Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

उजनी धरण शंभर टक्के भरले

0
0
सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी धरण अखेर शंभर टक्के भरले आहे. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता उजणी धरण पूर्ण भरले. धरण भरल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह आणि शेती आणि उद्योग धंद्यांच्या पाण्याचाही प्रश्न मिटला आहे.

हजारो मुलांनी अनुभवले मोदी

0
0
ज्या पिढीच्या भविष्यावर देशाच्या प्रगतीचे शिखर उभे राहणार आहे, त्या विद्यार्थ्यांसोबत बोलण्याचा हा क्षण मी आयुष्यभर जपून ठेवेन, या मोदींच्या वाक्याला टाळ्यांचा गजर करत मुलांनी प्रतिसाद दिला.

इंटरसिटी एक्स्प्रेस रुळावर येईना

0
0
कोल्हापुरातून सोलापूरसाठी एक सप्टेंबरपासून इंटरसिटी एक्सप्रेस रेल्वे सुरु होण्याच्या कोल्हापूरकरांच्या अपेक्षेवर पाणी फेरले आहे. नवीन रेल्वे नाही व वेळापत्रकातही काही बदल झालेले नसल्याने कोल्हापूर रेल्वे स्टेशन एक सप्टेंबरपासूनच्या नव्या ट्रॅकवरुन बाजूला पडले आहे.

बाप्पांच्या निरोपाचे मार्ग खडतर

0
0
सार्वजनिक गणेशमूर्तींचे विर्सजन सोमवारी होत आहे. पण पंचगंगा नदीकडे जाणारा मुख्य विसर्जन मार्ग, इराणी खणीकडे जाणारा मार्ग यांची दुरवस्था आहे तशीच आहे, त्यात पावसामुळे खड्डे बुजवण्यासाठी वापरलेल्या मुरमाचा पुरता चिखल झाल्याने गणपती बाप्पांच्या निरोपाचा मार्ग हा खडतर बनलेला आहे.

जिल्हा परिषदेत अध्यक्षपदासाठी ‘मांदियाळी’

0
0
जिल्हा प‌रिषदेच्या अध्यक्षपदासाठी राजकारण तापू लागले आहे. पुढील अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असणाऱ्या या पदावर विराजमान होण्यासाठी काँग्रेस अंतर्गत अनेक इच्छुक आहेत.

मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन

0
0
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीमध्ये मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरु आहे. नाव नोंदणी करण्यासाठी मर्यादित कालावधी असल्याने मतदारांनी आपले नाव तत्काळ मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन राज्याच्या उपमुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे.

काही नेत्यांकडून जाणीवपूर्वक बदनामी

0
0
गंभीर गुन्हे असलेले अनेकजण शहरात असून ते मोकाट फिरत आहेत. पण माझ्यावर कोणताही गंभीर गुन्हा नसताना हद्दपार केले आहे. निवडणूक डोळ्यासमोर असल्याने काही राजकीय नेत्यांनी जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी हा प्रयत्न केला आहे.

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ. श्रीकांत पाटील यांना प्रदान

0
0
पेठ वडगाव येथील बळवंतराव यादव हायस्कूलचे शिक्षक डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील यांना भारत सरकारच्या मानवसंसाधन विकास मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

मंडळांनो, स्वयंशिस्त दाखवा

0
0
सोमवारी होणा‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍ऱ्या सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने कशाप्रकारे तयारी केली आहे, याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी महाराष्ट्र टाइम्सशी संवाद साधला.

रस्ते फुलले गर्दीने!

0
0
घरगुती गणपतींच्या विसर्जनानंतर गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसाने शनिवारी उघडीप दिल्यामुळे शहरातील रस्ते गर्दीने फुलून गेले. शनिवारची सुटी आणि पुन्हा रविवार आल्यामुळे मध्यरात्रीपर्यंत राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शिवाजी चौकासह ठिकठिकाणी रस्ते गर्दीने फुलून गेले होते.

