Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सत्यजित कदमांना उमेदवारी

$
0
0
आघाडीचा निर्णय होण्याधीच काँग्रेसने बुधवारी रात्री ११८ उमेदवारांची यादी जाहीर केली. कोल्हापूर दक्षिणमधून सतेज पाटील, कोल्हापूर उत्तरमधून सत्यजित कदम, शिरोळचे आमदार सा. रे. पाटील, करवीरमधून पी. एन. पाटील, इचलकरंजीतून प्रकाश आवाडे, हातकणंगले मतदारसंघातून जयवंतराव आवळे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांचा कराडमध्ये प्रचार

$
0
0
काँग्रेस-राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या आघाडीची घोषणा लांबणीवर पडलेली असली तरी स्वतः मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमधून प्रचाराला प्रारंभ केला. त्यांनी मतदार संघातील गावांचा दौरा केला. दरम्यान, कोळे येथे बोलताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीसह मित्रपक्षांची आघाडी झाली पाहिजे, अशी आमची इच्छा आहे.

सत्तेसाठी गृहकलह वाढला

$
0
0
राजकारण म्हटले की घराणेशाही आली आणि घराणेशाही सुरू झाली की वारसदारांना संधी असे जणू समीकरणच आहे. महत्त्वाकांक्षेने पछाडलेली नवी पिढी निवडणुकीसाठी इच्छुक असल्यामुळे काहींनी बंडखोरीचे शस्त्र उगारले आहे.

नवरात्रोत्सवाला प्रारंभ

$
0
0
घटस्थापनेच्या विधीवत पूजेसह शक्तीची आराधना करणाऱ्या नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. घराघरात घटस्थापनेची तयारी पूर्ण झाली आहे. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रकाळात दर्शनासाठी येणाऱ्या सुमारे दहा लाखांहून अधिक भाविकांच्या सोयीसुविधा व सुरक्षिततेसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सज्ज झाली आहे.

आजपासून ‘रंग कोल्हापूरचे’

$
0
0
खोलखंडोबा मंदिर परिसरातील शिवगर्जना मंडळाच्या वतीने यंदाही कलात्मक नवरात्रोत्सव साजरा होत आहे. येथील कलासाधना मंचच्या कलाकारांनी खोलखंडोबा हॉलमध्ये ‘रंग कोल्हापूरचे’ या संकल्पनेवर बारा रांगोळ्या रेखाटल्या जाणार असून त्याचे उद्‌घाटन उद्या, (ता. २६) सायंकाळी चार वाजता होणार आहे.

ट्रॅफिक, पार्किंग ‘बेस्ट’

$
0
0
महालक्ष्मी मंदिर परिसरात ट्रॅफिकचे नियोजन पहिल्या दिवशी योग्य रितीने सुरू झाले आहे. नवीन नियोजनामुळे वाहनधारकांचे नियोजन चुकत असल्याने ट्रॅफिक पोलिसांना वाहनधारकांची समजूत काढताना पुरेवाट होत होती.

हॅट‍्ट्रिकची संधी द्या: सतेज पाटील

$
0
0
‘जनतेच्या पाठबळावर मी दोन वेळा विजयी झालो आहे. मी गावागावात कोट्यावधी रुपयांची विकासकामे केली आहेत. सर्वकष विकासासाठी विजयीची हॅट‍्ट्रिक करण्याची संधी द्यावी’ असे आवाहन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले. कावणेतील प्रचारसभेत ते बोलत होते.

प्रचारात प्रशासनाचीच बाजी

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी इच्छुक उमेदवारांना कमी वेळ मिळाला असला तरी प्रशासनाने मात्र यावेळी प्रचारात बाजी मारली आहे. लोकांनी निवडणुकीसाठी घराबाहेर पडावे, तरुणांनी मतदान करावे यासाठी प्रशासनाने मतदान जागृती मोहिम राबविली आहे.

हक्क गमावणार का?

$
0
0
‘ज्याला जनतेचा सरळ पाठिंबाही मिळत नाही. त्यांनाच मते विकत घ्यावी लागतात. त्यामुळे अशा पद्धतीने निवडून आलेला उमेदवार मोजलेले पैसे निश्चित वसूल करणार. हे लक्षात ठेवून लोकप्रतिनिधीकडून आर्थिक मागणी करु नका असे आवाहन करत कोल्हापूर कॉलिंगच्यावतीने लोकप्रतिनिधींची नागरिकांकडून जागृती अभियानाला गुरुवारपासून प्रारंभ केला.

