Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

६० बंधारे पाण्याखाली

$
0
0
कोल्हापूर जिल्ह्यात गेले तीन दिवस सुरू असणारा संततधार पाऊस मंगळवार रात्रीपासून धुवांधार कोसळला. यामुळे जिल्ह्यातील ६० बंधारे पाण्याखाली गेले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नद्यांना पूर आला असून शिवारांत पाणीच पाणी झाले आहे. धरणसाठ्यांतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

खासगी वापरासाठी वनजमीन

$
0
0
राज्याच्या वनविभागाने वर्षभरात ३२ वनजमिनी खासगी वापरासाठी देण्याचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. त्यामुळे सुमारे दोन हजार हेक्टर वनजमीन खासगी वापराखाली आली आहे.

तपास अधिकारीच फितूर

$
0
0
कराड येथील संजय पाटील खून खटल्यात तपासी अधिकारी संभाजी पाटील यांनाच कोर्टाने फितूर घोषित केल्यामुळे या खटल्याला वेगळेच वळण लागले. जिल्हा सरकारी वकील विकास पाटील-शिरगावकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यास नकार दिल्याने कोर्टाने संभाजी पाटील यांना फितूर घोषित केले.

डी मार्ट सह ३ दुकाने सील

$
0
0
वारंवार नोटिसा देऊनही व्यवसाय परवाना घेतले नसल्याच्या कारणावरून महापालिकेने रंकाळा परिसरातील डी मार्ट, युवराज गारमेंट, गोमंतक ज्वेलर्स ही दुकाने सील केली.

लाचखोर RTO पोलिस पकडला

$
0
0
वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलिस कॉन्स्टेबलला दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहाथ पकडले. आझाद अब्दुलरहिमान गडकरी (वय ३४, मूळ गाव पाचगाव ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कबनूर येथील चौकात ही कारवाई करण्यात आली.

हद्दवाढीचा वाद 'नगरविकास'च्या कोर्टात

$
0
0
कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबतचा चेंडू राज्य सरकारच्या नगरविकास खात्याच्या कोर्टामध्ये आहे. गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत नगरविकास विभागाने हद्दवाढीच्या प्रस्तावाची आणखी माहिती घेतली. या बैठकीनंतर प्रस्तावाबाबतची जवळपास प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्याचे मानण्यात येत आहे. आता राजकीय नेतृत्वाकडून निर्णय घेतला जाण्याची आवश्यकता आहे.

संजय घाटगे - संभाजीराजे भेट

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार संजय घाटगे यांनी युवराज संभाजीराजे यांची भेट घेतली. घाटगे हे कागल विधानसभा मतदारसंघातून लढणार असून यावेळी मदत करावी अशी विनंती त्यांनी केली. संभाजीराजे अजूनही राष्ट्रवादीत आहेत, त्यामुळे या भेटीला विशेष महत्व आहे.

कोल्हापूर क्राइम डायरी

$
0
0
कोल्हापूरमधील महत्त्वाच्या गुन्हेविषयक घडामोडी

शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर

$
0
0
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विद्यामंदिरचा करण विजय पाटील हा प्रथम आला आहे. तर माध्यमिक शिष्यवृत्तीमध्ये सुळे, (ता. आजरा) येथील रोहिणी विठोबा शेवाळे व प्रथमेश सनगर (परिते) यांनी राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे.

सबजेलमध्ये सुधारणा होणार का?

$
0
0
बिंदू चौक सबजेलमधील सावळा गोंधळ बंद व्हायलाच हवा. कारण, सरकारी स्तरावर पुरवल्या जाणाऱ्या सेवा आणि सुविधांवर डल्ला मारुन येथे भ्रष्ट व्यवस्था निर्माण झाली आहे. याबाबत कोणीही आवाज उठवत नसल्याने सगळे नियमित सुरू आहे.

