Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

विमानसेवेच्या आशा पल्लवित

$
0
0
लोकसभेमध्ये केंद्रीय नागरी उड्डयनमंत्र्यांनी कोल्हापूरसारख्या शहरांमध्ये ‘लो कॉस्ट’ विमानसेवा सुरु करण्याच्या घोषणेमुळे येथील बंद पडलेली विमानसेवा लवकर सुरु होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

आंबोलीत पर्यटकांचा धिंगाणा

$
0
0
गेल्या काही वर्षांत पावसाळी पर्यटनाची क्रेझ वाढत असल्याने आंबोली, रामतीर्थकडील वर्दळ तुफान वाढलेली असताना बेधुंद पर्यटकांचा त्रास आजरा तालुक्यातील नागरिकांना होत आहे.

२१ मुख्याध्यापक झाले शिक्षक

$
0
0
१५० पटसंख्येच्या शाळेला एक मुख्याध्यापक या निकषनुसार कोल्हापूर महापालिका शाळेतील २१ मुख्याध्यापकांच्या पदावर गंडांतर आले असून त्यांची शिक्षक व सहाय्यक शिक्षक म्हणून पदावनती झाली आहे. यापैकी काही मुख्याध्यापकांच्या अन्य शाळेत बदल्या करण्यात आल्या आहेत.

KMT: ४० स्टॉपवर अतिक्रमण

$
0
0
महापालिका परिवहन विभागाने प्रवाशी वाहतुकीच्या सोयीसाठी शहरात ठिकठिकाणी थांबे तयार केले. शहरातंर्गत सुमारे १५० बस थांबे आहेत. यापैकी चाळीस बस थांब्यावर सहा सीटर आणि अॅपे रिक्षा (वडाप) व्यावसायिकांची दादागिरी चालते.

कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस

$
0
0
मंगळवारी दिवसभर कोसळणाऱ्या धो धो पावसामुळे कोल्हापूर शहर चिंब झाले. प्रथमच अशा जोरदार झालेल्या पावसामुळे रस्त्यावरील वर्दळ काही काळ थंडावल्याचे चित्र होते.

संजय घाटगे यांचा मुश्रीफांवर पलटवार

$
0
0
‘गडहिंग्लज पर्यटनस्थळ नाही तर थोर सेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या शौर्याची व पराक्रमाची भूमी आहे. त्या पराक्रमी वीरांचा वारसा सांगणाऱ्या जनसामान्यांना भेटण्यासाठी गडहिंग्लजला येतो,’ अशी प्रतिक्रिया संजय घाटगे यांनी दिली.

'तनिष्क' दागिने खरेदी योजना स्थगित

$
0
0
टायटन कंपनी लिमिटेडच्या (टीसीएल) ज्वेलरी विभागाने तनिष्क ब्रॅण्ड अंतर्गत सुरू केलेल्या गोल्डन हार्वेस्ट व स्वर्ण निधी या सर्व दागिने खरेदी योजना स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्यांनी या योजनांमध्ये भाग घेतला आहे त्यांना दागिने खरेदी, कॉईन खरेदी, मनी बॅक असे तीन पर्याय टायटन कंपनीने दिले आहेत.

राजू माने यांची ‘दक्षिण’मधून उमेदवारी

$
0
0
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पायाभूत सुविधा आणि विविध विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली नाही तरी बंडखोरी करून निवडणूक लढविणार असल्याचे एस फोर ए समूहाचे संस्थापक अध्यक्ष राजू उर्फ सुनील माने यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

नगरपालिका कर्मचाऱ्यांचा संप मागे

$
0
0
राज्यातील नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या पगाराची रक्कम सरकारी अनुदानातून देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी दिले. त्यामुळे नगरपालिका कर्मचाऱ्यांचा गेले नऊ दिवस सुरु असलेला संप मागे घेतल्याची घोषणा नगरपालिका कर्मचारी संघटना समन्वय समितीने केली.

गत हंगामास ‘शाहू’चा प्रतिटन २७५० रुपये दर

$
0
0
सन २०१२-१३ सालातील गळीत हंगामास साखर आयुक्तांच्या मान्यतेनुसार २७५० रुपये दर देण्याचे निश्चित केले असल्याची माहीती शाहू कारखान्याचे संचालक समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ई वे बिलाची आकारणी लांबणीवर?

$
0
0
कर चुकवेगिरीला प्रतिबंध बसावा यासाठी राज्य सरकारने ई वे बिल कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला होता. खरेदी-विक्रीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पध्दतीने करायची आहे.

