Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कारखान्यांपुढे आव्हान दराचे

0
0
विधानसभा निवडणुकांची धामधूम संपली आणि सहकारी संस्थांच्या वारे वाहू लागले आहे. त्यातच ऊस दरासाठी रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांना चांगला दर मिळवून देणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १ नोव्हेंबरला जयसिंगपूर येथे ऊस परिषद आयोजित केली आहे.

दीड महिन्यापासून ड्रेनेजचे काम सुरू

0
0
बसंत-बहार मार्गावरील हॉटेल त्रिवेणी येथे ड्रेनेजचे काम गेल्या दीड महिन्यापासून सुरू आहे. स्टेशन रोडवरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येण्यासाठी हा मुख्य मार्ग आहे. यामुळे या मार्गावर वाहनधारकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र, महापालिकेतर्फे टाकण्यात येत असलेले ड्रेनेजच्या पाइप टाकण्याचे काम कासवगतीने सुरू आहे.

आरोपींचा तत्काळ शोध घ्या

0
0
पाथर्डी (जि. अहमदनगर) येथील जवखेडे खालसा येथे घडलेल्या तिहेरी दलित हत्याकांडातील आरोपींची नावे जाहीर होऊनही अद्याप त्यांच्यावर कारवाई झाली नाही. घटनेला आठवडा उलटूनही आरोपींना ताब्यात घेतले जात नाहीत.

आश्वासनानंतर शाळा कृती समितीचे आंदोलन मागे

0
0
शिक्षण संस्थाचालक शिक्षकांना सेवेत रुजू करण्यासाठी लाखो रुपयांची मागणी करतात, शिक्षण विभागाची शिक्षण संस्थाचालकांना सहकार्याची भूमिका आहे, त्या धोरणाचा विरोधात महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती समितीने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर मंगळवारी निदर्शने केली. संबंधित शाळांची चौकशीचे आश्वासन मिळाल्याने समितीने बेमुदत आंदोलन मागे घेतले.

सीपीआरमध्ये लवकरच सी. टी. स्कॅन मशीन

0
0
सीपीआरमध्ये अनेक सुविधांची कमतरता आहे. त्याबरोबरच सी. टी. स्कॅन मशीन बंद पडल्याने नवीन मशीनची गरज असल्याची मागणी वारंवार सीपीआर कृती समितीने केली होती. यासाठी पाठपुरावा करून सीपीआरला सी. टी. स्कॅन मशीन खरेदी करण्याची परवानगी मिळवून दिल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. सीपीआरच्या इतरही समस्या लवकरच मार्गी लावू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यंत्रणा अद्ययावत, पण सुरू कधी?

0
0
कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यांतील रुग्णांना मोठा आधारवड असलेले सीपीआर रुग्णालय नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते. खासगी दवाखान्यांची अव्वाच्या सव्वा महागडे उपचार परवडत नसल्याने सीपीआरमध्ये गर्दी कायम दिसत असली तरी पर्याय नसल्याने येथे रुग्ण येतात असे वाटण्याजोगा प्रकार येथे आहे. महत्त्वाच्या मशिनरी बंद असतानाही रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दूरशिक्षण विभागात पुन्हा सावळा गोंधळ

0
0
हॉल तिकीट मिळत नाही, चुकीचे विषय आणि अभ्यासक्रमाची पुस्तके मिळत नसल्याच्या कारणावरून शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागात काही विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. सुमारे शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी दूरशिक्षण विभागाच्या कारभारावर आरोप केल्याने काही वेळ वातावरण तणावपूर्ण बनले. अखेर चुकांची दुरुस्ती करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने विद्यार्थी शांत झाले.

टोलच्या पर्यायी मार्गांसाठी निधी देऊ

0
0
राज्यपातळीवर विधानसभा स्वबळावर लढण्याचा निर्णय ऐनवेळी घेण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांत सक्षम उमेदवार देता आले नाहीत. यामुळे काही ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला.

कोंडके आणि चित्रपट महामंडळाच्या वादात अध्यक्षपद अधांतरी

0
0
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने अध्यक्ष विजय कोंडके यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करून न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळल्याने महामंडळाचे अध्यक्षपद वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. कोंडके यांची अडीच वर्षाची मुदत संपली असून विजय पाटकर यांचा कार्यकाल सुरू होऊनही अध्यक्षपदावर अद्याप पाटकर यांचे नाव नाही.

