Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

रिक्षा सौंदर्य स्पर्धा

$
0
0
गडहिंग्लज येथील रासाई क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने राज्यस्तरीय रिक्षा सौंदर्य स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. लक्ष्मी देवालय येथे झालेल्या स्पर्धेत कोल्हापूरच्या चाँद दस्तगीर शेख यांच्या रिक्षाने (एमएच ०९ जे-३८४३) प्रथम क्रमांक पटकावला.

देवरुखकरांची कॅमेऱ्यांची दुनिया

$
0
0
एखाद्या छंदातून कलेचा इतिहास आणि ज्ञानाचा खजिना कसा खुला होतो ? याचे उत्तम उदाहरण म्हणून संजीव देवरुखकर आणि त्यांचा मुलगा सर्वेश या पिता-पुत्रांनी जपलेल्या कॅमेऱ्यांचा संग्रहाकडे पाहता येईल. छंद म्हणून सुरू झालेल्या या संग्रहात सध्या साडेपाचशेहून अधिक कॅमेरे आणि अडीच हजारांहून अधिक छायाचित्रणकलेशी संबंधीत वस्तू आहेत.

प्रतापसिंह, धवलसिंह मोहिते शिवसेनेत

$
0
0
माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील त्यांच्या पत्नी पत्नी व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या पद्मजादेवी आणि पुत्र आणि जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी मंगळवारी मुंबईत मातोश्री येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

अनुसूचित जमातीत समावेश करा!: रामोशी-बेरड

$
0
0
रामोशी-बेरड समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जीवनावरील चित्रपटाच्या अनुदानाचा प्रस्ताव तत्काळ मंजूर करावा यांसह अन्य मागण्यांसाठी नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाच्यावतीने शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

प्रबोधनाचा जागर

$
0
0
पारंपरिक रितीरिवाजाला फाटा देत ‘श्यामची आई’ या पुस्तकाच्या पाचशे प्रती पै-पाहुण्यांना देऊन कसबा बावड्यातील चव्हाण कुटुंबीयांनी प्रबोधनाचा वेगळा पायंडा पाडला. आईच्या स्मृती जपण्यासाठी वाचन चळवळीची पताका आगळ्या पद्धतीने फडकविण्याचा हा उपक्रम अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरला.

RTOचे कम्प्युटर कालबाह्य

$
0
0
शिकाऊ लायसन्स घेण्यासाठी परीक्षा देण्यासाठी बसलेले असताना सर्व्हर डाउन होतो. नोंदणी करण्यासाठी सकाळपासून रांगेत उभे राहिलेले असताना ज्यावेळी कागदपत्रे सादर करण्यावेळी कम्प्युटर यंत्रणा बंद पडते. अशा अनेक अडथळ्यांच्या शर्यतीने येथील आरटीओ कार्यालयाला ग्रासले आहे.

रिक्षाचालकाची पत्नीसह आत्महत्या

$
0
0
आपटेनगर-कणेरकरनगर परिसरातील रिक्षाचालक शिवाजी पांडुरंग पोर्लेकर (वय ४०) आणि त्यांच्या पत्नी सिद्धी (३५) या दाम्पत्याने राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी तीन वाजता ही घटना उघडकीस आली.

राज्यात ८२ भोंदूबाबांवर कारवाई

$
0
0
गेले अनेक वर्षे सुरू असलेल्या बुवाबाजीला जादूटोणा विरोधी कायद्याने चांगलाच टोला दिला आहे. पोलिसांनी वर्षभरात या कायद्याखाली राज्यात ८२ बुवांवर कारवाई केली आहे. विशेष म्हणजे यातील अनेक गुन्हे पोलिसांच्याच पुढाकाराने दाखल करण्यात आले आहेत.

उद्धव ठाकरे उद्या कोल्हापुरात

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी (२१ ऑगस्ट) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कागल तालुक्यातील हमीदवाडा साखर कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे.

'आम्ही सारे दाभोलकर'

$
0
0
‘फुले, शाहू, आंबेडकर.. आम्ही सारे दाभोलकर,’ ‘आपले काम विज्ञानाचे...अंधश्रद्धा गाडण्याचे’ अशा घोषणात देत अंधश्रद्धा निर्मूलनाचे आयुष्यभर कार्य करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त फेरीद्वारे कार्याची जनजागृती करीत अभिवादन करण्यात आले.

