Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

दुरंगी ते चौरंगी

$
0
0
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजप महायुती तुटल्याने जिल्ह्यातील दहाही जागांवर थेट चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. लोकसभा निवडणुकीत गळ्यात गळे घालून प्रचार करणारे आता एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. अचानक युती व आघाडी फुटल्याने अनेकांना पक्षाच्या चिन्हावर रिंगणात उतरण्याची संधी मिळणार आहे.

सायकल बँक

$
0
0
दुर्गम भागातील मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि मुलींची गळती कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने सायकल बँक योजना राबविण्यात येणार आहे. गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत लवकरच ही योजना कार्यान्वित करण्यात येईल.

उदं गं अंबे!

$
0
0
अखंड नंदादीपाच्या तेजाने झळकलेल्या गर्भकुडीत पारंपरिक वाद्यांची ललकारी झाल्यानंतर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात घटस्थापना करून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला.

अंबाबाईची सिंहासनारूढ पूजा

$
0
0
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी (गुरूवारी) करवीर निवासिनी श्री अंबाबाईची सिंहासनारूढ बैठी जडावी सालंकृत पूजा बांधण्यात आली. श्रीपूजक मनोज मुनीश्वर, अनिरूद्ध जोशी यांनी पूजा बांधली. रात्री साडेनऊ वाजता पारंपरिक लवाजम्यासह पालखी प्रदक्षिणा हजारो भाविकांच्या उपस्थितीत काढण्यात आली.

पालकमंत्र्यांचे शक्तिप्रदर्शन

$
0
0
सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांनी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत शुक्रवारी शहरातून जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी राजवाडा गांधी मैदान येथून महारॅली काढण्यात आली.

जयंत पाटील आज अर्ज भरणार

$
0
0
इस्लामपूर विधानसभा मतदार संघातून आज (शनिवार) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसे या सर्वच पक्षांचे उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. आज दिवसभर शक्ती प्रदर्शन करीत रॅली काढून ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, काँग्रेसचे नेते नानासाहेब महाडिक, शिवसेनेचे भीमराव माने अर्ज दाखल करणार आहेत.

पतंगराव, आर. आर. यांचे अर्ज दाखल

$
0
0
सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातून शुक्रवारी ६२ उमेदवारांनी १०४ नामनिर्देशन पत्र दाखल केली. पलूस-कडेगावमधून वनमंत्री पतंगराव कदम, तासगाव-कवठेमहांकाळमधून गृहमंत्री आर. आर. पाटील, जतमधून विलासराव जगताप, खानापूरातून विद्यमान आमदार सदाशिव पाटील, गोपीचंद पडळकर यांनी तर सांगलीतून माजी मंत्री मदन पाटील, आमदार संभाजी पवार, माजी महापौर सुरेश पाटील, इद्रीस नायकवडी, सुधीर गाडगीळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ

$
0
0
सातारा जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे एकमेव आमदार आणि मागील सलग सात विधानसभेत कराड दक्षिणमधून काँग्रेस पक्षाचे आमदार विलासकाका पाटील-उंडाळकर यांनी काँग्रेस पक्षाविरुद्ध बंडाचे निशाण फडकविले आहे. शनिवारी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

दगडू सपकाळ साताऱ्यातून अर्ज दाखल

$
0
0
लालबागचे माजी आमदार दगडू सपकाळ यांनी सातारा-जावली मतदारसंघातून शिवसेनेच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. माझी उमेदवारी जिंकण्यासाठीच असल्याचे त्यांनी सांगितले होते.

Whatsapp: MLA बदनामीप्रकरणी गुन्हा

$
0
0
​व्हाट्सअॅपवर विद्यमान आमदारांबाबत आक्षेपार्ह मजकूर पसरवून बदनामी केल्याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अभिजित मधुकर हावळ (रा. शुक्रवार पेठ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

झेंडे द्या..., टोप्याही हव्यात

$
0
0
आघाडी आणि महायुती फुटल्याने चार पक्षांचे वेगळे संसार सुरू झाले आहेत. त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीत खळी-पोस्टर लावणाऱ्या कार्यकर्त्यांनाही उमेदवारीची अनपेक्षितपणे लॉटरी लागली आहे.

दुर्गादर्शनाच्या नावावर मतांचा जोगवा

$
0
0
विधानसभा निवडणुकीतील जागावाटपांचे गुरुवारी चित्र स्पष्ट झाले असले तरी काही दिवसांपासून इच्छुक उमेदवारांनी महिलांची वोट बँक कॅच करण्यासाठी नवदुर्गा दर्शनाचे पॅकेज‌ दिले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट

$
0
0
खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत शनिवारी फूट पडली. संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष उल्हास पाटील यांनी शनिवारी संघटनेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला.

गर्दीचा उच्चांक

$
0
0
शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची आदिमाया रूपात पूजा बांधण्यात आली. कपिलेश्वर यांची माता देवहुती यांची ज्ञानलालसा जाणून मातेचेच गुरूपद त्यांनी घेतले.

बहुरंगी लढाईचा एल्गार

$
0
0
जिल्ह्यातील दहा मतदारसंघातील लढती आता जवळपास निश्चित झाल्या आहेत. शनिवारी अखेरच्या दिवशी अपक्षांनी तसेच डमी अर्ज मोठ्या प्रमाणात भरण्यात आले. अखेरच्या दिवसापर्यंत २७१ उमेदवारांनी ३८२ अर्ज भरले असल्याचे निश्चित झाले.

अखेरपर्यंत घोळात घोळ !

$
0
0
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली तरी जिल्ह्यात उमेदवारीबरोबरच बंडखोरांचा घोळ अखेरपर्यंत सुरू राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसने पाच मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाशी समझोता केला.

पार्किंगसाठी ६० रुपये मोजा

$
0
0
महापालिकेच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या पे अँड पार्क सुविधा पुरवणाऱ्या ठेकेदाराकडून अंबाबाईच्या दर्शनाला आलेल्या पर्यटक भाविकांसाठी लूट सुरू आहे. महापालिकेने पार्किंग ठेकेदाराला प्रतितास २० रुपये आकारण्याची परवानगी दिली असताना त्यांच्याकडून ठेकेदाराकडून परस्पर ३० रुपये वसूल केले जात आहेत.

‘वारणा’चे सुगंधी दूध दसऱ्याला बाजारात

$
0
0
वारणानगरचा वारणा सहकारी दूध संघ दसऱ्याला वारणा फ्लेवर्ड (सुगंधी) दूध बाजारात आणणार असल्याची माहिती आमदार विनय कोरे यांनी दिली. वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया सोसायटीची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या कार्यस्थळावर पार पडली.

मादनाईकांच्या उमेदवारीचा निर्णय पाच वर्षांपूर्वीच

$
0
0
‘राज्य सरकारने ऊस दर नियामक मंडळाची स्थापना केली, मात्र त्याची अंमलबजावणी केली नाही. शेतकऱ्यांची केवळ फसवणूक करण्याचा एककलमी कार्यक्रम सरकारने केला आहे. याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील,’ असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

प्रचाराच्या वाहनांसाठी धावाधाव

$
0
0
युती तुटली, आघाडीही तुटली. इच्छुकांना पक्षांची तिकिटेही मिळाली. अर्ज भरल्यानंतर आता १५ दिवसांत गावोगावी प्रचार करण्यासाठी यंत्रणा उभारावयाची असल्याने उमेदवारांकडून वाहनांच्या बुकिंगसाठी धावाधाव सुरू झाली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images