सौदी अरेबियात मराठी वृत्तपत्र

$
0
0
सौदी अरेबियात मराठीचा फारसा संबंध येत नाही. मात्र, ते‌थे गेलेल्या मराठी लोकांना मराठीतून काहीतरी साहित्य उपलब्ध व्हावे, असे वाटत होते. यासाठी चौघांनी एकत्र येत ‘वृत्तवेध’ नियतकालिक सुरू केले. त्याचे प्रकाशन नुकतेच झाले.

जेलपेक्षा गोठा बरा

$
0
0
सकाळचा चहा म्हणजे उकळलेले पाणी. साडेदहाला मिळणारे जेवण म्हणजे पीठ कमी आणि कोंडा जास्त असणारी रोटी. भोपळा किंवा वांग्याची महिनाभर एकच भाजी. जेलचा आवार म्हणजे घाणीचेच साम्राज्य. जेलपेक्षा जनावरांचा गोठा बरा, अशा प्रतिक्रिया येथे शिक्षा भोगून आलेले संशयित आरोपी व्यक्त करतात.

तीन लढती निश्चित

$
0
0
विधानसभा निवडणुकीची आता कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ताकदीने रिंगणात उतरण्यासाठी सर्वच प्रमुख पक्ष व इच्छुकांची तयारी सुरू आहे. सध्या कागल, करवीर व पेठवडगाव या तीनच मतदारसंघांतून लढणारे पक्ष आणि उमेदवारही निश्चित आहेत.

रिंग रोड जलकुंभ कोरडाच

$
0
0
क्रांतीसिंह नाना पाटील रिंगरोडवरील गंधर्वनगरीत सुमारे एक कोटी रुपये खर्चून बांधलेली पाण्याची टाकी कोरडीच आहे. शहर पाणी पुरवठा विभागाचे पाणी वाटपाचे व्यस्त शेड्युल आणि लाइनवर येत असलेल्या तांत्रिक कारण देत पाणी सोडले जात नाही.

मैदानातले बाजीगर मुस्लिम खेळाडू

$
0
0
शिक्षणाचा अभाव असल्यामुळे अनेक मुस्ल‌िम युवक छोटे मोठे व्यवसाय करत आहेत. मात्र व्यवसाय सांभाळत मुस्ल‌िम समाजातील युवक मैदानावर उत्कृष्ट खेळाने सर्वांना प्रभावित करत आहेत. फुटबॉल, हॉकी, क्रिकेट या मैदानी खेळासह इतर वैयक्तिक प्रकारातही हे खेळाडू मैदानावरील बाजीगर ठरत आहेत.

जिल्ह्यात अपुरे पोलिस बळ

$
0
0
‘सीमेवर सैनिक पहारा देता म्हणून आम्ही सुखाची झोप घेतो’ या शब्दात सैनिकाचे कौतुक होते. पण काळ, वेळ, घर, दार, कुटुंबचा विचार न करता १२ ते १८ तास काम करणाऱ्या पोलिसांच्या नशिबी मात्र कौतुकाचे शब्द क्वचितच पडतात.

संरक्षक भिंतीची पडझड

$
0
0
रंकाळ्याचे पाणी थोपवून धरणाऱ्या पद्माराजे गार्डनसमोरील संरक्षक भिंतीचे दगड ढासळले आहेत. पाण्याकडील जवळपास दहा फुटाचे दगड निखळून पाण्यात पडल्याने भिंत खिळखिळी झाली आहे. त्यामुळे ही पूर्ण भिंत आता केंव्हाही कोसळेल अशी परिस्थिती आहे. तलावातील पाण्याचा दाब या संरक्षक भिंतीवर असल्याने ही बाब गंभीर आहे.

फीमध्ये भरमसाठ वाढ

$
0
0
सीनिअर कॉलेजच्या अतिरिक्त विनाअनुदानीत तुकडीच्या शुल्कात गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट वाढ करण्यात आली आहे. विनाअनुदानीत बीएस्सीचे शुल्क दुप्पट तर बीए आणि बीकॉमच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाने अतिरिक्त प्रवेशाचा मार्ग मोकळा केला असला तरी शुल्कवाढीची टांगती तलवार विद्यार्थ्यांवर कायम आहे.

पाणीच पाणी चोहीकडे...

$
0
0
बुधवारी पावसाने सांगलीकरांची दैना उडवून दिली. चोहीकडे पाणीच पाणी झाले आहे. कृष्णेच्या पाणलोटक्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने कृष्णा नदीपात्रातील पाण्याची पातळी आयर्विन पूलानजrक बुधवारी तेवीस फुटावर गेली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images