Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

डॉल्बी वाजला?...आम्ही नाही ऐकला!

$
0
0
लेसर आणि एलइडीचा झगमगाट तसेच डॉल्बीच्या मुक्त दणादणाटावर देहभान हरपून थिरकरणारे हजारो कार्यकर्ते अशा जल्लोषी वातावरणात तब्बल २७ तास बाप्पांची विसर्जन मिरवणूक निघाली. दोन वर्षांपूर्वी ‘डॉल्बी मुक्ती’चा नारा देत नवा पायंडा पाडणाऱ्या शहरातील बड्या मंडळांनी यंदा डॉल्बीच्या दणदणाट केला.

कोल्हापूरच्या रंगकर्मींची एकजूट

$
0
0
हौशी कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या आणि व्यावसायिक रंगभूमीला नव्या दमाचे कलाकार देणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेचे कोल्हापूर केंद्र टिकवण्यासाठी नाट्यकर्मींची एकजूट यंदा तिसऱ्या वर्षीही दिसून आली आहे. यंदा स्पर्धेत कोल्हापूर केंद्रात १३ संघ सहभागी झाले आहेत.

डॉल्बीच्या दणदणाटाचे साताऱ्यात तीन बळी

$
0
0
साताऱ्यात विसर्जन मिरवणुकीतील डॉल्बीच्या दणदणाटाने राजपथावरील लांजेकर यांच्या जुन्या वाड्याची भिंत कोसळून तिघांचा मृत्यु झाला. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

मगरीला केले ग्रामस्थांनी जेरबंद

$
0
0
सांगली जिल्ह्यातील शिरगांव (ता. वाळवा) येथील बहाद्दर ग्रामस्थांनी मोठ्या धाडसाने कृष्णा नदीतील मगरीली पकडले. मगरीचे गणेश चतुर्थीच्या दिवशीच चांदोलीच्या जलाशयात विसर्जन केले.

विशेष दर्जासाठी पालिकेचे प्रयत्न

$
0
0
कोल्हापूर महापालिकेला विशेष दर्जा मिळावा यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू आहेत. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ, दरडोई उत्पन्नात अव्वल, दरवर्षी विविध करांपोटी सरकारच्या तिजोरीत हजारो कोटींचा भरणा करणारे आणि औद्योगिकदृष्ट्या विस्तारणारे शहर म्हणून कोल्हापूर विकसित होत आहे.

यशवंतगड संवर्धनाची अ‌‌धिसूचना

$
0
0
‘रत्नागिरी जिल्ह्यातील शिवकालीन यशवंतगड राज्य संरक्षित करण्यास गती प्राप्त झाली असून मंत्रालयाने रत्नागिरी पुरात्व विभागाला यशवंतगड किल्ल्याची अधिसूचना निर्गमित करण्याचे आदेश दिले आहेत.

मंदिरात बॅग स्कॅनर

$
0
0
शारदीय नवरात्रौत्सवकाळात मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या बॅग तपासण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने प्रसिद्ध केलेल्या ३० लाख रुपये किंमतीचे बॅग स्कॅनर भाडेतत्वावर घेण्याच्या निविदेला थंड प्रतिसाद मिळाल्यामुळे अखेर समितीने दोन स्कॅनर विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

‘डॉल्बी’साठी सव्वा कोटींचा चुराडा

$
0
0
सत्तावीस तासांहून अधिक काळ चाललेल्या मिरवणुकीत डॉल्बीच्या तालावर अनेकजण मनसोक्त नाचले,या डॉल्बीच्या आवाजात सव्वा कोटींचा चुराडा झाला.

ब्लॅक लिस्टवाल्यांना ठेका

$
0
0
शहरातील खराब रस्त्यांच्या प्रश्नावरून नगरसेवकांनी प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. कंत्राटदार आणि अ​धिकारी यांच्यामध्ये मिलीभगत असून योजेनीतील ४० टक्के रक्कमच रस्त्यासाठी खर्ची पडत आहे.

