Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

संध्यादेवींनाच पुन्हा संधी द्या

$
0
0
‘आघाडी सरकारने गेल्या दहा वर्षात उत्तम कामगिरी केली आहे. पोटनिवडणुकीनंतरच्या दीड वर्षात आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघात विकासाच्या माध्यमातून सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्यांना पुढील पाच वर्षासाठी संधी द्या,’ असे सांगत ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचा कल स्पष्ट केला.

कांदा, मिरचीच्या दरात घसरण

$
0
0
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यात मिरचीची आवक ३०० पोत्यांवर १५० पोत्यांपर्यंत कमी झाली होती. त्यामुळे मिरचीची शंभर रुपयांपर्यंत दरवाढ झाली होती. या आठवड्यात पुन्हा आवक वाढल्याने दरही कमी झाला आहे.

बस खरेदीचा उद्या फैसला

$
0
0
कधी कंपन्यांच्या प्रतिसादाअभावी तरी कधी तांत्रिक मुद्यावरून सदस्यांचे समाधान न झाल्यामुळ चारवेळा रद्द करण्यात आलेली केएमटी बस खरेदीच्या निविदेचा फैसला मंगळवारी (ता. १२ ऑगस्ट) होणार आहे.

सिगारेट न आणल्याने मारहाण

$
0
0
सिगारेट आणण्यास नकार दिल्याने नगरसेवक जहाँगिर पंडत यांनी सचिन सुनील इंगळे (वय २५, रा. बापूरावमनगर, कळंबा, ता. करवीर) याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्याशिवाय नगरसेवक पंडीत यांचा मुलगा मुन्ना याने सचिनच्या डोक्यात बिअरची बाटली मारुन जखमी केले.

ठेकेदाराचा ठेंगा, शिक्षण मंडळ हतबल

$
0
0
ई लर्निंगसाठी आवश्यक प्रोजेक्टर पुरविण्याकामी वारंवार टोलवाटोलवी करणाऱ्या ठेकेदाराने महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाला पुन्हा एकदा ठेंगा दाखविला आहे. ठेकेदाराला प्रोजेक्टरसाठी सात ऑगस्टपर्यंत ‘डेडलाइन’ दिली होती.

गोविंदाला सुरक्षा कवच

$
0
0
उंचच उंच बांधल्या जाणाऱ्या दहीहंडी, त्यासाठी ठेवण्यात येणारे भलेमोठे बक्षीस व त्या बक्षिसासाठी एकावर एक थर रचत हंडी फोडण्यासाठी सुरु असलेली गोविंदा पथकातील चढाओढ प्रेक्षकांना रोमांचक वाटत असली तरी हंडी फोडण्यासाठी शेवटच्या थरावर असलेल्या गोविंदाचा जीव धोक्यातच असतो.

महापालिकेचा ‘एलइडी’ प्रयोग

$
0
0
स्ट्रीट लाइटसाठी प्रचंड वीज खाणाऱ्या परंपरागत ट्यूब, सोडियम व्हेपर, मर्क्युरी लाइटऐवजी एलइडी बसवण्याचा विचार महापालिका करीत आहे. सध्या सोडियम व्हेपर, मर्क्युरी, हायमास्टसारख्या एका लाइटसाठी ४०० वॅटहून अधिक वीज लागते.

गुरुजींचे पहिले पाढे पंचावन्न

$
0
0
एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, एकेरी शब्दोच्चार, मंजूर मंजूर अशा गदारोळात दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची ७६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी पार पडली. कोअर बँकिंग, आरबीआयचा दंड, हातकणंगलेतील जागा विक्री प्रकरण, नफ्यातील तफावत, कर्जांचा व्याजदर आणि मागासवर्गीय सभासदांना कर्जवाटप होत नसल्याचे आरोप यावेळी करण्यात आले.

लिंगायतांनाही आरक्षण?

$
0
0
लिंगायत समाजाच्या ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार समिती स्थापन करणार असून, या बाबतची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री लवकरच करतील, अशी माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीला स्वकीयांपासूनच धोका

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या लाटेत तरलेल्या शिवसेनेला चांगलेच बळ मिळाले आहे.

