Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘लक्ष्मी’ला नाकारू नका!

$
0
0
निवडणुकांच्या प्रक्रियेवर पैशांचा प्रभाव पडू नये, यासाठी निवडणूक आयोगाचे कसोशीचे प्रयत्न सुरू असताना केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी रविवारी प्रचारादरम्यान केलेल्या वक्तव्याने वादंग निर्माण झाला.

शिवसेनेविरोधात बोलणार नाही

$
0
0
शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा काडीमोड झाल्यानंतर परवापर्यंत सेनेच्या गळ्यात गळा घालणारे भाजप सेनेबाबत काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण सेनेविरुद्ध चकार शब्दही काढणार नसल्याचे स्पष्ट करून सेनेविरुद्धची तलवारच म्यान केली आहे!

मनसेच्या उमेदवारावर बलात्काराचा गुन्हा दाखल

$
0
0
तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सुधाकर खाडे यांच्यावर जातीवाचक शिविगाळ व बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

दंगलीमुळे पराभवाची नामुष्की

$
0
0
मिरज दंगलीचे जातीय भांडवल करून जातीयवाद्यांनी भावनिक प्रचार करून माझा पराभव केला. मात्र, याचा विकास कामांवर किती वाईट परिणाम झाला हे संपूर्ण मतदारसंघाने अनुभवले आहे.

महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्यांना धडा शिकवा

$
0
0
महाराष्ट्राचे तुकडे पाडू पाहणाऱ्या भारती जनता पक्षाला विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा, असे आवाहन शरद पवार यांनी केले. जत येथील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांच्या प्रचारार्थ रविवारी आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

काँग्रेस, राष्ट्रवादीला पिटाळून लावा

$
0
0
‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष दोन आहेत. पण, ते एकाच विचाराचे आहेत. पाणी योजना, शहीद जवानांच्या विधवांची घरे लुटणारे, सरकारी तिजोरीवर डल्ला मारणाऱ्यांना आता पिटाळून लावून, स्पष्ट बहुमताची सत्ता भाजपला द्या आणि महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर सोपवा,’ असे जाहीर आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी तासगाव येथील जाहीर सभेत केले.

सोशल नेटवर्किंग आचारसंहितेच्या कक्षेत नाही

$
0
0
सर्व मतदारांना घरपोच मतदारस्लीप पोहच केली जाणार आहे. आचारसंहितेच्या अंमलबजावणी अंतर्गत भरारी पथकांकडून कारवाया केल्या जात आहेत. नागरिकांना आक्षेपार्ह प्रकार आढळल्यास प्रशासनाला त्वरीत माहिती द्यावी.

निवडणुका महाराष्ट्रात; जेवणावळी कर्नाटकात

$
0
0
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहीलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात खानावळी आणि जेवणावळीसाठी नामी शक्कल शोधण्यात आली आहे. आचारसंहितेचा बडगा चुकवण्यासाठी चक्क सीमाभागातील निपाणी आणि परिसरातील गावांचा मोठ्या प्रमाणावर वापर होवू लागला आहे.

‘कंपन्यांतील भ्रष्टाचार कळवा’

$
0
0
‘कंपनीज अॅक्टमधील बदलांनुसार चार्टर्ड अकौंटंटना खासगी तसेच सार्वजनिक कंपन्यात होत असलेले भ्रष्टाचार कंपनी अफेअर्स ‌मंत्रालयांना कळवणे बंधनकारक आहे. त्यासंदर्भात नियमावली बनवण्यात येत आहेत,’ अशी माहिती द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष मनोज फडणीस यांनी दिली.

दारातच भरा घरफाळा

$
0
0
घरफाळ्याची रक्कम आपापल्या अपार्टमेंट, गृहसंकुले, सोसायटी, गृहनिर्माण संस्थांच्या ठिकाणीच नागरिकांना भरण्याची सुविधा देण्याचे प्रयत्न महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाने चालवले आहेत.