भ्रष्टाचारमुक्तीची शपथ कागदावरच

0
0
भ्रष्टाचार रोखण्यासाठी आरटीओ कार्यालयात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचारमुक्तीची शपथ घेतली खरी. मात्र, आरटीओ कार्यालयात ती कागदावर राहिली आहे. काम फास्ट करून देण्यासाठी एजंटांची फळी आणि कार्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांची साथ कायम असल्याचे दिसून आले. कामानिमित्त येणाऱ्यांची आर्थिक पिळवणूक मात्र कार्यालयात सुरूच असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

रोबो बनविण्यात बालचमू दंग

0
0
मुलांनी रोबोचे अनेक सिनेमे पाहिले, रिमोटवरील रोबो फिरविण्याचा अनुभवही घेतला, पण विनारिमोट रोबो कसा जातो आणि तो कसा तयार होतो याचे कौशल्य मुलांना आत्मसात करण्याची संधी मंगळवारी मिळाली. निमित्त होते अरण्यानंद प्रतिष्ठान, महाराष्ट्र टाइम्स आणि डॉल्फिन लॅबच्यावतीने ‘चला, रोबो बनवायला शिकूया’ या कार्यशाळेचे.

सतेज पाटलांविरोधातील तक्रारीचा तपास करा

0
0
माजी महापौर नंदकुमार वळंजू यांनी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीचा तपास करावा, असा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्याला दिले आहेत, अशी माहिती अॅड. शिवाजीराव राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

पक्के लायसन्सही ऑनलाइन

0
0
ऑनलाइन लर्निंग लायसन्सपाठोपाठ आता परमंट लायसन्सही ऑनलाइन करण्याचा विचार कोल्हापूर आरटीओ कार्यालयाचा सुरू आहे. दोन्ही लायसन्स ऑनलाइन झाल्यास काउंटरवरील गर्दी आणि वाहनधारकांची एजंटांकडून होणारी आर्थिक पिळवणूक थांबण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे येथील आरटीओ कार्यालयांमध्ये धर्तीवर ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याच धर्तीवर आता कोल्हापुरातही २०१५मध्ये परमंट लायसन्स ऑनलाइन करण्यात येणार आहे.

टोलनाक्याची रात्रीत उभारणी

0
0
कळंबा ग्रामस्थांनी सोमवारी आंदोलन करून टोलनाका हटवला. सुरुवातीला तणाव निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी टोलनाक्याचे साहित्य पोलिस मुख्यालयात पोहोचविले. त्यामुळे येथे टोलनाका त्वरीत उभारला जाणार नाही असा अंदाज होता.

ऐक्याची परंपरा

0
0
जिथे हिंदूमुस्लिम समाजातील दरी दूर होऊन धार्मिक सलोख्याचे नाते सुरू होते अशा मोहरम सणाच्या निमित्ताने शहरातील तालमींमध्ये, दर्ग्यामध्ये विविध पंजांच्या प्रतिष्ठापना करण्यास सुरूवात झाली आहे. पंजांची ही परंपरा कोल्हापुरात दीडशे वर्षापासून जपली जातेय.

वाजले निम्मेच फटाके!

0
0
गेली काही वर्षे वेगवेगळ्या कारणांमुळे दिवाळीत होत असलेल्या फटाक्यांचा खप यंदा निम्म्यावर आल्याचे स्पष्ट झाले आहे. गेली काही वर्षे फटाक्यांच्या खपात सातत्याने घट होत आहे. गेल्या पाच वर्षांचा विचार करता यंदा तर ५० टक्के घट झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

जोतिबा-पावनगड रोप-वे

0
0
राज्य पर्यावरण प्राधिकरणाने जोतिबा ते पावनगड या प्रस्तावित रोप-वेला मंजुरी दिली आहे. पर्यावरण विषयक आणि कचरा या दोन महत्त्वाच्या अटींची पूर्तता करण्याचे निर्देश तात्यासाहेब कोरे सहकारी दूध साखर वाहतूक संस्थेला देण्यात आले आहेत. त्यामुळे पन्हाळगडाच्या परिसराच्या डोंगरकपारीचे हवाई दर्शन करण्याचा अनुभव आता घेता येणार आहे.

हत्तींचा फेरा कायम

0
0
पावसाळ्यातील काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर आजरा तालुक्यात पुन्हा एकदा हत्तींचा उच्छाद सुरू झाला आहे. सलग पाचव्या वर्षी हत्तींचा फेरा आजऱ्यात कायम राहिला आहे.

भाजपच्या टेकूनंतरही पदरी अपयश

0
0
सहकारी साखर कारखानदारीचे जाळे असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात उसदर आंदोलनामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रत्येक मतदारसंघात आपली ताकद निर्माण केली आहे.

मोदी लाटेनंतरही खुंटले यश

0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीची लाट, सोबतीला महाडिक गटाची ताकद, स्वाभिमानीने निर्माण केलेली हवा, नरेंद्र मोदींची सभा या सर्व गोष्टी जुळून आल्या तरीही भाजपाला कोल्हापूर जिल्ह्यातील पाचपैकी फक्त दोन जागा मिळाल्या.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images