Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कारवाई कठोरच हवी

$
0
0
आरोप प्रत्यारोपानंतर बुधवारी आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आले. या निर्णयानंतर सर्वसामान्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एखादा अधिकारी आमदाराशी जर उद्धटपणे वागत असेल तर सर्वसामान्य लोकांशी कसे वागेल असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

अॅप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी

$
0
0
तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्र या दोन्ही शाखांतील एक परवलीचा शब्द म्हणजे अॅप्रो‌प्रिएट टेक्नॉलाजीची गरज. परदेशातील तंत्रज्ञान आपल्या देशात लागू करण्याचे सरसकट प्रयत्न होत असताना, देशाच्या गरजा पाहून तयार केलेल्या तंत्रज्ञानामुळे देशातील कितीतरी नागरिकांचे जीवन सुखकर बनले आहेच, शिवाय ते तंत्रज्ञानही आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहिले आहे.

टाकळकर कॉलनीतील रस्त्यांचे डांबरीकरण करा

$
0
0
कोल्हापूर शहरातील रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच टाकळकर कॉलनीतील अंतर्गत रस्ते ड्रेनेज कामासाठी उकरून ठेवले. ड्रेनेजचे काम पूर्ण होऊन एक वर्ष झाले तरी उकरलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण झालेले नाही.

समजले ते उमजले का?

$
0
0
एकेकाळी साहित्य, कला यांच्याविषयीच्या लिखाणात एक संस्कृत वचन हमखास आढळायचं, ‘काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम्’. ही हितोपदेशातली उक्ती आहे. बुद्धिमान माणसं आपला वेळ काव्य, कला आणि मनोविनोदन यांमधे व्यतीत करतात, असं या उक्तीचं सांगणं आहे.

मुक्त विद्यापीठ देणार जलव्यवस्थापनाचे धडे!

$
0
0
पाऊस भरपूर आहे, पण पाण्याच्या नियोजनाचा अभाव असल्याची स्थ‌िती आहे. पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागेल. या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी, पाण्याच्या व्यवस्थापनाविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि राज्य सरकारच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘जल व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम’ सुरू करण्यात आला आहे.

प्लॅटफॉर्म विस्ताराने वेटिंग संपणार

$
0
0
शहरात रेल्वे आली आणि थांबली. शहराच्या विकासात रेल्वेचा मोठा वाटा आहेच. पण थांबलेल्या रेल्वेमुळे काही अडचणीही निर्माण झाल्या. त्यामुळे आता या रेल्वेच्या सर्वंकष विस्ताराची गरज आहे. मार्केट यार्डातील मोठी जागा त्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

पार्किंगचा ठेका अडकला टक्केवारीत

$
0
0
पार्किंगचा ५५ लाख रुपयांचा ठेका देण्याचा निर्णय टक्केवारीत अडकल्याने महापालिकेला १५ लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने महत्त्वाच्या ठिकाणांचा ठेका घेऊन मंत्र्याच्या नावाचा वापर करत तडजोड न केल्याने पार्किंगच्या ठेक्याला काँग्रेसने ‘नो एंट्री’ दाखवली आहे.

पुन्हा सुवर्णयुगाकडे

$
0
0
कोल्हापूरच्या चित्रपटनिर्मिती परंपरेला मोठा इतिहास आहे. या इतिहासाच्या केवळ गप्पा मारून आता चालणार नाही. चित्रनगरी हा एक मोठा अॅसेट कोल्हापूरला मिळाला आहे. मुंबईतील चित्रनिर्मितीचा वाढता खर्च लक्षात घेता निर्मात्यांना कोल्हापूरकडे वळवणे शक्य आहे. येथील तंत्रज्ञ आणि कलाकारांना त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.

पाऊस आला; आम्ही नाही पाहिला

$
0
0
सांगली जिल्ह्यात गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली. कोयना-वारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस कमी होत आहे. परंतु, कोयना धरणातून ६२ हजार ८७८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ कायम आहे. कृष्णा आणि वारणा या नद्यांच्या पात्रातून पाणी बाहेर पडत असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने दक्षतेचा इशारा दिला आहे.

‘त्र्यंबोली’ची धामधूम

$
0
0
आधुनिकतेचे वारे वाहू लागले असले तरी कोल्हापूर शहराने ग्रामीण बाज जपला आहे. आषाढाच्या सरी कोसळू लागल्या की, करवीरकरांना वेध लागतात ते त्र्यंबोली देवीच्या यात्रेचे. नदीला आलेल्या नव्या पाण्याचे पूजन करून ते देवदेवतांना वाहण्यासाठी करवीरनगरी सज्ज झाली आहे.