सुटीतला प्रचार जोरात

$
0
0
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात उडाली आहे. प्रत्येक उमेदवार आपली आणि पक्षाची भूमिका मतदारांपर्यंत पोहचवण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत आहेत. यामध्ये आलेल्या गुरुवारपासून सुटी सुरु झाल्याने ते सोमवारपर्यंत प्रचाराचा धुरळा उडाला आहे.

आघाडी सरकार वाहून जाईल

$
0
0
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर शेतकरी हिताचे निर्णय घेतले. आघाडी सरकार म्हणजे महाराष्ट्राला लागलेले ग्रहण होते. टोलमाफिया, वाळूमाफियांच्या दहशतीवर हे राज्य चालविले जाते. आता बदलाची वेळ आली आहे. निवडणुकीत आघाडी सरकार जनलाटेत वाहून जाईल, असा इशारा भाजपच्या उमेदवारांनी दिला.

शहरभर मोदी फीव्हर

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाषण ऐकण्यासाठी शहरातही प्रचंड उत्सुकता होती. सभास्थळावरील गर्दीत जाण्यापेक्षा अनेकांनी घरी टीव्हीवरच मोदींचे भाषण ऐकले. काही ठिकाणी दुकाने बंद राहिली तर काही दुकानांत टीव्हीवरच सभा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसत होती.

‘सतेज’ मतांवर राष्ट्रवादीचा डोळा

$
0
0
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या मताच्या पॉकेटवर राष्ट्रवादी काँग्रेसने डोळा ठेवला आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या मतांच्या बदल्यात शहरातील पाटील गटाने राष्ट्रवादीला मदत करावी, अशी फिल्डिंग लावण्यात आली आहे.

मोदींनी उद्योग पळवले

$
0
0
‘नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेत आहेत. त्यामुळे आमचे लाखो तरुण बेरोजगार होणार आहेत. मोदी नेमके देशाचे पंतप्रधान आहेत की, गुजरातचे ?’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केली.

काँग्रेस-राष्ट्रवादीमुक्त करा

$
0
0
पंधरा वर्षांत आघाडी सरकारने महाराष्ट्राची वाट लावली, राज्य खड्ड्यात घातले. यातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस व राष्ट्रवादीमुक्त करा, भाजपला पूर्ण बहुमत द्या, अशी साद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे तपोवन मैदानावर झालेल्या विराट सभेत घातली.

मतविभागणीचा फायदा पतंगरावांना

$
0
0
भिलवडी-वांगी असे पूर्वाश्रमीचे नाव असलेला मतदारसंघ पुनर्रचनेनंतर पलूस-कडेगाव बनला. आधीचा दुष्काळी परंतु अलीकडे ताकारी व टेंभू योजनांच्या माध्यमातून सुपीक बनलेला कडेगाव तालुका आणि कृष्णाकाठचा पलूस तालुका अशा दोन तालुक्यांचा मिळून हा मतदारसंघ बनला आहे.

सौभाग्यवतींनी घेतली प्रचारात आघाडी

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला आहे. आपल्या पतीला विधानसभेत पाठविण्यासाठी सौभाग्यवतींनीही प्रचारात आघाडी घेतली आहे. छोटे मेळावे, बचतगटांच्या महिलांशी चर्चा, पदयात्रा यातून सहभाग नोंदवत आहेत. त्यांच्यासोबत घरातील पाहुणे मंडळीही सहभागी होत असल्याने प्रत्येक मतदारसंघात चुरस वाढल्याचे चित्र आहे.

कोजागरीचे निमित्त साधून जेवणावळी

$
0
0
निवडणूक आचारसंहितेत नियमावलींची कितीही बंधने घातली तरी मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार हात सैल सोडत आहेत.

विरोधकांनी निवडणूक जिंकून दाखवावी

$
0
0
सुरेश हाळवणकर यांच्यावर खोटेनाटे आरोप करण्यात आले. पण न्यायदेवता त्यांच्या बाजूने राहिली. विरोधकांनी मागून वार करण्यापेक्षा समोर येऊन निवडणूक जिंकून दाखवावी, असे आव्हान देतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जनतेची ताकद हाळवणकर यांच्या मागे असल्याने ते विजयी होतील, असा विश्वासही व्यक्त केला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images