Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

नव्या तंत्राने होतोय हायटेक प्रचार

0
0
सोशल मीडियाच्या नव्या तंत्रज्ञानाने निवडणूक प्रचाराचे तंत्र बदलून टाकले आहे. आता जाहीर सभांसाठी सर्वच नेते उपलब्ध होतील, अशीही परिस्थिती नसल्याने थ्रीडी यंत्रणेचा वापर करून उपस्थित नसलेल्या वेगवेगळ्या नेत्यांची भाषणे चौकाचौकांत होऊ लागली आहेत.

सरकारी महिला कर्मचाऱ्यांची तारांबळ

0
0
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आणि दिवाळी यात केवळ दोनच दिवसांचा अवधी असल्यामुळे निवडणूक ड्युटीवर असलेल्या महिला कर्मचाऱ्यांची घर आणि नोकरी यामध्ये समतोल साधण्यासाठी तारांबळ उडणार आहे.

कचऱ्याप्रश्नी प्रतिज्ञापत्र द्या

0
0
राष्ट्रीय हरित लवादने प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाला कोल्हापूर महापालिकेतर्फे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायहयोजनासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

मत कोणाला द्यायचे?

0
0
आईचे मत कोणाला, बाबांचे मत कोणाला...या शब्दांत काही वर्षापूर्वी उमेदवार प्रचार केला जात होता. उमेदवार आणि पक्षांची संख्या कमी असल्याने त्यावेळी उमेदवारांच्या यशअपयशाचे अंदाज सहज बांधता येण्यासारखे होते.

भाजपला धास्ती शिवसेनेची

0
0
​मिरज विधानसभा मतदारसंघात पंचरंगी लढत होत असल्याने चुरस निर्माण झाली आहे. मतदारसंघात राष्ट्रवादीचे बाळासाहेब होनमोरे, काँग्रेसचे प्रा. सिध्दार्थ जाधव, भाजपचे सुरेश खाडे, शिवसेनेचे तानाजी सातपुते यांच्यासह काँग्रेसचे बंडखोर अॅड. सी. आर. सांगलीकर हे अपक्ष उमेदवार मैदानात आहेत.

डॉ. जब्बार पटेलांना गौरव पदक

0
0
ख्यातनाम दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना यंदाचे विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर झाले आहे. मराठी रंगभूमी दिनादिवशी, ५ नोव्हेंबरला मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरव पदक समारंभपूर्वक प्रदान केले जाईल, अशी माहिती अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी दिली. गौरव पदक, स्मृतिचिन्ह आणि ११ हजार रुपये रोख असे पुरस्कारचे स्वरुप आहे.

रणधुमाळी आज संपणार

0
0
रविवारची सुट्टी, पावसाने दिलेल्या दिलाशामुळे कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या उत्साहाचा उमेदवारांनी चांगलाच फायदा करुन घेतला. निवडणुकीचा प्रचार सोमवारी संपणार असला प्रचारातील शेवटचा सुटीचा दिवस असल्याने उमेदवारांनी सकाळपासूनच रॅली काढून पूर्ण मतदारसंघ पालथा घातला.

'राज्याला संपविण्याचे राजकारण'

0
0
वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असलेल्या इचलकरंजीला आदर्श शहर निर्माण करण्यासाठी देशातील वस्त्रोद्योगातील मॉडेल सिटी बनविण्यात येईल. काँग्रेसला राज्याची एकहाती सत्ता दिल्यास पारदर्शी व गतीमान सरकार काय असते ते दाखवून देऊ असा विश्वास व्यक्त करताना नरेंद्र मोदी व अमित शहा यांचे महाराष्ट्राला संपविण्याचे छुपे राजकारण सुरु आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे रविवारी केला.

मोदींचा कराड दौरा रद्द

0
0
‘मी पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री म्हणून अनेक वर्षे कामकाज पाहिले आहे. त्यामुळे पंतप्रधान कोठे जातात व कोठे जात नाहीत, या बाबत माझा अनुभव जास्त आहे. कराड दक्षिण मतदारसंघातील आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार नसल्याची खात्री झाल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कराडचा दौरा रद्द केला असावा,’ असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी प्रचाराच्या सांगता सभेत केला.

राष्ट्रवादीच्या नेत्याची हत्या

0
0
दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुरुनाथ कटारे यांची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली आहे. सोमवारी रात्री उशिरा झालेल्या घटनेनंतर दक्षिण सोलापूरात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, हा हल्ला कोणी केला याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

मोदी कराडला का आले नाहीत?