महिन्यात जागा प्रमाणित करा

‘केएसए’चा फुटबॉल कोर्टात

$
0
0
कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनने (केएसए) परदेशी फुटबॉल खेळाडूंना खेळण्यास प्रतिबंध केल्याच्या पार्श्वभूमीवर बालगोपाल तालीम मंडळाने कोर्टात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पुर्वी या निर्णयात बदल करण्यासाठी कायदेतज्ज्ञामार्फत केएसएला आठ सप्टेंबर रोजी नोटीस पाठवली आहे.

शैक्षणिक गुणवत्ता धोक्यात

$
0
0
गेल्या ३५ वर्षात शिक्षण व शिक्षण व्यवस्थेचे धीम्यागतीने व्यावसायिकरण झाले आणि १९९१ पासून तर या शिक्षणक्षेत्रात बाजारीकरणाने घुसखोरी केल्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता धोक्यात आली आहे.

ग्रामीण आरोग्य ‘ठणठणीत’

$
0
0
जिल्हा परिषदेची रुग्णालये आरोग्य सुविधांच्या बाबतीत खासगी रुग्णालयांपेक्षा सक्षम बनत आहेत. आरोग्य विभागाने राबवलेल्या कायापालट योजनेचे हे यश आहे. हे यश टिकवण्यासाठी आता सर्व ग्रामपंचायतींनी ८० लाख रुपयांचा निधी जमा केला आहे.

६८ जणांनी जीवन संपवले

$
0
0
जानेवारी ते ऑगष्ट २०१४ या कालावधीत कोल्हापूर शहर व शहर परिसरातील ६८ जणांनी हताश होऊन आपले जीवन संपवले. आजारपणाला कंटाळून, सावकाराच्या जाचाला कंटाळून व दिवाळखोरी ही कारणे पुढे आली असून महिलांच्यापेक्षा पुरूषांची संख्या अधिक आहे.

१५ पासून इलेक्ट्रॉनिक पेमेंट

$
0
0
शहरातंर्गत रस्ता दुरूस्तीची कामे असोत की, तलावाचे सुशोभिकरण, गटर्सची बांधणी असो की विविध साहित्याचा पुरवठा या साऱ्यांची बिले आता इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सीस्टिम प्रणालीद्वारे (इसीएस) करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

शिक्षक बँकेत बंडाचे बिगुल

$
0
0
राज्य प्राथमिक शिक्षक संघात झालेल्या बेकीनंतर दि प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. गेली अनेक वर्षे परस्परांच्या विरोधात लढणारी महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती आणि महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना एकाच पॅनेलखाली निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

खड्डे कोण भरणार?

$
0
0
गणेशोत्सवात शहरात मंडप खोदाई मोठ्या प्रमाणात होते. याचा परिणाम चांगल्या रस्त्यांमध्ये खड्डे पडून कालांतराने रस्ता खराब होतो. यंदाही हा प्रकार कायम आहे. परंतु महापालिका मंडळांकडून खड्डेखोदाईला परवानगी देताना ठराविक शुल्क आकारते.

रस्ते दुरुस्तीसाठी ४६ कोटी

$
0
0
जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी केंद्रीय राखीव निधी आणि पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून १८० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे.

गोबेल्स प्रचाराने जनतेत संभ्रम

$
0
0
‘खोटे बोलून लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न भाजपप्रणीत महायुतीकडून सुरु आहे. गोबेल्स पध्दतीच्या या प्रचाराला लोक भूलत आहेत. त्यामुळेच राज्याच्या बजेटचा विचार न करता ११ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे जाहीरपणे सांगून जनतेत संभ्रम निर्माण केला जात आहे.

एक लाख कार्यकर्ते येणार

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्या जाहीर सभेचा प्रारंभ मंगळवारी (ता. १६) गांधी मैदान येथून केला जाणार आहे. दुपारी तीन वाजता होणाऱ्या या मेळाव्यास एक लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशा पध्दतीचे नियोजन आपल्याला करावे लागणार आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images