी खर्च करण्यात आले आहेत.

महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल

$
0
0
‘कोल्हापूर शहर शिवसेनेचे असल्याचे आपण आमदारकीच्या विजयानंतर सिद्ध केले आहे. शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महापालिकेत शिवसेनेची सत्ता असणे महत्त्वाचे आहे.

तत्वज्ञान खोटे ठरवण्याचं षङ्यंत्र

$
0
0
‘वैचारिक संपर्क, वैचारिक आंदोलन नसल्याने बहुजन समाज पक्षाला निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. बहुजन समाजाला तारणारे शब्द आणि तत्त्वज्ञान खोटे ठरविण्याचे षङ्यंत्र जातीयवादी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांकडून केले जात आहे.

‘सीपीआर’ डेंगी, मलेरियाचे आगर

$
0
0
गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांचा आधार म्हणून ओळख असलेले छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल डेंगी व मलेरियाचे आगर बनले आहे. हातभर वाढलेले तण, गटारींमध्ये तुंबलेले दुर्गंधीयुक्त सांडपाणी, परिणामी डासांची पैदास, शौचालयाच्या व्हेंट पाइपवर नसलेली नायलॉन जाळी, पिण्याच्या पाण्यासाठी रुग्णांची पायपीट आणि गळक्या पाइपमधून मिळणाऱ्या पाण्यावर शौचालय व बाथरूममधील स्वच्छतेवर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दिवस ढकलावे लागत आहेत.

पंजे झाले दर्शनासाठी खुले

$
0
0
हिंदू मुस्लिटम ऐक्याची परंपरा असलेल्या मोहरम सणानिमित्त शहरातील तालमी, मंडळे व दर्ग्यामध्ये पंजाची प्रतिष्ठापना झाली आहे. बाबूजमाल तालमीचा नाल्या हैदरची पहिल्या दिवशी प्रतिष्ठापना झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी शहरातील अनेक ठिकाणी प्रतिष्ठापना झाली आहे.

पीआरएन हाच परीक्षा क्रमांक

$
0
0
शिवाजी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या निकालातील गोंधळ, उशिरा निकाल आणि विद्यार्थ्यांचा मनःस्ताप वाचविण्यासाठी यापुढील सर्व परीक्षांसाठी पीआरएन क्रमांक हाच परीक्षा क्रमांक राहणार आहे.

विचित्र हवामानाने बिघडले आरोग्य

$
0
0
ऑक्टोबरच्या उत्तरार्धातही सुरू असलेली रिपरिप, मध्येच उन्हाचा तडाखा आणि झोंबणारी थंडी अशा वातावरणातील बदलांमुळे शहरवासीयांचे आरोग्य बिघडले आहे. सर्दी, खोकल्याबरोबर थंडीसह येणारा ताप अशा लक्षणांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

मोहरमला एकतेची किनार

$
0
0
कोल्हापूर शहरात आणि जिल्ह्यात मोहरम धार्मिक वातारवणात होतो. हिंदू आणि मुस्लिम भाविकांचा एकत्रित सहभाग कोल्हापुरातील मोहरमचे वैशिष्ट्य बनले आहे. कोल्हापुरातील मोहरमला किमान २०० ते ३०० वर्षांपेक्षा जुनी परंपरा आहे, असे जाणकारांचे मत आहे.

२८ भाग्यवान विजेते जाहीर

$
0
0
‘मटा ‌बिग रिवॉर्ड’ योजनेतील तिसरा साप्ताहिक लकी ड्रॉ गुरुवारी दुपारी महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयात काढण्यात आला. या ड्रॉमधून २८ भाग्यवान विजेते निवडण्यात आले. विजेत्यांना आकर्षक रकमेची गिफ्ट व्हाउचर मिळणार आहेत.

अंध युवकांची सीमेवर दिवाळी

$
0
0
कधीकधी संकटकाळात खांद्यावर ठेवला जाणारा हात आधार देऊन जातो. समोर आव्हानांचा पाऊस कोसळत असताना ती आव्हाने पेलण्याचा आत्मविश्वास देणारा शब्द हजार हत्तींचे बळ देतो. लढणारा तर शौर्याचा पर्वत असतोच, पण त्याला मानसिक ताकद देणारा पर्वताचा पाया बनू शकतो.

योग्य ऊसदराचे औत्सुक्य

$
0
0
शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये आणि सहकारी साखर कारखानदारी वाचली पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न असेल असे खासदार राजू शेट्टी सांगत असले तरी देखील शेतकऱ्यांनी उसाच्या उत्पादनासाठी जो खर्च केला आहे, तो त्यांना मिळणार किंवा नाही असा प्रश्न आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images