Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कराडमध्ये रिमझिम

$
0
0
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा आणि महाबळेश्वर परिसरात शुक्रवारी दिवसभरात पावसाने मंदगतीने का होईना सुरुवात केली. मात्र, संपूर्ण जून कोरडा गेला. जुलै निम्मा संपला, तरी पावसाची दमदार सुरुवात नसल्याने सर्वत्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, बळीराजा संकटात सापडला आहे. वीजनिर्मिती करून महाराष्ट्राला उजळून टाकणारे कोयना धरणही पाण्याविना कोरडे ठणठणीत पडले आहे.

राज्यात ३३ टक्के दरवाढीचे संकट?

$
0
0
राज्य सरकारचे भारनियमनमुक्तीचे सर्व दावे खोटे ठरले आहेत. जूनपासून राज्यातील सर्व विभागात अगदी ‘अ’ व ‘ब’ आणि ‘क’ वर्गातील ठिकाणीही सोयीनुसार वाटेल तसे अघोषित भारनियमन सुरू झाले आहे. निवडणुका नजरेसमोर ठेवून राज्य सरकारने दरमहा ७०६ कोटी रुपये अतिरिक्त अनुदान दिले.

'स्वाभिमानी'ची बोळवण शंभरातच

$
0
0
गतवर्षीच्या गळीत हंगामातील दुसरी उचल पाचशे रुपये, मिळावी या मागणीसाठी गडहिंग्लज, आजरा व चंदगड परिसरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आजरा साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आंदोलन केले.

मतदार हरकतींसाठी झुंबड

$
0
0
आगामी विधानभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल तहसीलदार कार्यालयात आज नवीन मतदार नोंदणी आणि मतदारांवर हरकती घेण्यासाठी मंडलिक-संजय घाटगे आणि जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ या दोन्ही गटांकडून एकच झुंबड उडाली.

‘गोकुळ’सह पाच संस्थांना नोटीस

$
0
0
पंचगंगा नदीत मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनांबाबत सात दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने शुक्रवारी महापालिकेला दिले. यावेळी ‘नीरी’ या संस्थेला महापालिकेतर्फे सुरू असलेल्या योजना पुरेशा आहेत का? अशी विचारणा करत स्वतंत्र अहवाल देण्याचे आदेशही दिले.

६२ सरकारी कार्यालयांकडे कोट्यवधीची पाणीपट्टी थकीत

$
0
0
जिल्हाधिकारी निवासस्थान, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयसह ६२ सरकारी कार्यालयाने गेल्या कित्येक वर्षांपासून महापालिकेची पाणीपट्टी भरलेली नाही. या सरकारी कार्यालयासह २०१ जणांकडे कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे.

जैव वैद्यकीय कचऱ्यामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात

$
0
0
जैव कचरा उचलणाऱ्या ठावाच्या ठेकेदाराचे बिल थकीत असल्यामुळे सीपीआरमधील प्रसूती विभागातील रूग्णांसह कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे तीन तेरा वाजले आहेत. जैव कचरा उठाव न झाल्यामुळे गेले काही दिवस अशी स्थिती होती.

राष्ट्रवादीला पुन्हा नंबर वन पक्ष बनवा

$
0
0
‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्याप्रमाणे जनतेवर हिप्नॉटिझम करून देशात सत्ता खेचून आणली, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेचे मन जिंकून सर्वात जास्त जागा जिंकेल. कॉँग्रेससोबत आघाडीच्या जागा वाटपाची बोलणी सुरू आहेत.

‘कृषी संजीवनी’मुळे बिले झाली निम्मी

$
0
0
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वीज बिलांच्या थकबाकीत सवलत देणारी ‘कृषी संजीवनी योजना’ सरकारने जाहीर केली आहे. थकबाकीच्या मुद्दलापैकी ५० टक्के रक्कम शेतकऱ्याने भरल्यास उर्वरित ५० टक्के मुद्दल राज्य सरकार भरणार असून दंड व व्याजाची रक्कम माफ केली जाणार आहे.

उत्तर २४ परगणा, पश्चिम बंगाल

$
0
0
पोलिसांकडून सतत सेक्स रॅकेट उघडकीस आणली जातात. त्यामध्ये बहुसंख्य तरुणी या परप्रांतीय असल्याचेही रेकॉर्डवर नोंद आहे. परप्रांतीय पीडित कॉलगर्ल्सची नावे, शिक्षण, धर्म वेगळे असतात. मात्र, यातील बहुसंख्य तरुणींचा पत्ता मात्र एकच असतो.