गणेशोत्सवासाठी रेल्वे, बस सज्ज

$
0
0
येत्या गणेशोत्सवासाठी गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांसह भाविकांसाठी एसटीच्या कोल्हापूर विभागातून मुंबईसाठी ९० बसेस देण्यात येणार आहे. त्यासह व्होल्वोच्या सहा फेऱ्या आणि ४० बसेस सेवेसाठी तैनात राहणार आहेत. येत्या २७ आणि २८ ऑगस्टला ही सेवा दिली जाणार आहे. रेल्वे २८ ऑगस्टला खास सेवा देण्याच्या नियोजनात आहे.

कॅलिफोर्नियाच्या तज्ज्ञाचे द्राक्षसंशोधन

$
0
0
कमी पाण्यात टिकणाऱ्या द्राक्षाच्या प्रजाती विकसित करणे आवश्यक आहे, असे मत कॅलिफोर्निया यूनिव्हर्सिटीतील संशोधक डॉ. मार्क अॅलन मॅथ्यू यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

कोयनात ९३.६३ टीएमसी पाणीसाठा

$
0
0
कराड शहर व परिसराला बुधवारी दुपारी अचानक पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे शहरातील नागरिकांसह व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान, कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होऊन बुधवारी रात्री आठ वाजेपर्यंतचा पाणीसाठा ९३.६३ टीएमसी इतका झाला आहे.

टेम्पो अपघातात २६ जखमी

$
0
0
आळते (ता. हातकणंगले) येथे रामलिंग डोंगरावर रस्त्याकडेचे संरक्षक कठडे तोडून टेम्पो दरीत कोसळला. या अपघातात सहलीसाठी आलेले खोची हायस्कूलचे २६ विद्यार्थी जखमी झाले. यापैकी सात विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एसटीची भाडेवाढ

$
0
0
एसटी भाडेवाढीला अजून महिनाही पूर्ण होण्याआधी नवीन भाडेवाढ लागू झाली आहे. गुरुवारी (ता.२१) रात्री बारापासून नवीन भाडेवाढ लागू होणार आहे. साधी व जलद गाडीच्या भाड्यात फारशी नसली तरी रातराणी, निमआराम, वातानुकूलित भाड्यात एक रुपयापासून पाच रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

पाइप स्पायरल वेल्डेडच

$
0
0
थेट पाइपलाइन योजनेसाठी कोणती पाइप वापरणार यावरून गेले काही दिवस सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेला बुधवारी पूर्णविराम मिळाला. योजनेसाठी स्पायरल वेल्डेड पाइप वापरण्यात येणार असल्याचे युनिटी कन्सल्टंटचे संचालक महेश पाठक यांनी नगरसेवकांपुढे सांगितले.

महाडिक-सतेज पाटील तह

$
0
0
विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात महाडिकांच्या घरातील उमेदवार मिळावा म्हणून गेले दोन महिने महायुतीचे युध्दपातळीवर सुरू होते. पण लोकसभा निवडणुकी​त गृहराज्यमंत्र्यांनी केलेली मदत आणि आगामी गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाडिक यांनी एक पाऊल मागे घेतले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र यावे

$
0
0
‘धर्माच्या नावावर समाजात फूट पाडून दंगे घडवून भाजपला राज्य करायचे आहे. जनतेला फसवून सत्ता काबीज केलेल्या या विचारसरणीचे संपूर्ण देशासमोर आव्हान आहे. राज्यात या विचारसरणीला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्र आले पाहिजे,’ अशी अपेक्षा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार दिग्विजय सिंह यांनी बुधवारी व्यक्त केली.

फुटबॉलवेड पडद्यावर

$
0
0
कोल्हापुरातील फुटबॉलप्रेम आणि त्या अनुषंगाने वेडी असणारी तरुणाई पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न ‘द फायनल किक’ या सिनेमातून केला जाणार आहे.

नाइट ट्रेक आणि टनेल कुकिंग

$
0
0
‘चेन्नई एक्सप्रेस’ मध्ये दूधसागर धबधब्याचा वेगळाच निसर्ग पहायला मिळतो. हल्ली हा स्पॉट पर्यटकांच्या पसंतीला चांगलाच उतरला आहे. गोव्याची नवी ओळख बीचबरोबर दूधसागर धबधब्याचा ट्रेक अशीही होऊ लागली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images