पार्किंगचा बट्ट्याबोळ

$
0
0
बिंदू चौक पे पार्किंगमध्ये सुविधांचा अभाव असल्याने पैसे देऊनही सुविधा मिळत नसल्याने पर्यटकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ठेकेदाराने पार्किंगच्या ठिकाणी जमिनीचे सपाटीकरण केले नसल्याने मोठ्या पावसामुळे चिखल झाला आहे. परिणामी वाहने रूतून बसण्याचे प्रमाण वाढले आहे.

करणची कमाल

$
0
0
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विद्यामंदिरचा विद्यार्थी करण विजय पाटील याने चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक पटकावला. त्याला ३०० पैकी २९६ गुण मिळाले. तर माध्यमिकमध्ये सुळे, (ता. आजरा) येथील रोहिणी विठोबा शेवाळे व प्रथमेश सनगर (परिते) यांनी राज्यात दुसरा क्रमांक मिळविला.

पंचगंगा इशारा पातळीजवळ

$
0
0
पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. शहरत थोडीफार उसंत घेतली असली तरी धरणक्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पंचगंगा नदी इशारा पातळीपर्यंत पोहचली आहे. पंचगंगेचे पाणी दुपारी गायकवाड वाड्याजवळ आले होते. पातळी वाढत असल्यामुळे महापालिकेचा आपत्तीविभाग सज्ज झाला आहे.

पाटणजवळ धरणाला भगदाड

$
0
0
गेली १४ वर्षे रखडलेल्या बिबी (ता. पाटण) येथील धरणाला मोठे भगडाद पडल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पाटण, मणदुरे रस्त्यावरील मकाईचीवाडी येथील फरशी पुलाचेही दोन दिवसांतील मुसळधार पावसाने नुकसान झाले आहे.

पूरस्थिती कायम

$
0
0
दोन दिवस झोडपून काढणाऱ्या पावसाने गुरुवारी उसंत घेतली. पावसाने उघडीप दिली असली तरी आठवडाभरात झालेल्या धुवांधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे.

इस्लामपूर होणार इको सिटी

$
0
0
इस्लामपूर शहरातील नागरिकांनी आपल्या अंगणात, घराच्या परिसरातील रिकाम्या जागेत जास्तीत-जास्त वृक्षांची लागवड करावी. यासाठी इस्लामपूर नगरपालिकेने गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांना मोफत फळझाडांचे वाटप करून वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहन दिले आहे.

भेकवलीत जमीन खचली

$
0
0
महाबळेश्वर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जमिनी खचणे, घरांच्या भिंतींना तडे जाणे, घरांच्या भिंती पडणे, घरातील जमिनीला तडे जाणे आणि दुभंगण्याचे प्रकार घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

‘उत्तरमांड’मधून पाणी सोडले

$
0
0
कराडसह पाटण परिसरात गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे पाटण तालुक्यातील चाफळ व माथणेवाडी गावाच्या सीमेवर कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत बांधण्यात आलेल्या गमेवाडी (ता. पाटण) येथील उत्तरमांड मध्यम प्रकल्पाच्या धरणात क्षमतेपेक्षा जास्त पाणीसाठा झाला असून, धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग होवू लागला आहे.

साताऱ्यात रस्त्यांची दुरवस्था

$
0
0
दमदार पाऊस, विविध कामांसाठी रस्त्यांची खोदाई आणि निकृष्ठ कामांमुळे सातारा पालिकेच्या हद्दीतील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. संततधार पावसाने वाढणारे खड्डे मुजवण्यासाठी पालिकेकडून राडारोडा वापरण्यात येत असल्याने रस्त्यांवर चिथल झाला आहे.

‘निसर्गवेध’ची पावनखिंड मोहीम यशस्वी

$
0
0
ठरविक अंतराने बरसणारा पाऊस, हिरवीगार वनश्री आणि रोंरांवणारा वारा यांच्यासोबतीने शिवनामाचा जयजयकार करत ‘निसर्गवेध’ची पन्हाळा पावनखिंड मोहिम नुकतीच यशस्वी झाली. मोहिमेत २३० शिवभक्त सहभागी झाले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images