Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

गिरणी कामगारांचा ९ ऑगस्टला मोर्चा

$
0
0
मुंबईच्या बंद गिरण्यांचे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील हजारो गिरणी कामगार मुंबईतील मोर्चात सहभागी होणार आहेत. ९ ऑगस्टला सर्व श्रमिक संघाच्यावतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

राष्ट्रीय कृषी विमा योजनेस मुदतवाढ

$
0
0
मान्सूनने सुरुवातीला ओढ दिल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या वेळेत पूर्ण होऊ शकल्या नाहीत. यामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकरी राष्ट्रीय कृषी विमा योजनेपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला होता. विमा योजनेचा सर्व शेतकऱ्यांना फायदा होण्याकरिता या योजनेला सरकारने १६ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

चंदगडमध्ये विविध संघटनांकडून कर्नाटक पोलिसांचा निषेध

$
0
0
येळ्ळूर येथे कर्नाटक पोलिसांनी निष्पाप ग्रामस्थांना बेदम मारहाण केली. ही घटना लोकशाहीला व माणुसकीला अशोभनीय असल्याने तिचा निषेध पंचायत समिती, शिवेसना व स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला.

‘कोल्हापूर दक्षिण’ मध्ये इच्छुकांची वाढती संख्या

$
0
0
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाच्या विद्यमान आमदारांकडून मतदारसंघातील जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले असून त्यांची हुकुमशाही सुरू आहे. यामुळे लोकांना बदल हवा आहे. त्यासाठी कोल्हापूर दक्षिण मतदार संघात भाजपकडून निवडणूक लढवणार आहे, असे माणिक पाटील चुयेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

संभाजीपूरला पाच कोटींची पाणी योजना मंजूर

$
0
0
शिरोळ तालु्क्यात दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या संभाजीपूर ग्रामपंचायतीस राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाच कोटी रूपयांची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. वर्षभरात ही योजना कार्यान्वित होईल, अशी माहिती सरपंच सविता पाटील कोथळीकर यांनी पत्रकार बैठकीत दिली.

कर्नाटक थंड हवेचे ठिकाण आहे का?

$
0
0
‘राज्य सरकारने उद्योजकांना अधिकाधिक सुविधा दिल्या आहेत. सबसिडी, विजेचा अखंड पुरवठा, व्याज सवलत, अधिक जागा वापरण्याबाबत सवलत एवढे करून देखील जर उद्योजक कर्नाटकात जात असतील तर मग तिथे थंड हवेचे ठिकाण असायला हवे’ अशी उपहासात्मक टीका उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केली.

मराठा भवनसाठी जमले ३५ लाख

$
0
0
विधीमंडळाचे एकदिवसीय अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा कायदा बनवावा असा ठराव शाहू सांस्कृतिक भवनातील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात केला. या अधिवेशनात कोल्हापुरात मराठा भवनसाठी निधी जमविण्यास सुरुवात झाली.

‘महापालिका क्षेत्रात पेट्रोलचे दर समान ठेवा’

$
0
0
राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रात पेट्रोलजन्य पदार्थांवर एकसारखाच एलबीटी आकारण्यात यावा आणि त्याची अंमलबजावणी व्हावी. अन्यथा मुंबई वगळता राज्यभरात ११ ऑगस्टपासून सर्व पेट्रोल आणि डिझेल पंप बेमुदत बंद ठेवण्यात येतील...

आवड तुला बेलाची...

$
0
0
श्रावण महिन्यात सण, आणि उपवासांची रेलचेल असते. व्रतवैकल्ये करणाऱ्यांची संख्या मोठी. साहजिकच पूजेच्या साहित्याला या महिन्यात मोठी मागणी असते. हारफुलासोबतच बेलला देखील पूजेत महत्त्वाचे स्थान असून विशेषता शंकराला बेल वाहिला जातो.

ई-कचऱ्याचा पर्यावरणाला धोका

$
0
0
सध्या पर्यावरण संवर्धनासाठी सर्व पातळीवर अनेक उपाययोजना आखल्या जात आहेत. मात्र दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन बिघडण्यासाठी ई-कचरा मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत आहे. पर्यावरण रक्षणसाठी आता ई-कचऱ्याची विल्हेवाट लावणे आवश्यक असून याबाबत जनजागृती होण्याची आवश्यकता आहे.

