Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कारपार्किंगचा गुंता सुटणार

0
0
शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासा​ठी आणि पार्किंगची समस्या सोडवणुकीसाठी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात उभारण्यात येणाऱ्या मल्टिलेव्हल कार पार्किगच्या प्रलंबित प्रकल्प येत्या काही काळात मूर्त रुपात येण्याची शक्यता आहे.

विद्यार्थिनीची होस्टेलवरून उडी

0
0
कोल्हापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहाच्या पाचव्या मजल्याववरून उडी घेतल्याने मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी जखमी झाली.

महायुतीचे नेते मुंबईत

0
0
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा नारळही कोल्हापुरातूनच फुटणार असल्यामुळे नेते, मंत्री, आमदारांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहे.

विधानसभेचे निकाल वेगळे

0
0
केंद्रात वाजपेयींचे सरकार निवडून आले असताना तेव्हा राज्यात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार आले होते. यावेळच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल अनपेक्षित लागला असला तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे निकाल वेगळे असतात, असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

आघाडी होणारच... : शरद पवार

0
0
‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये आघाडी व्हावी अशीच भूमिका आहे. त्यामुळे दोन दिवसांत याबाबतची अंतिम बोलणी होऊन कोण किती आणि कोणत्या जागा लढविणार हे स्पष्ट होईल. ही निवडणूक आघाडीतर्फेच लढवली जाईल,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी कोल्हापुरात सांगितले.

भुदरगडची काँग्रेस महायुतीत

0
0
राधानगरी विधानसभा मतदार संघात काँग्रेस नेत्यांनी एकत्र येऊन आमदार के. पी. पाटील यांना शह देण्याच्या बढाया नेहमीप्रमाणे यावेळीही काँग्रेसच्या नेत्यांनी मारल्या खऱ्या मात्र, निवडणूक जवळ येईल तशा तलवारी म्यान होत आहेत. आपल्याला तिकीट मिळावे यासाठी काही बंडाची भाषा करणाऱ्या नेत्यांनी सोमवारी महायुतीच्या दरबारात हजेरी लावली आहे.

पावणेपाच कोटींचे कुंपण

0
0
गेल्या तीस वर्षापासून प्रलंबित असलेला चित्रनगरीच्या निधीचा प्रश्न १७ कोटी रूपये निधीच्या मंजुरीने सुटला असला तरी आचारसंहिता लागण्यापूर्वी पाच कोटी ४० लाखांचा निधी प्रशासनाच्या हातात पडला आहे. मात्र चित्रनगरीच्या सुमारे ७५ एकर जागेभोवती संरक्षित भिंत उभारण्यावरच चार कोटी ८० लाख रूपये खर्ची पडणार आहेत.

‘मातोश्री’वर इच्छुकांची मांदियाळी

0
0
शिवसेनेकडून विधानसभेचे तिकीट मिळवण्यासाठी विद्यमान आमदारांसह अनेक इच्छूकांनी सोमवारी रात्री ‘मातोश्री’वर मुलाखती दिल्या.

जेवणावळी सुरू

0
0
‘मावशी आपल्या कुटुंबात तरुण मुले किती? एकूण कुटुंबातील लोकांची संख्या सांगा?,’ जनगणना कर्मचाऱ्यांरखे असे प्रश्न आता ऐकायला मिळू लागले आहेत. मात्र, असे प्रश्न विचारणारे संभाव्य उमेदवारांचे कार्यकर्ते असून माणसांच्या संख्येवर जेवणाचे पास देण्याची पध्दत सुरू झाली आहे.

आपचा झाडू अडगळीत

0
0
लोकसभेच्या निवडणुकीत मोठा गाजावाजा करुन उतरलेल्या आम आदमी पक्षाने विधानसभा निवडणुकीत माघार घेतली आहे. पक्षांतर्गत सुरु झालेली बंडाळी, काही पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे आणि बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांमुळे पक्षाची जिल्ह्यातील अवस्था वाईट झाली आहे.

