Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

काँग्रेसला महापौरपदाचे टेन्शन

0
0
सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर अलका राठोड यांची अडीच वर्षांची मुदत संपल्यामुळे नवीन महापौर निवडीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. काँग्रेसकडून महापौरपदासाठी सुशीला आबुटे तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीकडून प्रवीण डोंगरे यांनी अर्ज दाखल केले आहेत.

आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

0
0
जिल्हा परिषदेने गुरुवारी तालुकानिहाय बारा आणि दोन विशेष अशा १४ आदर्श शिक्षकांची नावे जाहीर केली. या नावांमध्ये काही नावे वादग्रस्त असूनही राजकीय दबावातून घुसडण्यात आल्याचे दिसून आले.

महेश जाधव यांचा ‘दक्षिणे’तून प्रचार सुरू

0
0
‘कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावे’ असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी केले. त्यांनी दक्षिण मतदारसंघातून गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांना आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.

गणपती निघाले गावाला...!

0
0
‘बाप्पा चालले गावाला...चैन पडेना आम्हाला’ असे म्हणत कोटीतीर्थ तलाव, राजाराम तलाव, कळंबा, बापट कॅम्प, भोसलेवाडी, रुईकर कॉलनी, कसबा बावडा या परिसरासह शहर उपनगरातील भक्तांनी सर्व विसर्जन स्थळांवर बाप्पाला अखेर निरोप दिला.

श्री महालक्ष्मी भक्त मंडळाचा गणपती ऑनलाइन

0
0
कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरातील श्री महालक्ष्मी भक्त मंडळाला १२४ वर्षांची परंपरा आहे. १८९० ला स्थापन झालेल्या या मंडळाच्या देखण्या गणेशमूर्तीची पूजा ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वाचकांसाठी ‘अलाइव्ह’ या मोबाइल अॅपच्या साह्याने पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

३३०० शाळांमध्ये ऐकवणार भाषण

0
0
शिक्षक दिनी कोल्हापूर जिल्ह्यातील सात लाख विद्यार्थी विविध माध्यमातून शाळांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकणार आहेत. ३ हजार ३०० शाळांमध्ये भाषण ऐकवण्यासाठी विविध प्रकारे व्यवस्था केली गेली आहे.

‘ड’ वर्गावरून नेटिझन्समध्ये संताप

0
0
कोल्हापूर शहर पुन्हा एकदा ‘ड’ वर्ग महापालिकेत राहिल्यामुळे नेटिझन्स सध्या तीव्र संताप व्यक्त करत आहेत. काही राजकीय नेत्यांमुळे शहराची हद्दवाढ होत नसल्याने कोल्हापूर पुन्हा ‘ड’ वर्ग महापालिकांच्या यादीतच राहिलेले आहे.

सात मतदारसंघांची यादी दिल्लीला

0
0
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील काँग्रेसचे सात उमेदवार जवळजवळ निश्चित झाले आहेत. त्याची अंतिम यादी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांकडे देण्यात आली आहे. यामध्ये आमदार सा. रे. पाटील व सत्यजित कदम यांचा समावेश असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

हद्दवाढ झाल्यास दुप्पट उत्पन्न

0
0
कोल्हापूर शहराचा विस्तार होत असताना आसपासची खेडी सुधारली पाहिजेत, ती मुख्य प्रवाहात सामील झाली पाहिजेत, असा व्यापक दृष्टीकोन ठेवून सतरा गावांचा प्रस्तावित हद्दवाढीत समावेश केला आहे. या गावांचा हद्दवाढीत समावेश करताना भौगोलिक सोय, भूसंलग्नता या बाबींना प्राधान्य दिले आहे.

४० हजारांवर मूर्ती दान

0
0
‘गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या,’ अशा अखंड जयघोषात, खोबरे-चुरमुऱ्याची उधळण करत चैतन्यरूपी बाप्पांसमोर गुरूवारी सायंकाळी निरोपाचे हात जुळले. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद देत भक्तांनी यावर्षी मूर्तीदान आणि काहिलीत विसर्जनासाठी मोठा प्रतिसाद दिला.