खड्डेच खड्डे चोहीकडे

$
0
0
शहरातली हायफाय वस्ती. ब्रँडेड वस्तूंची अलिशान बाजारपेठ. तरुण-तरुणींचे उभारण्याचे पॉइंट, अशी एकच नव्हे तर अनेक गोष्टींसाठी प्रसिध्द असलेल्या राजारामपुरीचा मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे चोहीकडे असा बनला आहे.

आरक्षणप्रश्नी सरकार दुटप्पी

$
0
0
‘आघाडी सरकारकडून आलेल्या अनुभवामुळे मराठा समाज कुंपण ओलांडून भाजपकडे आला ही मोठी बाब आहे. महायुती सत्तेवर आल्यानंतर या समाजाचे आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जातील,’ असा विश्वास विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

आरक्षणाविरोधातील लढाईस तयार

$
0
0
‘सर्व कायदेशीर प्रकिया तपासूनच मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला आहे. कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेतल्याने कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही. मंत्रीमंडळाने न्यायिक प्रक्रिया पूर्ण करून आरक्षण लागू केल्याने कायदेशीर लढाईला तयार आहे,’ असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीने महामार्ग रोखला

$
0
0
येळ्ळूर येथे मराठी भाषिकांवर कर्नाटक पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. पुणे - बंगळूर महामार्गावर दूधगंगा नदीवर दोन्ही राज्याच्या सीमारेषेवरच हे आंदोलन झाले.

विजय कोंडकेंचा राजीनामा

$
0
0
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या उपाध्यक्षांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देणाऱ्या महामंडळाचे सदस्य छाया सांगावकर, अर्जुन नलवडे आणि सुरेंद्र पन्हाळकर यांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव महामंडळाच्या तातडीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

रंकाळ्यात लवकरच याटिंगचा थरार

$
0
0
कुस्ती, फुटबॉल आणि नेमबाजीपाठोपाठ आता वॉटर स्पोर्टसमधील गेम येथे रुजवण्यासाठी काही संस्था प्रयत्नशील आहेत. यामुळेच शालेय खेळात नुकताच समावेश केलेल्या याटिंगची (नौकायन) मुहूर्तमेढ रोवण्यात येणार आहे. भारतीय याटिंग असोसिएशनशी संलग्न कोल्हापूर याटिंग असोसिएशन यासाठी लवकरच रंकाळा तलावात स्पर्धेचे आयोजन करणार आहेत.

महामार्गाच्या सहापदरीकरणाचा शेतकऱ्यांना बसतोय भुर्दंड

$
0
0
पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारच्या सहापदरीकरणात सातारा जिल्ह्यात विशेष करून वाई तालुक्यात रस्त्याखालून जाणारे ओढे-नाले भराव टाकून अडविल्याने बाजूच्या शेतीत पावसाचे पाणी शिरून मातीसह शेतातील उभी पिके प्रवाहाबरोबर वाहून गेली आहेत.

‘संग्राम’चे अध्यक्ष सूर्यवंशींसह तेरा जणांवर गुन्हा दाखल

$
0
0
हल्ला करून ठेवीदाराला गंभीर जखमी केल्याप्रकरणी संग्राम नागरी पतसंस्थेचा अध्यक्ष आणि महापालिकेचा माजी गटनेता किरण सूर्यवंशी यांच्यासह तेरा जणांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

भारत २०१७पर्यंत विश्वगुरू होईल!

$
0
0
‘अध्यात्म आणि विज्ञानाच्या एकात्म ज्ञानातून भारत २०१७पर्यंत विश्वगुरु होईल,’ असा विश्वास डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केला आहे. लोकनेते राजारामबापू पाटील नगर व्याख्यानमालेत ते बोलत होते.

कोयना धरणाला भूकंपाचा सौम्य धक्का

$
0
0
कोयना धरण परिसरात सोमवारी दुपारी झालेल्या भूकंपाने कोयनेसह पाटण, कराड, कोकणातील पोफळी, चिपळूण परिसर काही क्षण हादरल्याने लोकांमध्ये घबराट पसरली होती. मात्र, त्याची तिव्रता कमी असल्याने त्याचा कोणतेही नुकसान झाले नाही.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images