Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

लोककलेतील ‘गणेश वंदना’

0
0
श्री गणरायाचे प्रांरभीचे पूजन केवळ शुभकार्यापुरतेच मर्यादित नाही किंवा घरात तसेच मंदिरातही त्याला अग्रपूजेचा मान आहे असे नाही, तर संगीत-नाट्य-नृत्य-लोककला आदी कलेच्या प्रांतातही आधी नमन गणरायालाच केले जाते.

श्री गणेशाचा गणेशोत्सव

0
0
श्री गणेशाला वेदकाळापासून पूज्य मानले आहे. ऋग्वेदातील ‘ओम गणांना त्वा गणपती हवामहे’ नावाची ऋचेला श्री गणपती सूक्त म्हणतात. गणपती अथर्वशीर्षात गणेशाचे मूळ स्वरूप ओंकार मानले आहे.

आम्हा निवृत्तांचा ‘झाडाचा कट्टा’

0
0
आमच्या कट्ट्यावर एकमेकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर सल्लामसलत करीत असू. शिवाय सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयावरही चर्चा व्हायची. बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांना दिशादर्शकाचे कामही आमच्या कट्टा गँगतर्फे चालत असे.

तिच्या जन्मानंतर साखरवाटप

0
0
स्त्री भ्रूणहत्येच्या घटना घडत असताना, अकलूज येथील मोहिते-पाटील कुटुंबाने मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा चक्क हत्तीवरून साखर वाटून साजरा केला.

गणेशचतुर्थीच्या पूर्वसंध्येला ट्रॅफिक जॅम

0
0
गणेशचतुर्थीच्या पूर्वसंध्येला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वाद्यांच्या गजरात काढलेल्या गणेशमूर्तींच्या मिरवणुका व गणेशाच्या आगमनाच्या तयारीसाठी फुललेल्या बाजारपेठा यामुळे सायंकाळनंतर शहरात ठिकठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी झाली.

विसर्जनास यंदा इराणी खण बंद

0
0
गणेशमूर्ती विसर्जनासाठी खणीत आवश्यक पाणीसाठा नसल्याने आणि गेली कित्येक वर्षे गाळ न काढल्यामुळे यंदा इराणी खणीत गणेशमूर्ती विसर्जनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. २१ फुटी गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी इराणी खणीलगतच्या नव्या खणीचा प्रस्ताव पुढे आला आहे.

खरेदीचा उत्साह कायम

0
0
बाप्पांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी बाजारात खरेदीला उधाण आले होते. अधूनमधून कोसळणाऱ्या पावसांच्या सरीतही खरेदीचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता.

रूप बदलाचे

0
0
सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्राची एक सांस्कृतिक ओळख. गणेशोत्सवाचा काळ म्हणजे नितांत भक्तिभाव...

रेल्वे स्टेशनच्या इमारतीला भगदाड

0
0
सुरक्षेचे उपाय म्हणून रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या जाणाऱ्यांची कडक तपासणीची आवश्यकता असल्याचे यापूर्वी रेल्वेच्या सुरक्षा विभागाने सांगितले आहे. या पद्धतीची सुरक्षा दूरच, उपलब्ध यंत्रणेलाही छेद देण्याचा प्रकार स्टेशनवर सुरु आहे.

अमोल पोतदारची आत्महत्या

0
0
प्रतिसाद ग्रुप ऑफ कॅम्पेन्सचे चेअरमन व सीइओ अमोल बाळ पोतदारने (वय ३१) शाहूनगर परिसरातील बंगल्यात गळफास लावून आत्महत्या केली. गुरूवारी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना उघडकीस आली.

मांगल्याचा उत्सव सुरू

0
0
चैतन्य आणि मांगल्याचा पाऊस घेऊन आलेल्या गणेशोत्सवाला गुरूवारी बाप्पांच्या आगमनाने सुरूवात झाली. मोरयाचा अखंड गजर करत लाडक्या गणरायांची स्वारी चतुर्थीच्या पूर्वसंध्येलाच घरोघरी दाखल झाली आणि पुढचे अकरा दिवस साजऱ्या होणाऱ्या आनंदाची उधळण झाली.

टोलप्रश्नी स्वतंत्र बेंच

0
0
कोल्हापुरातील टोलप्रश्नी अंतिम निर्णयासाठी हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी दोन न्यायमूर्तींच्या स्वतंत्र बेंचची स्थापना केली आहे. त्यामध्ये न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती ए. के. मेनन यांचा समावेश आहे.

लाल परी; भारी विषारी

0
0
महाबळेश्वरमध्ये तीन ठिकाणी दुर्मिळ रानटी आळंबी (मशरूम) पाहायला मिळाली. लाल भडक पण विषारी असणारी ही आळंबी प्रामुख्याने सिक्कीममध्ये आढळते. या आळंबीने अभ्यासकांमध्ये कुतूहल जागृत झाले आहे.

संस्थांच्या गणपतीची पारंपरिक प्रतिष्ठापना

0
0
संततधार पाऊस असूनही भूतपूर्व सांगली संस्थानच्या गणपती पंचायतन संस्थेचा, तसेच विविध सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणपतींची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना झाली.

मिरजेत मिरवणुकीने गणरायाचे आगमन

0
0
मिरज शहरात अतिशय उत्साहात गणेशोत्सवाला सुरुवात झाली. लक्ष्मी मार्केट, सराफ कट्टा, गर्दीने फुलून गेले होते. उत्सवात गणरायाच्या सजावटीसाठी लागणारी फळे, फुले, आकर्षक सजावटीच्या विविध वस्तू नैवद्याचे विविध मिठाई आदी वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी गर्दी दिसत होती.

कॉलेजमध्ये हिरोगिरी करणाऱ्यांना दांडक्याचा ‘प्रसाद’

0
0
कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसवून कॉलेज परिसरात टिंगल-टवाळी करणाऱ्या टोळक्यांना अद्दल घडविण्यासाठी सातारा शहर पोलिसांनी दांडके उगरल्याने त्यांची बोबडी वळली. कॉलेज परिसरांमध्ये मात्र शांतता निर्माण झाली आहे.

अर्धी लढाई जिंकली, उर्वरितांसाठी आंदोलन

0
0
लिंगायत समाजातील पोटजातींचा ओबीसीत समावेश करावा यासाठी सुरू केलेली लढाई अर्धी जिंकली आहे. अद्याप ज्या पोटजातींचा ओबीसीमध्ये समावेश केला नाही, त्यांच्यासाठी लढाई सुरूच राहणार आहे.

आंदोलन तीव्र करणार

0
0
रासायनिक सांडपाणी थेट शेतात घुसत असल्याने जयसिंगपूर येथे संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी येथील ल. क. अकिवाटे औद्योगिक वसाहत कार्यालयावर हल्ला केला.

आरोग्य रक्षण, प्रदूषणाचे भान हवेच!

0
0
कालच वाजत गाजत, मिरवत घरोघरी, गल्लोगल्ली गणराय येऊन स्थानापन्न झालेले आहेत. आता सकाळ-संध्याकाळ आरती, प्रसाद यांची धामधूम उडून जाईल. दरवर्षी आपल्या घरी पाहुणा म्हणून येणारा हा देवबाप्पा आपल्या सर्वांचा लाडाचा देव आहे.

भुयारी गटर योजनेची निविदा रद्द करा

0
0
शहरातील वाढीव भागासाठी भुयारी गटर योजनेच्या ९७ कोटी रुपयांच्या निविदेला इचलकरंजी पालिकेच्या सभेत नियमबाह्यपणे मंजुरी देण्यात आली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images