१९ गावांना ‘कड्या’चा धोका

0
0
‘महाबळेश्वर तालुक्यातील १९ गावांना माळीणसारखा कडा कोसळून अख्खे गावच्या गाव गडप होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या गावांतील २५७७ कुटुंबातील ७७४४ लोकांच्या जिवीतांला धोका पोहचू शकतो,’ असा अहवाल तहसीलदार अतुल म्हेत्रे यांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे.

‘राजाराम’ सुरू करणार को-जनरेशन

0
0
‘साखर उद्योगासमोर आव्हाने वाढत चालली आहेत. केंद्र सरकारच्या धोरणांचा थेट परिणाम या उद्योगावर होत आहे. त्यामुळे इथेनॉल, को-जनरेशन आदी पूरक प्रकल्पांना सरकारने सढळ सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे.

उमेदवारीच्या घोषणेची प्रतीक्षा

0
0
विधानसभा निवडणूक जवळ आल्यामुळे इच्छुक उमेदरावांनी वेळ वाया न घालविता कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्याची संधी साधली आहे. त्यातच गणेशोत्सव आल्याने अनेकांना आयती संधीच मिळाली. काहींनी मात्र गणेशोत्सवामुळे आपली उमेदवारी थांबविली आहे.

शहरात अंधार का?

0
0
आयआरबी कंपनी टोल वसुली करते, मग लाईटची दुरुस्ती का केली जात नाही ? अशी विचारणा स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केली. कंपनी लाइट दुरुस्ती करत नसेल तर महापालिकेने खराब दिव्यांची दुरुस्ती करावी असे आदेश यावेळी सभापती सचिन चव्हाण यांनी दिले.

गणेश विसर्जन मिरवणुकीवरून दोन गटांत मारहाण

0
0
कासारपुतळे (ता. राधानगरी) येथे घरगुती गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी गणपती पुढे नेल्याच्या कारणावरून दोन गटांत मारहाण झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

विसर्जनासाठी सज्जता

0
0
महापालिकेच्यावतीने रंकाळ्याजवळील दुसऱ्या खणीमध्ये सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. काँक्रीटचा धक्का पूर्ण करण्यात येत असून विसर्जन करुन जाणाऱ्या वाहनांसाठी रस्ताही बनवला जात आहे.

नगरसेवक रवी इंगवले यांच्यासह ३५ जण हद्दपार

0
0
नगरसेवक रवीकिरण इंगवले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहरप्रमुख राजू जाधव, भाजपचे सुरेश जरग, सम्राट कोराणे, अजित इंगवले यांच्यासह ३५ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. करवीर तालुका कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी हा आदेश बजावला.

बहुतांश शाळांत रेडिओवर ऐकवले भाषण

0
0
शहरासह राज्यातील सर्व शाळांमध्ये शुक्रवारी विद्यार्थी एकत्र जमले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी. त्यांच्या भाषणाची विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. सर्व शाळांमध्ये विविध माध्यमातून पंतप्रधान मोदी यांचे भाषणे ऐकविले जात होते.

... तर CMविरोधात अवमान याचिका

0
0
हायकोर्टाने राज्य सरकारला कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत योग्य त्या कार्यवाहीचे निर्देश सरकारला दिले होते. यामुळे हद्दवाढीच्या प्रकियेला स्थगिती देता येणार नाही. सरकारने हद्दवाढीला स्थगिती दिलीच तर सरकार व मुख्यमंत्र्यांविरोधात अवमान याचिका दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

‘कोल्हापूर दक्षिण’मधून लढणार

0
0
‘माझी लढाई कुणाचे उणे-दुणे काढण्यासाठी नाही. मी व्यक्तिद्वेषानेही लढणार नाही. माझी लढाई काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या धोरणांविरोधात आहे. जनतेच्या आग्रहामुळेच मी दक्षिण विभानसभा निवडणूक लढवण्यास तयार आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images