Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मी फोटोत कसा दिसणार?

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केल्यानंतर विविध सरकारी कार्यालयांनी स्वच्छतेसाठी प्रयत्न चालू केले. त्यामध्ये स्वतःच्या टेबलवर थोडी जरी धूळ असल्यास ती स्वतः साफ न करता त्यासाठी शिपायांना बोलवणाऱ्या अधिकाऱ्यांनी हातात झाडू घेतले.

कोल्हापूरकर गारठले

$
0
0
ऑक्टोबर हिट संपण्याच्या आणि गुलाबी थंडी सुरू होण्याच्या उंबरठ्यावर ऐन पाडव्यादिवशी अवेळी आलेल्या पावसाने ‘नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी...’ या कवयित्री इंदिरा संत यांच्या कवितेतील ओळी अनुभवण्याची वेळ आणली आहे.

राष्ट्रवादीत सुंदोपसुंदी सुरु

$
0
0
विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षांतर्गत हालचाली वेगावल्या आहेत. खासदार धनंजय महाडिक यांनी मदत न केल्याचा आरोप पक्षाचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी केला आहे. त्यानंतर पक्षाचे कार्याध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांनी मतदारसंघातील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन पदाचा राजीनामा दिला.

तरुणाचा डेंगीने मृत्यू

$
0
0
शिवाजी पेठ फिरंगाई तालीम परिसरातील सागर उर्फ राजू दिलीप माने (वय २९) या युवकाचा डेंगीने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. माने याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. २१ ऑक्टोबरला ताप आल्यावर सागरने फॅमिली डॉक्टरांकडे औषध घेतले.

वादळी पावसाचा दणका

$
0
0
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसाने जिल्ह्यात भात, सोयाबीन व भुईमुगाचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी ऊसपिक सुध्दा जमीनदोस्त झाले आहे.

कळंबा टोलनाका अखेर हटवला

$
0
0
आयआरबीचा कळंबा हद्दीतील टोलनाका अखेर रविवारी हटविण्यात आला. नाका हटविण्यासाठी गेली वर्षभर आंदोलन सुरू होते. त्यासाठी ग्रामपंचायतीने आयआरबी, महापालिका आणि रस्ते विकास महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

टाइम टू स्टडी यार!

$
0
0
लाडक्या गणरायाला निरोप देतो तोच नवरात्रोत्सव आला. त्याच धामधुमीतच विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली. लगेच मतदानाचा महाउत्सव संपला तोच दिवाळी आली. आता दीपोत्सव संपला असून, या साऱ्या उत्सवात मनापासून सहभागी होणारे महाविद्यालयीन विद्यार्थी खडबडून जागे झाले आहेत. त्याला कारणही तसेच आहे.

पार्किंग बनले कचरा कोंडाळा

$
0
0
कपिलतीर्थ मंडईत भाजी खरेदी करायला जाताना ग्राहकांना नाकाला रुमाल लावूनच जावे लागत आहे. दुचाकी पार्किंगसह मंडईतील अस्वच्छतेमुळे ग्राहकांचा मनःस्ताप आणखी वाढला आहे.

‘विश्वास आणि विकासाचे राजकारण करणार’

$
0
0
‘सत्तेच्या मस्तीत जनतेला कस्पटाची वागणूक देणाऱ्या आणि मतांसाठी विकासकामांशिवायपैशाची खिरापत वाटणाऱ्यांना स्वाभिमानी आजरेकरांनी घरी बसविले. आशा-अपेक्षांची खात्री देऊ शकणाऱ्या उमेदवारामागे कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदार राहतात, हे या निवडणुकीने शिकविले.

गडहिंग्लजमध्ये ‘गृह उत्सव’ला प्रारंभ

$
0
0
‘गडहिंग्लज शहराचा विकास वेगाने होत आहे. बदलत्या काळात गडहिंग्लजचा विचार करता नागरिकांना घरांविषयी मार्गदर्शन मिळणे ही आवश्यक बाब आहे,’ असे प्रतिपादन आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी केले.

विजयाची गुढी

$
0
0
‘नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत गोरगरीबांनीच माझ्या विजयाची ऐतिहासिक गुढी उभारली,’ असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.मुश्रीफ यांच्या विजयासाठी म्हाकवे येथील रामा अंतू कांबळे यांनी गुढी उभारली होती.

यंदा लढा स्वकीयांशी

$
0
0
विधानसभेच्या निवडणुका संपल्या, दिवाळी झाली आता शेतकऱ्यांना ऊसाला काय दर मिळणार याची चिंता लागली आहे. शेतकरी संघटनांचे आंदोलन, सरकारने नेमलेली समिती आणि साखर कारखानदार यांच्या भूमिकांवर शेतकऱ्यांच्या ऊसाला काय दर मिळणार हे स्पष्ट होणार आहे.

जयसिंगपुरात आरपीआयचा मोर्चा

$
0
0
अहमदनगर जिल्ह्यातील मौजे जवखेड खालसा येथे झालेल्या दलित हत्याकांडाची चौकशी व्हावी तसेच आरोपींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी आरपीआय आठवले गटाच्यावतीने जयसिंगपूर येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

घोरपडे कारखान्याच्या हंगामास मनाई कायम

$
0
0
कागल तालुक्यातील बेलेवाडी काळम्मा येथील सरसेनापती संताजी घोरपडे खासगी साखर कारखान्यास हंगाम सुरू करण्याची मनाई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.

कंपनीची ४७ लाखांची फसवणूक

$
0
0
आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील दाम्पत्याने कापड खरेदी व्यवहारात येथील अरविंद कॉटसीन (इंडिया) लिमिटेड कंपनीची ४७ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी तपास करुन अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

५७८ शाळा निकषांत अव्वल

$
0
0
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आरटीई कायद्यानुसार सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ५७८ शाळांनी दहा निकष पूर्ण करण्यात आघाडी घेतली आहे.

लाचखोरीत पोलिस, महसूल अव्वल

$
0
0
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या १० महिन्यांत २५ कारवाया केल्या असून, लाच घेण्यात महसूल विभाग व पोलिस खात्यातील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. २५ कारवायांपैकी पोलिस खात्यातील सात, तर महसूल खात्यातील सहाजणांचा समावेश आहे. लाच घेण्यात तहसीलदार व पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.

‘आयसीएआय’ने बनविले अकाउंटन्सीचे म्युझियम

$
0
0
कोणत्याही व्यवसायाचा कणा म्हणजे अकाउंटन्सी (हिशेब) होय. व्यवसायाचा विस्तार, पुढील दिशा, गती जर नीट ठेवायची असेल तर हिशेब उत्तम असला पाहिजे. पण हिशेबाची पद्धती आली कोठून, ती कशी सुरू झाली, त्याचा विकास कसा झाला हे समजून देण्याचा प्रयत्न द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या वेस्टर्न इंडिया रिजनच्या कोल्हापूर शाखेने केला आहे.

अतिरिक्त शिक्षक-शिक्षकेतरांना दिलासा

$
0
0
अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत नागपूर खंडपीठाने स्थगिती आदेश दिला आहे. त्यामुळे राज्यातील शाळांनी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांना देऊ नये. खंडपीठाच्या या निर्णयामुळे अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविले जाणार नसल्याने दिलासा मिळाला आहे.

रोजंदारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

$
0
0
रोजंदारी कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाची अमंलबजावणी करुन कर्मचाऱ्यांनी कमी करण्याची मागणी काही सदस्यांनी केली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images