Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जातीच्या दाखल्यांसाठी निदर्शने

$
0
0
भटक्या-विमुक्तांना जातीचे दाखले देण्यास प्रशासनाकडून अनेक अडचणी सांगितल्या जातात. आम्ही शंभर वर्षांहून अधिक काळ स्थानिक रहिवासी आहोत. मात्र, शिक्षणाअभावी आमच्याकडे १९६१ चा रहिवाशी पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे १९६१ ची अट शिथिल करून तत्काळ जातीचे दाखले देण्यात यावे या मागणीसाठी माजी आमदार लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी निदर्शने करण्यात आली.

घुणकीतील तिघांना खूनप्रकरणी जन्मठेप

$
0
0
जमिनीच्या वादातून चुलत भाऊ संदीप डोईफोडे याचा खून केल्याप्रकरणी श्रीकांत यल्लाप्पा डोईफोडे (वय ४५), प्रविण यल्लाप्पा डोईफोडे (३८) व शंकर आकाराम डोईफोडे (२६, सर्व रा. घुणकी, ता. हातकणंगले) या तिघांना केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश एन. जे. जमादार यांनी जन्मठेप आणि एक हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यातील संशयित जयश्री श्रीकांत डोईफोडे, वर्षा प्रविण डोईफोडे आणि माधुरी आकाराम डोईफोडे या तिघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

पांजरपोळात सुविधांचे तीन तेरा

$
0
0
कोल्हापूर महानगरपालिकेने वसवलेली एक बेवारस औद्योगिक वसाहत म्हणजे पांजरपोळ औद्योगिक वसाहत होय. १९८२ ला स्थापन झालेल्या या औद्योगिक वसाहतीमध्ये महापालिकेने प्लॉट वितरण करण्यापलिकडे अन्य कोणतेही काम केलेले नाही. या वसाहतीमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी विविध पातळ्यांवर निवेदने देऊन येथील असोसिएशन आता त्रस्त झाली असून महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचे औपचारिक सत्कार करणेदेखील बंद केले आहे.

मंगळवार पेठेतील रस्ते झाले ब्लॉक

$
0
0
मंगळवार पेठेतील दहाहून अधिक मंडळानी रस्ते अडविले आहे. बजापराव माने तालीम मंडळापासून ते लाड चौकापर्यंतचा सारा रस्ताच मंडळांनी व्यापल्याने या मार्गावरील वाहतूक बंद आहे. मिरजकर तिकटी ते संभाजीनगर रोडवरही पाच मंडळानी निम्मा मुख्य रस्ता व्यापला आहे. गणेशोत्सवात ही मंडळे वाहतुकीला अडथळा ठरणारी आहेत. मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी तर अंतर्गत रस्ते ब्लॉक झाले आहेत.

गणेशोत्सवातील खर्चाचा वाटा विकासकामांसाठी

$
0
0
गणेशोत्सवातील काही रक्कम प्रभागातील विधायक कामांसाठी खर्च करण्याचा निर्णय मंगेशकरनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. जवळपास २२ मंडळांनी या संकल्पनेस होकार दर्शवला आहे. या सर्व मंडळांकडून बुधवारी (२७ ऑगस्ट) भागातील कामांची जबाबदारी उचलण्यात येणार आहे.

स्वाभिमानीला १०, रासपला ७ जागा

$
0
0
महायुतीत सहभागी झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना व आरपीआयला प्रत्येकी दहा, राष्ट्रीय समाज पक्षाला सात तर तीन जागा शिवसंग्राम पक्षाला देण्याचा महायुतीचा फॉर्म्युला तयार झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या पक्षानी फारच ताणल्यास शेवटच्या क्षणी एखाद-दुसरी जागा वाढवून देण्यावर महायुतीच्या नेत्यांचे एकमत झाले आहे. जागावाटपावर आठवडाभरात शिक्कामोर्तब होईल.

पंचगंगा नदीचे प्रदूषण थांबवा

$
0
0
‘पंचगंगा नदीचे प्रदूषण थांबवा, त्यासाठी कडक उपाययोजना करा’ असे सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंचगंगा नदीच्या प्रदूषणाकडे लक्ष वेधले. पंचगंगा नदीच्या प्रदूषणास जबाबदार घटकांवर कारवाईचे संकेतही त्यांन दिले.

शाहूभूमीत लढण्याची ऊर्जा

$
0
0
‘छत्रपती शाहू महाराजांची भूमी ही प्रामाणिकपणा आणि समतेचा विचार देणारी आहे. अनेक आव्हानांना सामोरे जाताना येथूनच उर्जा मिळते. त्यामुळे देशात सुरू झालेल्या दहशत, हिटलरशाही, जातीय दंगे आणि सत्ता एकवटण्याच्या प्रयत्नांना राज्यात थारा न देता, पुन्हा विकासाभिमुख सरकार आणण्यासाठी आणि वाईट प्रवृत्तीविरोधात लढण्याची ताकद येथूनच मिळावी,’ अशी अपेक्षा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

बाप्पांसमोर प्लास्टिकची हिरवळ

$
0
0
बाप्पाच्या समोर आकर्षक आणि सुंदर आरास करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. यंदा जरा हटके लूक आणण्यासाठी लॉन तयार करण्याचे साहित्य बाजारपेठेत आले आहे. यंदा प्रथम प्लास्टिकचे ग्रासबॉल, ग्रासमेटिंग आणि आकर्षक फुलांची कमान अशा वेगवेगळ्या वस्तू दाखल झाल्यामुळे बाप्पाच्या सजावटीला वेगळाच थाट येणार आहे.

