Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आरक्षणासाठी धनगर समाजाचे मोर्चे

$
0
0
धनगर समाजाचा अनुसुचित जमातीत समावेश करावा या मागणीसाठी जिल्ह्यात सोमवारी विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या राज्य सरकारमधील मंत्र्यांचा यावेळी निषेध करण्यात आला.

‘कागल’ मुश्रीफांची जहागिरी नव्हे

$
0
0
‘कागल विधानसभा मतदारसंघ ही मुश्रीफांची जहागिरी नाही. दोन वर्षापूर्वी झालेली जिल्हा परिषद निवडणूक, हमिदवाडा साखर कारखान आणि लोकसभा निवडणुकीत जनतेने कागलमध्ये मुश्रीफांना धूळ चारली असल्याचे ते सोयीनुसार विसरले आहेत.

ठिबक सिंचनाचे डोंगराएवढे उद्दिष्ट

$
0
0
मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार साखर कारखान्यांमार्फत ऊसउत्पादक शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजना सक्तीची करण्याचा निर्णय गतवर्षी घेतला होता. मात्र पाण्याची भरमसाठ उपलब्धता असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात ही योजना फारशी गांभीर्याने घेतलेली नाही.

महालक्ष्मीची मूर्ती पुन्हा सराफ संघात

$
0
0
कोल्हापूर सराफ व्यापारी संघात सुरू असलेल्या वाद संपण्याची चिन्हे नाहीत. सध्याचे अध्यक्ष नगरसेवक रणजित परमार आणि माजी अध्यक्ष सुरेश गायकवाड यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्यानंतर गायकवाड आणि माजी अध्यक्ष सुरेंद्र पुरवंत आणि अमोल ढणाल यांच्या वादाची ठिणगी पडली आहे.

षष्ठी यात्रेसाठी तयारी

$
0
0
जोतिबा डोंगरावर एक व दोन ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या श्रावण षष्ठी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी वाहतूक व्यवस्था व पार्किंग व्यवस्थेत बदल केले आहेत. जोतिबा डोंगरावर होणाऱ्या या यात्रेसाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे.

‘महालक्ष्मी’ला सोन्याची पालखी

$
0
0
करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीसाठी लोकवर्गणीतून सोन्याची पालखी बनविण्यात येणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पालखीच्या निर्मितीसाठी संयोजन विश्वस्त मंडळ तयार करून त्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांना पालखीसाठी सोने देण्याचे आवाहन करण्यात आले.

श्रेयवादाचे ‘मैदान’

$
0
0
गांधी मैदानाच्या सुशोभिकरणाच्या मुद्यावरून सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील वातावरण चांगलेच तापले. नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावरील टिकेमुळे अस्वस्थ झालेल्या समर्थक नगरसेवकांनी सभागृहात गांधी मैदानाला निधी कोणी दिला ?

सर्व्हर डाऊनचा विद्यार्थ्यांना मनस्ताप

$
0
0
शिवाजी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे शुल्क भरण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना सर्व्हर डाऊनचा फटका बसला. त्यामुळे सुमारे पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना सकाळपासून मनस्ताप सहन करावा लागला.

महापौरपदाच्या आम्हीच दावेदार

$
0
0
कोण पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या म्हणून, तर कोण गतवेळेला संधी असूनही नेत्यांच्या शब्दाखातर पद डावलल्यामुळे आता महापौरपदाच्या शर्यतीत आहेत. आगामी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे महापौरपद आहे.

पुन्हा दमदार!

$
0
0
दोन दिवस उघडीप दिलेल्या पावसाने रविवारी मध्यरात्रीपासून पुन्हा जोरदार सुरुवात केली आहे. पुढील ४८ तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

‘गोकुळ’चा उच्चांक

$
0
0
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) एका दिवसात १२ लाख लिटर दूध विक्री करण्याचा उच्चांक केला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप माने-पाटील यांनी दिली.

हृदयाची गोष्ट

$
0
0
मानवी देहाच्या एखाद्या अवयवाबद्दल गूढ वाटणं, अनामिक भीती वाटणं किंवा तो काव्यमय वाटणं हे शक्य झालंय ते फक्त हृदय या अवयवाबद्दल. हृदयाबद्दल एव्हाना वाटणारी अनामिक भीती कशी हृदयाचे ठोके चुकवणारी असायची.

चार डाएटचा पगार लॉक

$
0
0
विविध प्रकारच्या शैक्षणिक आणि विकास कामासाठी दिलेल्या अनुदान रकमेचे युटीलायझेशन ग्रॅण्ट सर्टिफिकेट न दिल्याने आणि कर्मचाऱ्यांचा वेतनाचे बीम्स (बजेट इस्टिमेशन आलोकेशन अॅण्ड मॉनिटिअरिंग सिस्टीम) वेळेत सादर न केल्याने राज्यातील चारवर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील (डाएट) कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले आहे.

शिक्षणाची आस अन् जिद्दीचे बळ

$
0
0
तो धनगर कुटुंबात जन्मला. तीन वर्षाचा असताना वडीलांचे छत्र हरपले. तीन मुली व एका मुलाचा सांभाळ करणे व घर चालविणे शक्य नसल्याने आईने त्याचे शिक्षण बंद केले.

पंचगंगेत पकडली १२ फुटी मगर

$
0
0
रुई (ता.हातकणंगले) येथील पंचगंगा नदीपात्रात सुमारे १२ फूट लांबीची मगर ‘पिपल्स अॅनिमल’ च्या प्राणीमित्रांनी व गावकऱ्यांनी पकडून वनविभागाच्या ताब्यात दिली. ही मगर पाहण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.

निकृष्ट दर्जाचा सांडवा गेला वाहून

$
0
0
हेदवडे पैकी काळम्मावाडी (ता. भुदरगड) येथे वसुंधरा पाणलोट व एकात्मिक विकास योजने अंतर्गत दोन महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्चून नुकताच बांधलेल्या वादग्रस्त बंधाऱ्याचा सांडवा पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचा नमुना जनतेसमोर आला आहे.

राधानगरी धरण ८७ टक्के भरले

$
0
0
संपूर्ण जून महिना दडी मारलेल्या पावसाने मागील पंधरवड्यात जिल्ह्यात चांगलाच जोर धरला. जिल्ह्यातील मोठी धरणे भरण्याच्या मार्गावर असून लहान धरणे भरली आहेत.

जिल्ह्यात पावसाचा पुन्हा जोर

$
0
0
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाने पुन्हा दमदार सुरूवात केली आहे. सोमवारपेक्षा मंगळवारी पावसाचा जोर जास्त असल्यामुळे धरणांतील पाणीपातळीत चांगली वाढ झाली आहे.

‘सारस्वत’ची सभा उधळवू

$
0
0
‘सारस्वत बँकेच्या प्रशासनाने जातीयवादी धोरणांचा अवलंब करून बहुजन समाजाची मुस्कटदाबी केली आहे. मराठा बँकेच्या कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे.

एक कुटुंब, एक नोकरी

$
0
0
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची सर्वांगीण प्रगती व्हावी या उद्देशाने राज्य सरकारने १८ ते ३५ वयोगटातील युवक-युवतींमधील कौशल्य विकसित करण्याची योजना हाती घेतली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images