रस्ते कंत्राटदारांना नोटीस

0
0
शहरात ठिकठिकाणी केलेले रस्ते वर्षभरातच खराब झाल्याने महापालिकेने अशा तेरा रस्त्यांसाठी सहा कंत्राटदारांना जबाबदार धरत नोटीस लागू केली आहे. त्यांनी हे रस्ते तातडीने दुरुस्त न केल्यास कारवाई केली जाणार आहे, असा इशारा दिला आहे.

पोलंडची कन्या; कोल्हापूरची सून

0
0
सिंगापूर येथे नोकरीनिमित्त स्थायिक असलेला कोल्हापूरचा सॉफ्टवेअर इंजिनिअर निखिल मेत्रानी आणि मूळची पोलंडची असलेली आर्किटेक्ट कॅटारजयाना शनिवारी कोल्हापुरात हिंदूधर्म शास्त्राप्रमाणे विवाहबद्ध झाले.

आणखी ३७ जण हद्दपार

0
0
गणेशोत्सवकाळात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी शनिवारी आणखी ३७ जणांना हद्दपारीची कारवाई केली. शाहूपुरी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ३० व जुना राजवाडा पोलिस स्टेशन परिसरातील सातजणांचा यामध्ये समावेश आहे.

गणपती विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज

0
0
दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेश विसर्जन मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची लगबग सुरु आहे. तर मिरवणूक मार्गावर व विसर्जन ठिकाणी यंत्रणा सज्ज करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.

मूर्तिदान उपक्रम ठरतेय चळवळ

0
0
जिल्ह्यात घरगुती गणेशमूर्तींचे नदी किंवा तलावात विर्सजन न करता त्या दान करण्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूर शहरात सुरू झालेला या पुरोगामी उपक्रमाला ग्रामीण भागातूनही प्रतिसाद मिळत असून, संपूर्ण जिल्ह्यातून जवळपास ४० हजारांवर मूर्ती दान करण्यात आल्या.

बचत गटाच्या महिला होणार पदवीधर

0
0
बचत गटाच्या चळवळीत अनेक म‌हिलांचा सहभागी झाल्या आहेत. मात्र या महिलांचे शिक्षण ४ थी ते फारफार तर ७ वीपर्यंत झालेले. या महिलांना बचत गटाची माहिती शास्त्रीय पध्दतीने व्हावी तसेच या महिला पदवीधर होण्याची संधी मिळावी यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने स्वतंत्र सोय केली आहे.

उत्सवातून प्रबोधनाची परंपरा

0
0
सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोल्हापुरात साधारण १९२० च्या दरम्यान झाली असावी, कोल्हापूरच्या गणेशोत्सवाला ऐेतिहासिक परंपरा आहे. राजर्षी शाहू छत्रपतींच्या मल्लविद्येच्या प्रोत्साहनाने अनेक तालीम संस्था आणि आखाडे निर्माण झाले.

गडकरींच्या उपस्थितीत घोरपडेंचा १३ रोजी भाजपप्रवेश

0
0
१३ सप्टेंबर रोजी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे,’ अशी माहितीही खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.

‘२४×७ पाणी पुरवठ्यासाठी १० टक्के लोक वर्गणीची अट रद्द’

0
0
‘गावांत २४×७ स्वच्छ निर्मळ पाणी मिळण्यासाठी गावांकडून १० टक्के लोक वर्गणीची अट राज्य सरकारमे काढून टाकली आहे. राज्य सरकार निधी देण्यासाठी कोठेही कमी नाही. तुम्ही मात्र दर्जेदार काम करा आणि करून घ्या,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

​मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह प्रवेश रखडले

0
0
राज्य सरकारने समाजकल्याण‌ विभागातर्फे राज्यात जिल्हा व तालुकास्तरावर करोडो रुपये खर्च करून सुरू केलेल्या मागासवर्गीय मुलामुलींच्या वसतिगृहामध्ये अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे व त्यातील गोंधळामुळे शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images