टोलप्रश्नी लवकरच तोडगा

$
0
0
रस्ते प्रकल्पाच्या मूल्यांकन अहवालाचा अभ्यास सध्या सचिव पातळीवर सुरू आहे. शिवाय कोल्हापूरच्या टोलप्रश्नावर काही पर्याय पडताळून पाहण्यात येत आहेत. यासंबंधी सर्वंकष विचार करून लवकरच मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी दिले.

सांगलीत पावसाने दाणादाण

$
0
0
गेल्या तीन-चार दिवसांतील सांगली-मिरजेत झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. दोन्ही शहरांतील सखल भागातील घरे, तसेच झोपडपट्ट्यांतून पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. मिरजेच्या शिवाजी क्रीडांगणाचे तळे झाले आहे. सांगलीतील अनेक भागांत पाणी साठले आहे.

चोरट्यांकडून १० मोटारसायकली जप्त

$
0
0
मोटारसायकल चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघा चोरट्यांना गावभाग पोलिसांनी अटक केली आहे. अमोल रामचंद्र फातले (वय २८, रा. गंगानगर) व राहुल सूर्यकांत साळोखे (वय २७, रा. भोईनगर) अशी या चोरट्यांची नावे असून त्यांच्याकडून दहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

५१ जणांना हद्दपारीच्या नोटिसा

$
0
0
गणेशोत्सव काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने गावभाग पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील ५१ जणांना हद्दपारीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच अन्य गुन्हे दाखल झालेल्या गुन्हेगारांवरसुध्दा तहसीलदारांसमोर शपथपत्र सादर करण्यासंदर्भातील नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत.

मंडपांकडे सोयीकस्कर दुर्लक्ष

$
0
0
गणेशोत्सव मंडळांनी नियमबाह्य मंडप उभारल्यामुळे वाहनधारक व नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. देवाचे काम म्हणून पोलिस व महापालिका प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत. मंडपांच्या चुकीच्या उभारणीमुळे उत्सवकाळात दोन आठवडे वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सजावटीचा कागदी थाट

$
0
0
एकीकडे थर्माकोल, प्लास्टिक, फायबर अशा सजावटीच्या विखळ्यात गणेशमूर्ती बसवणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र या गर्दीतही काही तरूण हात फक्त विविध रंगाचे आणि पोताचे कागद वापरून पर्यावरणपूरक सजावट करून या विधायक चळवळीत खारीचा वाटा उचलत आहेत.

यंदा वेळेत प्रतिष्ठापन?

$
0
0
कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या सवडीवर गणेश मूर्ती आणून तिची प्रतिष्ठापना करायची या प्रथेला थोडा फाटा देत गणेशचतुर्थीच्या पूर्वसंध्येला पारंपरिक पध्दतीने वाजत-गाजत गणेशाचे स्वागत करण्याची प्रथा अनेक मंडळांमध्ये रूढ होऊ लागली आहे. बुधवारी व गुरूवारी अनेक मंडळे मूर्ती पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणणार आहेत.

कोल्हापूरचा राजा

$
0
0
मुंबईच्या लालबागच्या राजाच्या प्रतिकृतीचे दर्शन पश्चिम महाराष्ट्र, कोकण व गोव्यातील भाविकांना घेता यावे म्हणून तीन वर्षाच्या प्रयत्नानंतर रंकाळवेस गोल सर्कल मित्र मंडळाला कोल्हापूरच्या राजाची मूर्ती बसविण्यास यंदा यश आले आहे.

पंप अॅक्शन गन ठरतेय प्रभावी

$
0
0
आंदोलने, दंगलीमुळे गेल्या काही वर्षांत कोल्हापूर शहर अशांत झाल्याच्या पार्श्वभूमीवर जमावाला पांगवण्यासाठी ‘पंप अॅक्शन गन’ कोल्हापूर पोलिस दलात दाखल झाल्या आहेत. जिल्ह्यात २७ गन आल्या असून शहरातील सर्व पोलिस ठाण्यासह संवेदनशील पोलिस ठाण्यातही त्या पाठवण्यात आल्या आहेत.

टस्कर जंगलाकडे परतले

$
0
0
आकस्मितपणे आजरा तालुक्याच्या पूर्व परिसरात प्रवेशलेला टस्कर आता पुन्हा तालुक्याच्या पश्चिम परिसरातील पेरणोली व वझरे गावाकडे वळला आहे.

गावच्या विकासासाठी सचिनकडून १ कोटी

$
0
0
मास्टर-ब्लास्टर खासदार सचिन तेंडुलकर यांच्या खासदार निधीतून जखीणवाडी (ता. कराड) गावच्या विकासासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी सोलरसिटी, सिमेंट काँक्रिटची बंदिस्त गटारे बांधण्यासाठी तसेच मूलभूत व पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणार आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images