Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

इच्छुकांना मिळणार कमी कालावधी

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने आता राजकीय पक्षांच्या प्रचारसभा आणि भेटीगाठींचा धुरळा उडणार आहे. राज्यस्तरावर पक्षांच्या जागा वाटपाची अंतिम यादी निश्चित झालेली नाही. उमेदवारी न ठरल्याने इच्छुकांना प्रचारासाठी खूप कमी वेळ मिळणार आहे.

आचारसंहितेचा रेड सिग्नल

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी राज्यात अनेक निर्णयांचा धडाका लावला गेला. पण राज्य सरकारने कोल्हापूरच्या काही महत्वाच्या कामांबाबत निर्णय घेतले नसल्याने त्यांना तूर्त रेड सिग्नल मिळाला आहे.

'दाभोलकरांच्या खुन्यांचा शोध घेणार'

$
0
0
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्यांचा शोध घेणारी स्वतंत्र मोहीम सुरू करण्याचा निर्धार श्रमिक मुक्ती दलाच्या बैठकीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी डॉ. भारत पाटणकर होते.

मराठी शेतकऱ्यांच्या उसाला कमी दर

$
0
0
महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमाभागात असणाऱ्या केंपवाड येथील साखर कारखान्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ऊस बिलात सापत्नभावाची वागणूक दिली आहे. महाराष्ट्रासाठी वेगळा दर आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांसाठी वेगळा दर, असा भेद केला आहे.

भाजपप्रवेश अन् प्रचाराचा मुहूर्त एकच

$
0
0
जत विधानसभा मतदार संघातून भाजपची उमेदवारी मिळविण्यासाठी विलासराव जगताप यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. ‘आपल्या भाजप प्रवेशाची केवळ औपचारिकता उरली असून, प्रवेश आणि प्रचाराचा मुहूर्त एकाचवेळी होईल,’ असा विश्वास जगताप यांनी ‘मटा’शी बोलताना रविवारी व्यक्त केला.

राधानगरीत राष्ट्रवादीची काँग्रेसवर कुरघोडी

$
0
0
आघाडी अंतर्गत ठरलेल्या समजोत्यानुसार काँग्रेसच्या जयसिंग खामकर यांच्या निवडीची दाट शक्यता असताना अचानक घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे राधानगरी पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली धैर्यशील पाटील-कौलवकर यांची तर उपसभापतीपदी काँग्रेसच्या सुप्रिया सुधाकर साळोखे यांची एकमताने निवड झाली.

पन्हाळ्यात जनसुराज्यला लॉटरी

$
0
0
पन्हाळा पंचायत समितीत चिठ्ठीद्वारे झालेल्या पदाधिकारी निवडीत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या सुनीता विकास पाटील (कोलोली) यांना सभापतीपदाचा तर त्यांच्याच रवींद्र आनंदराव जाधव (बहिरेवाडी) यांना उपसभापतीपदाचा जॅकपॉट लागला.

चंदगड सभापत‌िपदी ज्योती पाटील यांची फेरनिवड

$
0
0
चंदगड येथील पंचायत समितीच्या सभागृहात आज झालेल्या सभापती निवडीमध्ये सभापतीपदी काँग्रेसच्या ज्योती पाटील-पवार यांची तर उपसभापतीपदी शांताराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

आजऱ्यात सभापत‌िपदी केसरकर

$
0
0
आजरा पंचायत समिती सभापतीपदी सव्वा वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विष्णू केसरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

भुदरगड पं. स.च्या सभापत‌िपदी कांबळे

$
0
0
भुदरगड पंचायत समितीच्या सभापतीपदी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलास कांबळे यांची तर उपसभापतीपदी काँग्रेसच्या रतीपौर्णिमा कामत यांची बिनविरोध निवड झाली. भुदरगडच्या तहसीलदार शिल्पा ओसवाल निवडसभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.

शाहूवाडीत नलवडेंना संधी

$
0
0
शाहूवाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे कर्णसिंह गायकवाड यांचे समर्थक पंडितराव नलवडे यांची तर उपसभापतीपदी शिवसेनेचे माजी आ. सत्यजित पाटील यांचे समर्थक नामदेव पाटील-सावेकर यांची बिनविरोध निवड झाली.

श्रीकांत लोहार ‘कागल’चे सभापती

$
0
0
कागल पंचायत समितीच्या सभापतीपदी अपेक्षेप्रमाणे श्रीकांत लोहार यांची बिनविरोध निवड झाली. तर उपसभापतीपदी भूषण पाटील यांची फेरनिवड करण्यात आली. आज येथील पंचायत समितीच्या सभागृहात विशेष सभेत ही निवड करण्यात आली.

‘पॅरोल’ बाहेर गुंडाचाच ‘रोल’

$
0
0
कैद्याला फक्त शिक्षा देऊन थांबता त्याच्यात सुधारणा करून पुन्हा समाजात मिसळण्याची संधी देण्याचा पॅरोल हा मुख्य हेतू असला तरी पॅरोलवर सुटलेले गुन्हेगार बाहेर आल्यावर गुंडाचाच रोल करत असल्याचे चित्र दिसते.

राष्ट्रवादीची सभेसाठी जय्यत तयारी

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला मंगळवारी (ता.१६) प्रारंभ होणार आहे. त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार सोमवारी दुपारीच कोल्हापुरात येत आहेत.

भाजीपाला स्थिर, कांद्याच्या दरात घसरण

$
0
0
पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: ज्वारीला मागणी जास्त असते. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी व सांगली जिल्ह्यातील जत विभागाला ज्वारीचे कोठार मानले जाते. या भागातून जास्तीत-जास्त ज्वारीचे उत्पादन घेतले जाते.

बेस्ट इंजिनीअरर्स पुरस्कार जाहीर

$
0
0
द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्सच्या कोल्हापूर चॅप्टरच्यावतीने देण्यात येणाऱ्या बेस्ट इंजिनीअर्स पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. यंदा प्रशांत हडकर, विनायक पाटणकर, आनंद कुलकर्णी, नलिनी नेने, धैर्यशील पाटील यांनी या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

मैदान बुकिंगसाठी पक्षांकडून चढाओढ

$
0
0
निवडणूक प्रचाराच्या सभेसाठी लाखोंच्या संख्येने येणारे नागरिक व त्यांच्या वाहनांमुळे होणाऱ्या गर्दीमुळे विधानसभा निवडणूक प्रचार सभांसाठी शहरात मर्यादित ठिकाणेच उपलब्ध आहेत.

मॉडेल पोलिस स्टेशन मतदारसंघनिहाय उभारणार

$
0
0
जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीसाठी आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी जिल्हा प्रशासन कार्यरत झाले आहे.

महोत्सवाचा प्रारंभ १८ पासून

$
0
0
‘स्मॉल एफर्ट बीग डिफरन्स...प्रयत्न छोटा, बदल मोठा’ असे ब्रीद घेऊन यावर्षीच्या ​पाचव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या १८ ते २१ सप्टेंबर या कालावधीत रंगणार आहे.

पक्ष लागले कामाला

$
0
0
विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बैठका सुरू केल्या आहेत. मात्र, शिवसेना आणि भाजपच्या कार्यालयात हालचाली गतिमान झालेल्या दिसत नाहीत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images