0
0
‘मोदी कराडला का आले नाहीत? मी पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री म्हणून अनेक वर्षे कामकाज पाहिले आहे. त्यामुळे पंतप्रधान कोठे जातात व कोठे जात नाहीत, या बाबत माझा अनुभव जास्त आहे.

फोडाफोडीला वेग

0
0
जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात तुल्यबळ लढती होत आहेत. कोणत्याही स्थिती विजय मिळवण्यासाठी सर्वच उमेदवार शक्कल लढवत आहेत. पाच पन्नास मतांचा गठ्ठाही निकाल फिरवू शकतो, अशी शक्यता असल्याने विरोधी गटांच्या कार्यकर्त्यांना आपल्या जाळ्यात खेचण्यासाठी चढाओढ लागली आहे.

मतदानासाठी यंत्रणा सज्ज

0
0
जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदासंघांमध्ये बुधवारी (दि. १५) होणाऱ्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान साहित्य आणि निवडणूक कर्मचारी केंद्रांकडे रवाना झाले आहे. आतापर्यंत आचारसंहिता भंगाचे २८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टोल याचिकांचा आज निकाल

0
0
आयआरबी कंपनीने रस्ते विकास प्रकल्पांर्गत तयार केलेली रस्ते आणि टोल वसुलीला हायकोर्टात दिलेल्या सर्व आव्हान याचिकांचा निकाल मंगळवार (ता. १४) आहे.

पडद्याआडच्या हालचालींना वेग

0
0
मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा, सार्वजनिक मंडळे, बचत गटांचे पॅकेज अन्यत्र वळू नये यासाठी लावलेली फिल्डींग, मते फिक्स करण्यासाठी हात सैल सोडून मतदारसंघ पालथे घालणारे समर्थक-कार्यकर्ते आणि अपडेटस जाणून यंत्रणा सक्रिय करणारी नेते मंडळी अशा पडद्याआडच्या हालचालींना सोमवारी संध्याकाळपासून वेग आला.

पैशाचा पाऊस

0
0
विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे दोन दिवस उरले असताना सोमवारी संध्याकाळपर्यंत आचारसंहिता पथकाने सोमवारी २ कोटी ३० लाख रुपये जप्त केले. हे बेकायदेशीररित्या हे पैसे नेले जात असल्याचे स्पष्ट आहे. केडीसीसी बँक व बँक ऑफ इंडियाच्या प्रत्येकी एक कोटी रुपयांचा यामध्ये समावेश आहे.

शिरोली नाक्यावर रास्ता रोको

0
0
टोल वसुलीला आव्हान देणाऱ्या तीनही याचिका हायकोर्टाने फेटाळल्या असल्या तरी कृती समितीचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा देत कार्यकर्त्यांनी शिरोली नाका येथे संध्याकाळी रास्ता रोको केला.

टोलचा न्याय नव्हे, निवाडा झाला

0
0
कोल्हापूरच्या रस्ते विकास प्रकल्पाच्या टोल आकारणी प्रकरणी हायकोर्टाकडून निर्भीड न्यायाची अपेक्षा होती. मात्र, कोर्टाने जनेतला न्याय देण्याऐवजी प्रकरणाचा निवाडा करत कोल्हापूरकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापेक्षा जनतेचे न्यायालय मोठे आहे. जनता सार्वभौम असून जनतेच्या पाठबळावर टोल विरोधातील आंदोलन चालूच राहील’, असे आवाहन टोल विरोधी कृती समितीचे नेते, प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी केले.

कार्यकर्त्यांनी जागविली रात्र

0
0
जीव ओतून प्रचार केला असला तरी शेवटच्या दिवशी मतदारराजाची मर्जी राखण्यासाठी कार्यकर्त्यांनी दिवसरात्र एक केला. जाहीर प्रचार संपला तरी पाहुणे, मित्र मंडळी, व्यवसाय, नोकरी अशा विविध माध्यमातून त्या त्या मतदारांपर्यंत पोहचून आपापले चिन्ह ठसवण्यासाठी उमेदवारांची यंत्रणा राबत होती.

पैसे वाटले; माजी नगरसेवकास अटक

0
0
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे उमेदवार हसन मुश्रीफ यांना मतदान करा, असे आवाहन करीत पैसे वाटप करत असल्याच्या संशयावरून माजी नगरसेवक राजेंद्र तारळे यांना अटक करण्यात आली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images