आरक्षणासाठी उपोषणाचा निर्धार कायम

$
0
0
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, या मागणीसाठी इस्लामपूर शहरातील उपोषणास बसलेल्या युवकांची ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी भेट घेऊन उपोषण सोडण्यास सांगितले.

मुख्यमंत्री चव्हाणांचा पराभव करणारच

$
0
0
‘जिल्ह्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. परंतु त्यांना कॉग्रेसच्याच स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. जिल्ह्यातही त्यांना विरोध असून, त्यांचा पराभव करणारच आहे.

आजचं न्यू जनरेशन

$
0
0
सोबतच्या कलाकृतीत नव्या पिढीतील एक प्रातिनिधिक व्यक्तिरेखा आहे. २२-२३ वर्षांचा एक तरूण आडव्या पाइपला टेकून कोणाची तरी वाट पाहत उभा आहे. अंगावरील शर्ट मागच्या पाइपवर दिसत असून, त्याच्या पायात चपला नाहीत. ज्या हाताचा कोपरा त्या पाइपवर टेकवला आहे, त्या हातात मोबाइल असून, नुकताच तो एखाद्या मित्राला फोन करून कोठे तरी जाण्याच्या तयारीत आहे.

सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी

$
0
0
गणेशोत्सवामध्ये डॉल्बी लावण्याबाबत सत्तारूढ काँग्रेसने आपली भूमिका जाहीर करावी, असा आग्रह विरोधी शहर विकास आघाडीने धरल्यामुळे सोमवारच्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्तारुढ व विरोधकांमध्ये खडाजंगी झाली.

आयसोलेशनमध्ये ‘इबोला’साठी कक्ष

$
0
0
‘इबोला’ या आजाराबाबत नागरिकांना सतर्क व दक्ष राहण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे केले आहे. महापालिकेने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आयसोलेशन हॉस्पिटल येथे स्वतंत्र कक्ष सुरू करून पाच बेड्सची सोय केली असून, तीन वैद्यकीय पथकांची स्थापना केली आहे.

सुटीदिवशीही पाळले ‘कर्तव्याचे बंधन’

$
0
0
कार्यालयीन कामात दांड्या मारणे, कामकाजात कुचराई करणे अशी ओळख अनेक सरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांबाबत असते. मात्र, याला काहीजणांचा अपवाद असतो. आपल्या कामातही ते प्रामाणिकपणे सामाजिकता जपण्याचा प्रयत्न करतात.

१०८ जोडप्यांनी सोडला उपवास

$
0
0
हिंदू धर्मात श्रावणाला असलेले महत्व लक्षात घेऊन आमदार राजेश क्षीरसागर यांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक उपवास सोडण्याच्या कार्यक्रमाल उत्सुफूर्त प्रतिसाद मिळाला.

जोतिबा डोंगरावर नगरप्रदक्षिणा

$
0
0
श्रीक्षेत्र जोतिबा डोंगरावर नगरप्रदक्षिणा सोहळा संपन्न झाला. चांगभलं...च्या गजरात हजारो भाविकांनी गायमुख, पांढरवाना, गिरोलीमार्गे मंदिर अशी नगरप्रदक्षिणा घातली. जोतिबा यात्रेबरोबरच खेटे आणि नगरप्रदक्षिणेला भाविकांची संख्या वाढत आहे.

मुरगूडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

$
0
0
मुरगूड शहराच्या भरवस्तीतील पाच कुलूपबंद घरांत धाडसी चोरी करून अज्ञात चोरट्यांनी २५ तोळे सोन्यासह ५७ हजारांची लूट केल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

बालवाडी शिक्षिकांनी महामार्ग रोखला

$
0
0
बालवाडी वर्गांना सरकारने मान्यता द्यावी, बालवाडी शिक्षिक-सेविकांना सरकारकडून वेतन मिळावे, बालवाडीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा, फौजिया खान यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यास समितीच्या शिफारशींना मंत्रिमंडळामध्ये मंजूरी मिळावी, बालवाडी गटासाठी निश्चित अभ्यासक्रम असावा आदी मागण्यांसाठी बालवाडी शिक्षिका-सेविका महासंघाने सोमवारी तावडे हॉटेल येथे महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images