Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

तुटलेले काठ अन् खड्डेच खड्डे

$
0
0
आजरा परिसरामध्ये पावसाळ्याआधी बनविलेले आणि मजबूतीकरण केलेल्या रस्त्यांनी सुरवातीच्या मुसळधार पावसात कसातरी तग धरला, पण गेले पंधरवडाभर भुरभुरणा-या मध्यम स्वरूपाच्या पावसात रस्त्यांची अक्षरश: दुर्दशा झाली आहे.

‘कम्पॅशन २४’तर्फे ५०१ विद्यार्थिनी दत्तक

$
0
0
‘देशातील विविध ठिकाणी तसेच परदेशात स्थायिक असलेल्या मूळच्या कोल्हापूरच्या नागरिकांना कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासकामात सहभागी करून घ्यावे,’ असे आवाहन संगीतकार, दिग्दर्शक आणि गायक अवधुत गुप्ते यांनी रविवारी येथे केले.

‘आजचे काम, आज पूर्ण’ योजना बंद

$
0
0
जिल्हा कोषागार कार्यालयातील कामकाज ऑनलाइन झाले असले तरी काही कर्मचाऱ्यांचे मायाजाल कायम आहे. राज्य सरकारी सेवानिवृत्त वेतन (नियमित पेन्शन) आणि फॅमिली पेन्शनसाठी काही कर्मचाऱ्यांचे अर्थकारण सुरु आहे.

गणरायाच्या विसर्जनासाठी सज्जता

$
0
0
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रविवारी दुपारी पोलिस बँडच्या तालावर शहरातून संचलन केले. गणेशोत्सव हा आनंदाचा सण असून या सणाचा आनंद पोलिसांनीही घ्यावा व नागरिक, भाविक व कार्यकर्त्यांना घेऊ द्यावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

सत्ता गेली तर काहींना तुरुंगात जावे लागेल

$
0
0
‘आघाडीत एकमेकांनी खोड्या केल्या आणि सरकार गेले तर काय होईल, याची जाणीव ठेवा. केवळ घरीच नव्हे तर काहिंना आत (तुरुंगांत) जावे लागेल,’ असा इशारा खुद्द वनमंत्री पतंगराव कदम यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिला.

गणेशविसर्जनासाठी तराफ्याचा वापर

$
0
0
पंचगंगा नदीचे पाणी यंदाच्या पावसाळ्यात रविवारी चौथ्यांदा पात्राबाहेर पडले आहे. दिवसभर पावसाचा जोर कमी झाला असून राधानगरी धरणाचेही स्वयंचलित दरवाजे बंद झाल्याने सोमवारी सकाळपर्यंत पाणी थोडे ओसरण्याची शक्यता आहे.

विसर्जन मार्गाची बॉम्बस्कॉडकडून तपासणी

$
0
0
कोल्हापूर व इचलकरंजी शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गाची काटेकोर तपासणी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी बॉम्ब डिटेक्शन व डिस्पोजल स्कॉडला दिले. गोकुळ शिरगांव येथील बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात येत आहे.

विजेच्या संकटासाठी ५०० कोटी

$
0
0
‘देशात अभूतपूर्व असे विजेचे संकट उद्भवले असून, त्याचा परिणाम राज्यातील वीज पुरवठ्यावरही होत असल्याने या संकटावर मात करण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

लोकांची पुण्याईच मला तारेल

$
0
0
‘सर्वसामान्यांच्या झोपडीपर्यंत सरकारच्या योजना नेल्या. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम केले. सतत संपर्क ठेवून लोकांच्या सुखदु:खात सामील झालो. ही सगळी शिदोरी घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत मी उतरणार आहे.' - हसन मुश्रीफ

रंकाळ्यावर गांडूळ खत प्र‌कल्प

$
0
0
रंकाळा परिसरातील उद्यानामध्ये तयार होणाऱ्या कचऱ्यातून गांडूळ खत निर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहेत. सामाजिक काम करणाऱ्या हिंदू युवा प्रतिष्ठानने उद्यान विभागाला खतनिर्मितीसाठी दोन बेड दिले आहेत. एक पदपथ उद्यानामध्ये तर एक चौपाटीजवळील उद्यानामध्ये ठेवण्यात आला आहे.

