Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कुचकामी रस्त्यांचा ‘रेड सिग्नल’

$
0
0
शहरात सव्वा लाख रूपये खर्चून उभारण्यात आलेल्या ट्रॅफिक सिग्नल यंत्रणेच्या अंडरग्राऊंड वायरिंगवरील डांबरीकरण कुचकामी ठरल्याने सिग्नल यंत्रणा बंद होण्याची चिन्हे आहेत. सिग्नलजवळ बुजवण्यात आलेल्या वायरिंगच्या ठिकाणी छोट्या चरी निर्माण झाल्याने अपघातही होऊ लागले आहेत.

पूरस्थितीच्या शक्यतेने प्रशासन सतर्क

$
0
0
पावसाचा जोर कायम असल्याने पूरस्थिती निर्माण होण्याच्या शक्यतेने प्रशासन सतर्क झाले आहे. धरणांमध्ये पाणीसाठ्यात झपाटयाने वाढ होत आहे. कोदे धरण भरले आहे. कडवीपाठोपाठ राधानगरी, वारणा, कासारी, कुंभी, पाटगाव या पाच धरणांमध्येही लवकरच निम्म्यापर्यंत पाणीसाठा होण्याची स्थिती आहे.

गरिबांची जागा धनाढ्यांकडे

$
0
0
सहामजली टोलेजंग इमारत, एैसपैस रो बंगलो, आरामदायी घरांसाठी वेबसाइटवर केलेली जाहिरात पाहिल्यानंतर ही घरे अल्प उत्पन्न असलेल्या आणि गरीब लोकांसाठी असावीत यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही.

प्रतिभानगरात घरकुल घोटाळा

$
0
0
प्रतिभानगर येथील आदिनाथ सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी बनावट कागदपत्रे आणि खोट्या माहितीच्या आधारे झाली असल्याचे पुढे आले असून याप्रकरणी विभागीय सहनिबंधकांनी संस्थेच्या १२३ सदस्यांना नोटीस पाठविली आहे.

टेंबलाई यात्रेचा पेठा-पेठांमध्ये माहोल

$
0
0
आषाढ महिन्यातील नव्या पाण्याच्या त्र्यंबोली यात्रेसाठी पेठापेठांमध्ये पी ढबाकचा ताल रंगला आहे. आज (शुक्रवारी) होणाऱ्या यात्रेसाठी वर्गणी गोळा करण्यापासून ते बकऱ्याच्या खरेदीपर्यंत पेठकऱ्यांची लगबग सुरू आहे.

तासगावच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसचे अजय पवार

$
0
0
तासगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसचे नगरसेवक अजय पवार तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश थोरात यांची निवड झाली आहे.

शेंडूरला साकारले कृषी पर्यटन केंद्र

$
0
0
कागल तालुक्यातील गोरंबेच्या वाघजाई देवीच्या डोंगरात शेंडूर गावच्या हद्दीत जिल्ह्यातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे एम.एम.जी.कृषि पर्यटन केंद्र रविवारी (ता.२०) सुरु होत आहे.

धाउडवाड्यातला बंधारा गेला वाहून

$
0
0
शंभर टक्के पाणी भरण्यापूर्वीच जावलीपैकी धाउडवाड्यावरला बंधारा वाहून गेला. अडीच महिन्यापूर्वी बांधलेला हा बंधारा भर पावसात वाहून गेल्याने इथल्या अकरा शेतकऱ्यांच्या चार एकर शेतीचे नुकसान झाले आहे. एक शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली.

महाबळेश्वरला १७७ मिमी पाऊस

$
0
0
‘महाराष्ट्राची चेरापुंजी‘ महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, येथे गुरुवारी सकाळपर्यंत एका दिवसात सुमारे सात इंच (१७७ मिलिमीटर) पाऊस पडला. यंदाच्या हंगामातील हा सर्वाधिक पाऊस आहे. त्यामुळे नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णा तलावातील पाण्याची पातळी वाढली.