कोल्हापूर उत्तर शेकाप लढविणारच

0
0
आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदार संघातून कोणत्याही परिस्थितीत रिंगणात उतरण्याची आग्रही भूमिका शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने जिल्हा सहचिटणीस दिलीपकुमार जाधव यांनी जाहीर केली.

विद्यार्थिनीची आत्महत्या

0
0
राजर्षी शाहू छत्रपती वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहाच्या पाचव्या मजल्यावरून उडी विद्यार्थिनीने आत्महत्या केली. श्रद्धा गंगाधर करे (वय २२, रा. २२८, नं. २, राजगडनगर, बळीराम महाविद्यालयाजवळ, सिडको कॉलनी, औरंगाबाद) असे तिचे नाव आहे.

अमित शहांचा कोल्हापूर दौरा

0
0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा मुहूर्त झाल्यानंतर दोनच दिवसात भाजपचे अध्यक्ष अमित शहा कोल्हापुरात येत आहेत. शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याबाबत प्रचंड उत्सुकता असून राष्ट्रवादीने तयार केलेल्या वातावरणाचा त्या पक्षाला फारसा फायदा मिळू नये यासाठी शहा यांनी महालक्ष्मी दर्शनाचे कारण पुढे करत कोल्हापूर दौऱ्याचे नियोजन केले आहे. त्याप्रमाणे गुरूवारी (ता. १८) ते कोल्हापुरात दाखल होत आहेत.

राष्ट्रवादीसाठी कोल्हापूर लकी

0
0
राष्ट्रवादी पक्षाची स्थापना कोल्हापुरात, निवडणुकीचा पहिला प्रचार शुभारंभ कोल्हापुरातच, त्यानंतर लोकसभा असो वा विधानसभा ..त्याच्या प्रचाराचा नारळ फुटला तो कोल्हापुरातच ... आता विधानसभेच्या प्रचाराचे रण​​शिंग मंगळवारी हा पक्ष कोल्हापुरातूनच फुंकणार आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या कोल्हापूरप्रेमाची चर्चा राज्यभर सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ

0
0
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ मंगळवारी कोल्हापुरात फुटणार आहे. गांधी मैदानात होणाऱ्या या मेळाव्यास पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच ते सहा वजनदार मंत्री उपस्थित राहणार आहेत.

काँग्रेसशी आघाडी होणारः पवार

0
0
‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये आघाडी व्हावी अशीच भूमिका आहे. त्यामुळे दोन दिवसांत याबाबतची अंतिम बोलणी होऊन कोण किती आणि कोणत्या जागा लढविणार हे स्पष्ट होईल. ही निवडणूक आघाडीतर्फेच लढवली जाईल,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी कोल्हापुरात सांगितले.

दुर्मिळ कीटक

0
0
‘एस्क्रोकोरीस सिलॉनिकस’ हा ७ ते ८ मिलीमीटर लांबीचा दुर्मिळ किटक भारतात तब्बल ९५ वर्षांनंतर आढळला आहे आणि तोही शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात.

'बाबांनी तिढा सोडविला असता!'

0
0
‘विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागावाटपाचा मोठा तिढा आहे. हा तिढा सोडविण्यासाठी माझे बाबा हवे होते,’ असे सांगत भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा पंकजा मुंडे-पालवे यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची अनुपस्थितीची जाणीव व्यक्त केली.

कॉर्पोरेट राज्य बँकेचा आराखडा

0
0
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने गेल्या आर्थिक वर्षात ६४५ कोटींचा ढोबळ नफा कमावला आहे. त्यामुळे सभासदांना भागभांडवलापोटी १० टक्के लाभांश वाटप केला आहे. तसेच राज्य सरकारला भाग भांडवलापोटी १० कोटींचा धनादेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.

राष्ट्रवादीचा प्रचार जोरात

0
0
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोल्हापुरात जंगी प्रचार सभा घेऊन राज्यात मोदी लाट नव्हे तर, राष्ट्रवादीची लाट असल्याचा नारा बुलंद केला. कोल्हापुरात झालेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी आक्रमकपणे भाषण करत पुन्हा एकदा राज्यातील सत्ता ताब्यात मिळविण्याचा आत्मविश्वास कार्यकर्त्यात निर्माण केला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images