विसर्जनासाठी आठ मार्ग निश्चित

$
0
0
सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत पापाची तिकटी ते महाद्वार रोड पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला आहे. बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी हा एकमार्गी मार्ग राहणार आहे. तसेच विसर्जनासाठी आठ मार्ग निश्चित करण्यात आले आहे.

बाप्पांना निरोपाचा दिवस

$
0
0
गेले अकरा दिवस सुरू असलेल्या महाउत्सवाची सांगता सोमवारी बाप्पांच्या विसर्जनाने होणार आहे. त्यासाठी सर्व सार्वजनिक मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. शिवाय जिल्हा आणि पोलिस प्रशासनानेही सर्व ती तयारी केली आहे.

सांगलीला नाही वाली

$
0
0
‘राजे चिंतामणरावांनी वसविली, वसंतदादांनी वाढविली; पण त्यानंतर कुणीही नाही वाली,’ अशी ही सांगली.

डॉल्बीच्या आवाजाने भिंत कोसळली

$
0
0
साताऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीतील डॉल्बीचा दणदणाट तिघांच्या जिवावर बेतला आहे. शहरातील राजपथ परिसरात सोमवारी मिरवणूक सुरू असताना डॉल्बीच्या प्रचंड आवाजाने इमारतीची भिंत कोसळली. त्याखाली गाडले जाऊन तिघांचा मृत्यू झाला तर, दोन महिला जबर जखमी झाल्या.

गूळ सौदे होणार परंपरेनुसारच

$
0
0
मार्च २०१४ मध्ये राज्य सरकारने प्रक्रिया केलेल्या शेतमालावरील शेती उत्पन्न बाजार समितीवरील नियमन हटवण्यात आले आहे. यामुळे कोल्हापूर येथील गूळ सौद्यांचा प्रश्न जटील बनला होता. या प्रश्नावर समन्यायी असा तोडगा निघाला असून पूर्वीच्या प्रथेनुसार बाजार समितीमध्ये गुळाचे सौदे काढण्यात येणार आहेत.

‘दक्षिण’मधून भाजपतर्फे लढण्यास जाधव इच्छूक

$
0
0
उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी भारतीय जनता पक्षाच्यावतीने विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली.

कारवाईची शक्यता कमीच

$
0
0
गणेश विजर्सन मिरवणुकीत फक्त डॉल्बीच वाजला असे यंदाच्या मिरवणुकीचे वर्णन करता येईल. डॉल्बीमुळे आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाले असतानाही यंदा सबंधित मंडळावर कायदेशीर कारवाई होणे अवघड असल्याचे दिसत आहे.

‘कृषी संजीवनी’त शेतकऱ्यांची आघाडी

$
0
0
कृषी संजीवनी योजनेतील सवलतीचा लाभ घेण्यासाठी पहिला हप्ता भरण्यात शेतकऱ्यांनी आघाडी घेतली आहे. ३१ ऑगस्ट अखेर लोकांनी भरलेल्या कृषी संजीवनी योजनेच्या हफ्त्यानुसार सुमारे ती कोटी ३५ लाख रुपये जमा केले आहेत.

कांदा उत्पादकांना एजंटांचा फटका

$
0
0
जमिन खरेदी-विक्री आणि अन्य व्यवसायांमध्ये कमिशनवर व्यवहार करण्याची जशी प्रथा रुढ झाली आहे, तशीच स्थिती सध्या कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील कांदा-बटाटा मार्केटमध्ये आली आहे.

राधेश्याम जाधव यांना रामनाथ गोएंका पुरस्कार

$
0
0
टाम्स ऑफ इंडियाचे पुणे येथील सहाय्यक संपादक राधेश्याम जाधव यांना पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या रामनाथ गोएंका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मंगळवारी नवी दिल्ली येथे शानदार समारंभात लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images