बारावीच्या विद्यार्थ्याने बनविला दुचाकीसाठी मोबाइल चार्जर

$
0
0
न्यू कॉलेजमध्ये बारावीत एमसीव्हीसी शाखेत शिकणारा विद्यार्थी रोहन घोरपडे याने दुचाकीसाठी मोबाइल चार्जरची निर्मिती केली आहे. त्यामुळे आता दुचाकीच्या बॅटरीवर मोबाइल चार्ज करता येणे शक्य होणार आहे.

राष्ट्रवादीची नूतन कार्यकारिणी जाहीर

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाची राज्य कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पाचजणांना संधी देण्यात आली आहे.

आर. डी. पाटील यांना ‘उत्तर’मधून उमेदवारी द्या

$
0
0
भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आर. डी. पाटील यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक झाली, यावेळी ही मागणी करण्यात आली.

कळंबा जेलभोवती निर्बंध

$
0
0
कैद्यांवर हल्ले होऊ नये यासाठी सुरक्षिततेच्या कारणास्तव कारागृह तटबंदीपासून पाचशे मीटर सभोवती बांधकाम करताना आयुक्त, पोलिस अधीक्षक व कारागृह उपमहानिरीक्षक या प्रतिनिधींचा समावेश असणाऱ्या स्थायी सल्लागार समितीकडून परवानगी घ्यावी लागणार आहे.

पंचगंगेला पूर

$
0
0
पावसाने शहरात थोडी उघडीप दिली असली तरी पश्चिम भागात सुरु असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच पंचगंगेला पूर आला आहे. पंचगंगेच्या पाण्याने ३० फुटाची पातळी ओलांडली असून ३९ फुटावर इशारा पातळी आहे.

‘थेट पाइपलाइन’चा ठराव प्रशासनाकडे

$
0
0
स्थायी समिती सदस्यांची चर्चा, कारभारी नगरसेवकांसोबत बैठक, सदस्यांकडून उपसूचना सादर होणे अशा विविध घडामोडींनंतर गुरुवारी थेट पाइपलाइन योजनेच्या निविदेचा मंजूर ठराव स्थायी समितीकडून प्रशासनाकडे सादर झाला.

घोटाळाप्रकरणी महसूलच्या हालचाली

$
0
0
आदिनाथ सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या नोंदणीची चौकशी करण्याची नोटीस विभागीय सहनिबंधकांनी दिल्यानंतर आता जिल्हा महसूल प्रशासनानेही याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. करवीर तहसीलदारांनी सन २०१२ मध्ये अहवाल दिला.

हेलपाट्यांची मालिका संपली

$
0
0
एनएसाठी सोळा प्रकारची कागदपत्रे जोडून जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावी लागत होती. दोन ते दिड वर्षापर्यंत शेतजमीन एनए करण्यासाठी वेळ लागत असे. आता राज्य सरकारने एनए विषय आयुक्तांच्या स्तरावर वर्ग केला आहे.

ट्रॅफिक सेन्स वाढविण्याची गरज

$
0
0
वाहनांची संख्या जशी वाढत चालली आहे, तशी शहरातील वाहतुकीच्या नियोजनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. वन वे, पार्किंग बंदी, अवजड वाहतूक बंदी, सिग्नल, सम-विषम तारखेनुसार पार्किंग अशा वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करुन नियोजन न केल्यास महत्त्वाच्या सर्व रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत राहणार हे स्पष्ट होत आहे.

आयबी, एसआयटीकडून महालक्ष्मी मंदिराची तपासणी

$
0
0
दहशतवाद्याच्या निशाण्यावर असलेल्या करवीरनिवासिनी महालक्ष्मी मंदिराची गुरूवारी आय.बी. (इंटलिजन्स ब्युरो), एसआयटी ( राज्य गुप्तवार्ता विभाग) च्या अधिकाऱ्यांनी अडीच तास तपासणी केली. मंदिराच्या सुरक्षिततेसंदर्भात त्यांनी मंदिराच्या प्रत्येक भागाची तपासणी करून पोलिसांना सूचना दिल्या.

‘एनए’मुक्तीचे सुख जवाएवढेच!

$
0
0
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कचाट्यातून बिगरशेती (एनए) प्रक्रिया सुटलेली असली तरी महापालिकेमधून ती पूर्ण करावी लागणार असल्याने नागरिकांची अवस्था आगीतून फुफाट्यात अशीच होण्याची जास्त शक्यता आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images