Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘विशेष अनुदाना’चा राज्य सरकारला विसर

$
0
0
महापालिकेच्या परिवहन विभागाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष २०१२ मध्ये झाले. सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्य सरकारने केएमटीला दोन कोटींचे विशेष अनुदान देण्याची घोषणा केली. घोषणा करून दोन वर्षे उलटून गेले तरी केएमटीला काही विशेष अनुदान मिळाले नाही.

क्रिकेट बेटिंग अड्ड्यावर छापा

$
0
0
दक्षिण अफ्रिका व श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट सामन्यावरील बेटिंग घेणाऱ्या अड्ड्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांनी छापा टाकून पाचजणांना अटक केली. शाहूपुरी येथील हॉटेल अॅम्बॅसिडर येथे अड्डा सुरू होता. बुधवारी रात्री आठ वाजता कारवाई करण्यात आली.

सुंदरबाग परिसरातील अतिक्रमण हटविले

$
0
0
नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने बुधवारी सायंकाळी येथील सुंदरबाग परिसरात हातोडा चालवत खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून झालेले जादाचे अतिक्रमण हटविले.

‘राधानगरी’त उपऱ्यांना उमेदवारी नाही

$
0
0
राधानगरी विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या कोणत्याही पक्षाच्या वाट्याला आला तरी आपण त्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात अग्रभागी असू. मात्र त्या पक्षाने ती जागा उपऱ्या उमेदवाराला देऊ नये, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रा. जालंदर पाटील यांनी नमूद केले.

‘ठिबक’च्या अनुदानाची शेतक‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍ऱ्यांना प्रतीक्षा

$
0
0
पाण्याचा अतिरिक्त वापर कमी व्हावा व जमिनीची सुपिकता कायम रहावी यासाठी राज्य सरकारने पन्नास टक्के अनुदानावर ठिबक सिंचन योजना सुरु केली आहे.

विधानसभेसाठी मनसे, शेकापची चाचपणी सुरू

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी मनसे, शेकापसह इतर काही पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे. यासाठी मनसेची एक समिती नुकतीच शहरात आली होती. कोल्हापूर दक्षिण व उत्तर या दोन्ही जागा लढवण्याबाबत दोन्ही पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे.

गडहिंग्लजमध्ये चार अर्ज दाखल

$
0
0
नगराध्यक्षांना देण्यात आलेली मुदतवाढ सरकारने रद्द केल्यामुळे नवीन नगराध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज नगराध्यक्ष निवडप्रक्रिया सुरु झाली असून आज चौघांचे अर्ज दाखल झाले आहेत.

बा विठ्ठला, पाऊस पडू दे, शेती पिकू दे!

$
0
0
‘बा विठ्ठला..., राज्यात भरपूर पाऊस पडू दे. बळीराजाच्या कष्टाला चांगले फळ येऊ दे,’ असे साकडे राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठुरायाला घातले. बुधवारी पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल- रुखमाईची सपत्निक सरकारी महापूजा पार पडली.

वारकऱ्यांना चिरडणाऱ्या कारचालकाला पोलिसांचे अभय

$
0
0
मद्यधुंद अवस्थेत कार चालवून दोन निष्पाप वारकऱ्यांना चिरडून ठार मारणाऱ्या आणि चौदा वारकऱ्यांना गंभीर जखमी करणाऱ्या कार चालकाला पंढरपूरचे पोलिस पाठिशी घालत असल्याचा धक्कादायक आरोप कौडान्यपूर दिंडी सोहळ्याचे प्रमुख गणेश महाराज शेटे यांनी केला आहे.

अँटीबायोटिकसाठी प्रिस्क्रिप्शन सक्तीचे

$
0
0
औषध विक्रीसाठी कठोर नियमावलींची अंमलबजावणी सुरू आहे. यामुळे यापूर्वी किरकोळ वाटणाऱ्या गोष्टींमुळेही थेट दुकानांचे लायसन्स रद्द करण्याच्या कारवाई सुरू केल्या आहेत. अशा नियमावलींमध्ये केंद्र सरकारने आणखी एका नियमाचा डोस दिला आहे.

शेट्टींची केंद्रावर टीका निराशेपोटी

$
0
0
केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर खासदार राजू शेट्टी यांनी घेतलेले तोंडसुख शेतकऱ्यांच्या प्रेमापोटी नव्हेतर स्वताःला मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता नसल्याने निराशेपोटी आहे, अशी टीका शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय कोले यांनी केली आहे.

जत तालुक्याला पावसाने झोडपले

$
0
0
सांगली जिल्ह्यातील जत या कायम दुष्काळी तालुक्याला या वेळी पावसाचे वरदान मिळाले आहे. सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मान्सूनचे आगमन झाले. पण, अद्याप म्हणावा तेवढा जोर नाही. मात्र, दोन दिवसांपूर्वी जत भागात मुसळधार पाऊस पडला आहे.

'माजलेले आघाडी सरकार गाडा!'

$
0
0
‘टोल पंचगंगेत बुडवतो असे म्हणणाऱ्या दोन मंत्र्यांच्या डोळ्यासमोर टोलवसुली सुरु आहे. टोल सुरु असताना कोल्हापुरात राष्ट्रवादीचा खासदार निवडून कसा काय येऊ शकतो?,’ असा सवाल करत शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार दिवाकर रावते यांनी माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र हे उध्दव ठाकरे यांचे स्वप्न साकारण्यासाठी परिश्रम घ्या, असे आवाहन केले.

खरीप हंगामावर संकटाचे ढग

$
0
0
मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्याने जिल्ह्यात केवळ २५ क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. दीड महिना पावसाने ओढ दिल्याने पेरणी झालेल्या क्षेत्रावर दुबार पेरणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अद्याप ७५ टक्क्यांवर पेरणीच न झाल्याने खरीप हंगामावर संकटाचे ढग दाटून आले आहेत.

‘एटीएस’चे पथक साताऱ्यात दाखल

$
0
0
पुण्यात झालेल्या बाँम्बस्फोटाची तपासणी करण्यासाठी पुणे येथील ‘एटीएस’चे पथक गुरुवारी सायंकाळी साताऱ्यात दाखल झाले. मात्र, याबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.

पानपट्टीधारकांनी पाळला निषेध दिन

$
0
0
राज्य सरकारने सुगंधी पत्ती व सुगंधी सुपारीवर घातलेली बंदी चुकीची असल्याने ती त्वरीत उठवावी या प्रमुख मागणीसह इतर समस्यांबाबत राज्यातील पानपट्टीधारकांनी गुरुवारी मुंबईतील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन केले.

पाणी सोडण्यासाठी चर खोदाई

$
0
0
रंकाळा तलावातील दुर्गंधीयुक्त पाणी सोडण्यासाठी सांडव्यामधून चर खोदण्याच्या कामास सुरूवात झाली. रंकाळा तलावाच्या पिछाडीस असणाