Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

केएमटीचे पैसे जातात कुठे?

$
0
0
‘तीन-तीन महिने कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही, पगारासाठी कर्मचाऱ्यांना आंदोलन करावे लागते. केएमटीच्या व्यवस्थापनाचा पुरता बोजवारा उडाला असून रोजच्या उत्पन्नाचे पैसे जातात कुठे?'

नोव्हेंबरमध्ये धावणार नव्या बसेस

$
0
0
महापालिकेच्या परिवहन विभागाकडे नव्या बसेस खरेदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहचली आहे. परिवहन विभागाने तिसऱ्यांदा फेरनिविदा प्रक्रिया राबवून गुरूवारी अशोक लेलँड कंपनीची प्रतिबस २४ लाख ६३ हजार रूपयांची सर्वात कमी दराची निविदा निश्चित केली.

तीन मतदारसंघांवर NCPचा डोळा

$
0
0
विधानसभेच्या जादा जागा मिळाव्यात म्हणून राष्ट्रवादीचे राज्य पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांचा जिल्ह्यातील तीन जागांवर डोळा आहे. कोल्हापूर उत्तर, शिरोळ व शाहूवाडी अशा या जागा आहेत. येथे पक्षाची ताकदही आहे.

‘राधानगरी’ निम्मे भरले

$
0
0
जून महिना कोरडाच गेल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या आशा परतीच्या पावसाने पल्लवित झाल्या असतानाच चार दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे राधानगरी धरणाने अखेर गुरूवारी संचयन क्षमतेची पन्नाशी गाठली.

‘उदं गं आई’चा टेंबलाईवर गजर

$
0
0
पारंपरिक पी ढबाकच्या तालावर नदीच्या नव्या पाण्याने भरलेल्या घागरी घेऊन गल्लीतून निघालेल्या पेठकऱ्यांच्या उत्साहाने शुक्रवारी आषाढातील त्र्यंबोली यात्रा उत्साहात पार पडली. सकाळपासून आंबील, केळी आणि लिंबूचा नैवेद्य करण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू होती.

वाढत्या दराचा बांधकामांना फटका

$
0
0
गेल्या पंधरा दिवसांत सिमेंटच्या एका पोत्यामागे सत्तर तर वाळूचा ट्रक दोन हजार रुपयांनी वाढ झाल्याने सर्वसामान्यांची घरबांधणी खोळंबल्याचे चित्र आहे. अचानक झालेल्या या दरवाढीमुळे बांधकाम व्यावसायिकांनी नव्या प्रकल्पांचे बांधकाम थांबवल्याचे आहे.

नागपंचमीच्या बैठकीवर बहिष्कार

$
0
0
बत्तीश शिरळा येथील नागपंचमी आणि मुंबई हायकोर्टाने साप पकडण्यावर घातलेली बंदी या पार्श्वभूमीवर कोर्टाच्या निर्देशानुसार नागपंचमीच्या नियोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगलीत बोलविलेल्या बैठकीकडे शिराळकरांनी पाठ फिरवली.

मुख्यमंत्री पुन्हा कराड दौऱ्यावर

$
0
0
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सलग तिसऱ्या आठवड्यात आज आणि उद्या कराड दौऱ्यावर येत आहेत. येथील विविध प्रकल्पांच्या उद्घाटनांसह विद्यानगर परिसरातील कार्यक्रमानंतर येथील जनतेशी ते थेट संवादही साधणार आहेत.

‘दत्त’ला ‘स्वाभिमानी’चा बाय

$
0
0
मल्टी स्टेट कायद्यातील जाचक अटी व साखर कारखान्याने पोट नियमात केलेल्या मनमानी नियमामुळे तसेच दत्त प्रशासनाने हितसंबंध डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याच संबंधित वाढविलेल्या सभासदांमुळे दत्त सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे.

चंदगडला जोर ओसरला

$
0
0
गेले दहा दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर शुक्रवारी काहीसा ओसरला. मात्र, ताम्रपर्णी व घटप्रभा नद्यांची पाणीपाळी जैसे थे आहे. येथील तहसील कार्यालयातून मिळालेल्या आकडेवारीनुसार आज दिवसभरात ४८ मि. मी., तर आतापर्यंत ६१६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

कागल तालुक्यात बंधारे पाण्याखाली

$
0
0
गेले सात दिवस सातत्याने पडणाऱ्या पावसाने कागल तालुक्यातील चारही कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तालुक्यातील वेदगंगा आणि चिकोत्रा नद्यांवरील हे बंधारे असून, पाटबंधारे विभागाने या बंधाऱ्यांकडे पावसाळ्यापूर्वी आवश्यक ते लक्ष दिलेले नाही.

सिमेंट दरवाढीला आळा घाला

$
0
0
सातत्याने होत असलेल्या सिमेंटच्या दरवाढीचा कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टे ट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) कोल्हापूर शाखेच्यावतीने निषेध करण्यात आला.

टाकीखाली ‘झक्कास उद्यान’

$
0
0
शहरातील बहुतांशी पाण्याच्या टाकींची दुरावस्था झाली असताना शनिवार पेठेतील कोकणे मठ येथील पाण्याची टाकी मात्र त्याला अपवाद आहे. टाकीच्या खाली व मोकळ्या जागेत झकास उद्यान उभारले असून कोकणे मठ उद्यानाची देखभाल चांगल्या प्रकारे होत आहे.

सव्वादोन कोटींची वसुली

$
0
0
एलबीटी जमा न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईचा धसका घेत व्यापाऱ्यांनी कर भरण्यास सुरूवात केली आहे. एलबीटीचा भरणा न करणे, विवरणपत्रे सादर करण्याबाबत सूचना करुनही दुर्लक्ष करणाऱ्या व्यापाऱ्यांना नोटीसा पाठवून १४ ते १७ जुलै या कालावधीत सुनावणी घेण्यात आली.

महापौरांचा २८ जुलैला राजीनामा?

$
0
0
महापालिकेतील सत्तारुढ आघाडीच्या फॉर्म्यूल्यानुसार सहा महिन्यांनंतर महापौर बदल या निकषानुसार महापौर सुनीता राऊत २८ जुलै रोजी राजीनामा देण्याची शक्यता आहे. याचदिवशी महापालिकेची सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली असून सभेत त्या पदाचा राजीनामा देतील अशी शक्यता आहे.

मुंबई-कोल्हापूरसाठी ४० गाड्या

$
0
0
आगामी गणेशोत्सवासाठी गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने जादा बस व रेल्वेने खास रेल्वेचे नियोजन केले आहे. कोल्हापूर ते मुंबई दरम्यान किमान ४० जादा बसेस सोडण्याचे नियोजन कोल्हापूर आगारातून केले जात आहे.

जीवघेणी ‘वडाप’ वाहतूक

$
0
0
प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये चालकांसहित आठ प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी असतानाही २०-२२ प्रवाशी वाहनात घालून ‘वडाप’ चा जीवघेणा प्रवास सुरू आहे. अशा बेकायदेशीर वाहतुकीकडे पोलिस व आरटीओने डोळ्यावर पट्टी बांधल्याने त्यांना ही अवैध वाहतूक दिसत नाही.

२१ बंधारे पाण्याखाली

$
0
0
जोरदार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळी वाढ होत आहे. शुक्रवारी २१ बंधारे पाण्याखाली गेले. यामुळे ११ रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. फोंडा घाटात दरड कोसळल्याने राधानगरीमार्गे कोकणात जाणारी वाहतूक जवळपास दीड तास ठप्प होती.

ग्रामीण तरुणाईला ‘आयटी’ची साद

$
0
0
ग्रामीण भागातील विद्यार्थीही आता बुद्धी आणि कर्तृत्वाच्या जोरावर पारंपरिक शिक्षणाला फाटा देत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपले नशीब अजमावत आहेत.

‘दत्त’साठी ३२ उमेदवारांचे ७४ अर्ज

$
0
0
शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ३२ उमेदवारांचे ७४ अर्ज दाखल झाले आहेत. शनिवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस होता.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images