दुकाने तेवीस हजार, अधिकारी आठ

$
0
0
जिल्हयात पानपट्या पाच हजार, दहा हजार किराणा मालाची दुकाने, दूध संकलन केंद्रे व डेअरींची संख्या ३७१९, दोन हजारांवर हॉटेल्स व खानावळी, अडीच हजारांवर टी स्टॉल अशा साधारणतः २३ हजार दुकानांत अन्न भेसळ होवू नये, मावा, गुटखा विकला जावू नये यासाठी कारवाई करणारे अधिकारी आहेत फक्त आठ.

दुष्काळी भागात आजही टँकरने पाणीपुरवठा

$
0
0
सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात संततधार पडत असलेल्या पावसाने पूर्व भागात मात्र पाठ फिरवल्याने माण व खटावसारख्या दुष्काळी भागातील लोकांना आजही टँकरनेच पाणीपुरवठा केला जात आहे. या भागातील जनतेने आम्हाला पाणी वाटपासाठी आजही टँकरची वाट पहावी लागत आहे, म्हणून आणखी ५० टँकरची मागणी केली आहे.

नाले व्यवस्थापनाबाबत पुन्हा ३० जुलैला बैठक

$
0
0
पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखणाऱ्या १२ नाल्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी ३२ कोटी रूपये खर्चाच्या प्रस्तावाला गुरूवारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्री दिलीप सोपल यांनी तत्वतः मान्यता दिली. यासंदर्भात ३० जुलै रोजी पुन्हा बैठक होणार आहे.

रघुनाथदादा पाटील यांच्यासह आठ जणांना अटक

$
0
0
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुनवर्सन अधिकारी मनीषा कुंभार यांच्या कार्यालयात घूसून त्यांना शिवीगाळ, क्लार्कला मारहाण केल्याप्रकरणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्यासह आठ जणांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

डॉ. लहाने यांना पुरस्कार

$
0
0
डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठान, संभाजीराव शिंदे विद्यामंदिर व सुशील रसिक सभा यांच्यावतीने ज्येष्ठ साहित्यिक डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्यसेवा आणि समाजसेवा पुरस्कारांची घोषणा गुरुवारी सोलापुरात करण्यात आली.

चारुता सागर यांचे साहित्य कन्नडमध्ये

$
0
0
प्रसिद्ध दिवंगत कथा लेखक चारुता सागर यांच्या निवडक गाजलेल्या कथांचे आता कन्नड भाषेत भाषांतर होणार आहे. ज्येष्ठ भाषांतरकार डॉ. चंद्रकांत पोकळे हे या कथांचे भाषांतर करणार आहेत.

विशेष मुलांच्या आयुष्याचे ‘कुंपण’

$
0
0
विशेष मुलांनाही (मतिमंद) समाजात चांगली वागणूक मिळावी, त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन सकारात्मक हवा, या उद्देशाने निपाणी तालुक्यातील बेनाडी येथील एका शेतकऱ्याच्या मुलाने विशेष मुलांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणारा ‘कुंपण’ हा चित्रपट बनवला आहे.

उद्योजक निगडे यांचा मृत्यू

$
0
0
मानसरोवर यात्रेला गेलेल्या कोल्हापुरातील उद्योजक मनोज बाबूराव निगडे (वय ४२, रा. राजारामपुरी) यांचा गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. १७ जुलै रोजी ते वीस मित्रांसोबत मानसरोवरला गेले होते.

उघडीप, तरीही धोका

$
0
0
शहरात गुरुवारी दुपारपर्यंत उघडीप दिली असली तरी पुढील ​तीन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उघडीप वाटलेल्या गुरुवारची पावसाची सरासरी ४१. १ मिलिमीटर इतकी होती. पुढील तीन दिवस वर्तवलेला अंदाज सरासरी ४८ ते ५५ मिलिमीटरचा आहे.

चित्रनगरीच्या विकासासाठी

$
0
0
कोल्हापूर हे मराठी चित्रपट व्यवसायाचे माहेर घर. १९१९ पासून कै. बाबूराव पेंटरांनी इथे चित्रपट निर्मिती चालू केली. पुढे पेंटरांच्या पाठोपाठ त्यांच्याच शिष्यांनी दामले, फत्तेलाल, व्ही. शांताराम आणि धायबर यांनी एकत्र येऊन प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली आणि कोल्हापूरचे नाव जगाच्या नकाशावर अजरामर केले. एक काळ असा होता की कोल्हापुरात चित्रपट निर्मितीचे सुवर्णयुग अवतरले होते.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images