हद्दवाढीची अधिसूचना सादर

$
0
0
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसंदर्भात महापालिका प्रशासनाने प्रारूप अधिसूचना (नमुना) राज्य सरकारच्या नगर विकास खात्याकडे सादर केला आहे. महापालिकेच्या प्रारूप अधिसूचनेवर विचार करून राज्य सरकार निर्णय घेणार आहे.

कमी आसनक्षमतेच्या बसेसची खरेदी

$
0
0
जादा सीटच्या बसेसच्या देखभालीचा आणि दुरुस्तीचा खर्च टाळावा, मोठ्या बसेससाठी लागणाऱ्या जादा इंधन खर्चात बचत व्हावी यासाठी कोल्हापूर महापालिका परिवहन विभागाने कमी प्रवाशी क्षमतेच्या व उपनगरांतील अरुंद रस्त्यावरून धावतील व अत्याधुनिक तंत्रज्ञानांनी युक्त बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यात पावसाला प्रारंभ

$
0
0
गेले दीड महिना पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळिराजाला शुक्रवारी पावसाने दिलासा दिला. दिवसभर पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. त्यामुळे बळिराजा सुखावला आहे.

रंकाळ्याचे होणार हवाई दर्शन

$
0
0
कधी रंकाळा चौपाटीवरुन तर कधी पदपथ उद्यानातून फेरफटका मारत रंकाळा तलावाचे सौंदर्य डोळ्यात साठविणाऱ्या नागरिकांना आता पॅराशूट बोटिंगद्वारे ऐतिहासिक रंकाळा तलावाचे हवाई दर्शन घडणार आहे.

मुख्यमंत्री कराडमधून लढणार?

$
0
0
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभेच्या येत्या निवडणुकीत कराड दक्षिण मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांनी विविध माध्यमातून कराडमध्ये संपर्क वाढवला आहे. रविवारीही (२० जुलै) ते कराडमध्ये आहेत.

संजय घाटगे, परमेश्वराला तरी घाबरा!

$
0
0
चिकोत्रा धरणातील पाणी २२ गावच्या शेतकऱ्यांना पुरत नाही. अशावेळी भावेश्वरी पाणीपुरवठा संस्थेने पाणी घेतले तर या २२ गावांबरोबर माद्याळच्या शेतकऱ्यांनाही पाणी मिळणार नाही. त्यामुळे हायकोर्टाने चिकोत्रा खोरे कृती समितीच्या याचिकेवर स्थगिती दिली आहे.

स्थूलता देते ब्लडप्रेशरला आमंत्रण

$
0
0
मुलांचे वजन वाजवीपेक्षा जास्त असणे म्हणजे कोवळ्या वयातच ब्लडप्रेशरला (बी.पी.) आमंत्रण असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती सर्व्हेतून समोर आली आहे. वाजवीपेक्षा जास्त वजन आणि स्थूलता असणाऱ्या विद्यार्थ्यांचा बीपी सर्वसाधारण प्रमाणापेक्षा १० टक्क्यांहून अधिक असल्याचे यामध्ये दिसून आले आहे.

पक्षकार तहानलेले!

$
0
0
जिल्हा न्यायालयाच्या आवारात पिण्याची पाण्याची सोय नसल्याने न्यायालयात पक्षकारांना पाण्यासाठी हॉटेल व चहाच्या गाड्यावर धाव घ्यावी लागत आहे. बंद पडलेली लिफ्ट, महिलांसाठी कमी असलेली स्वच्छतागृहे यामुळे पक्षकार, वकील आणि अन्य कर्मचारी हैराण झाले आहेत.

जुना बुधवार नेहमीच ‘ब्लॉक’

$
0
0
रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा रस्ता पण रुंदी केवळ बारा मीटर. या रस्त्याला टँकर, ट्रक, एसटी या अवजड वाहनाबरोबरच छोटी वाहने क्षणभराचीही उसंत देत नाहीत. गंगावेसमधून शहरात येणारी अवजड वाहनेही या रस्त्यावरुन वळवलेली.

कुन्नूरमध्ये साकारली शिवसृष्टी

$
0
0
कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर कोल्हापूर शहरापासून अवघ्या ३३ किलोमीटर अंतरावरील कुन्नूर येथे शिवसृष्टी साकारली आहे. सीमाभागातील पर्यटकांचा येथे ओघ वाढू लागला आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images