'त्यांचा' वधारला भाव

$
0
0
प्रभागा-प्रभागातील मतदान फिक्स करण्यासाठी नगरसेवकांची भूमिका मोलाची ठरणार आहे, हे जाणून नेते मंडळींनी आता नगरसेवकांवर खास जबाबदारी सोपविण्यास सुरूवात केली आहे. नेत्यांनी गेल्या आठवड्यपासून नगरसेवकांच्या भेटी गाठी घेण्यास सुरूवात केल्या आहेत. नगरसेवकांच्या निवासस्थानी भेट देण्यापासून ते प्रभागात वर्चस्व असलेल्या सार्वजनिक मंडळांच्या दारात भोजनावळीच्या पंगती उठू लागल्या आहेत.

करवीरमध्ये हात, कागलला घड्याळ

$
0
0
कागल विधासभा मतदारसंघात जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ आणि कोल्हापूर दक्षिण मध्ये गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना आपला जाहीर पाठिबा देत असल्याचे ‘शाहू’ कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले

फलकबाजीनंतरही प्रश्नच प्रश्न!

$
0
0
दक्षिण महाराष्ट्रात पुण्यानंतरचे कोल्हापूर मोठे शहर अशी केवळ चर्चाच घडवून आणली जाते. कारण गेल्या दहा वर्षात या चर्चेप्रमाणे कोल्हापुरात नवीन प्रकल्प आलेला नाहीच. शिवाय जुन्या अनेक प्रश्नांना केवळ तात्पुरते पर्याय देण्याशिवाय कोणते पुढचे पाऊल पडलेले नाही.

जगताप आता भाजपमध्ये

$
0
0
चिंचवडचे माजी आमदार लक्ष्मण जगताप यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे युती तुटल्याचे जाहीर झाल्यानंतर अवघ्या एक दीड तासात जगताप यांनी मुंबईत एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

‘अरे, यांची ताकद तरी किती?’

$
0
0
स्वबळावर केवळ एखादी जागा जिंकण्याची क्षमता असतानाही केवळ भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतल्याने रिपाइं, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम हे पक्ष राज्यभर चर्चेत आहेत. मात्र ताकद असूनही वादग्रस्त न ठरल्याने व अलिप्तवादाची भू्मिका घेतल्याने मनसे व जनसुराज्य शक्तीसारखे पक्ष मात्र बाजूला फेकल्याचे चित्र राज्यात दिसत आहे.

शिराळ्यात राष्ट्रवादीकडून मानसिंगराव नाईक?

$
0
0
आघाडी आणि महायुती राहणार की तुटणार हे अद्याप नक्की नसतानाच शिराळा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मानसिंगराव नाईक यांनी अर्ज भरला. ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मानसिंगराव नाईक यांनी शक्तिप्रदर्शन करीत अर्ज भरला.

सत्यजित कदम कोट्यधीश उमेदवार

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांतून उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यात सुरुवात केली असून, कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसकडून सत्यजित शिवाजीराव कदम यांच्यासह तिघांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.

मुश्रीफांनी लुटले

$
0
0
‘हसन मुश्रीफ यांनी गेली पंधरा वर्षे सत्तेच्या माध्यमातून तालुक्याला लुटण्याचेच काम केले आहे. भ्रष्टाचारातून मिळालेल्या पैशातून कार्यर्त्यांचा खरेदी-विक्री संघ केला आहे. पैशाच्या माध्यमातून लोक गरजूच राहावेत एवढीच मुश्रीफांची नीती राहिली आहे,’ असा आरोप शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी केला.

जनसुराज्यची साथ भाजपला?

$
0
0
आघाडी व महायुती तुटल्याने आता अचानक जनसुराज्य पक्षाला महत्त्व आले आहे. जनसुराज्य पक्ष आपल्यासोबत यावा यासाठी भाजप व राष्ट्रवादीने रात्री संपर्क साधण्यास सुरुवात केली. जनसुराज्यने भाजपला प्राधान्य दिले असून, त्याला काही अडचण आल्यास राष्ट्रवादी बरोबर जाण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

दहशतवाद संपवण्यासाठीच रिंगणात

$
0
0
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील दहशतवाद संपविण्यासाठी भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी सांगितले. भाजप कार्यालयात त्यांनी कार्यकर्त्यांशी ओळख करून घेत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

‘समृद्ध’ अडगळीला संधी

$
0
0
शिवसेना-भाजपची युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीमुळे गेल्या वीस वर्षांपासून इच्छुक असूनही उमेदवारीची संधी न मिळालेल्या जिल्ह्यातील अनेक नेते व कार्यकर्त्यांना अनपेक्षीत रिंगणात उतरण्याची संधी मिळाली आहे. पंधरा दिवसांत तयारी कशी करायची? याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images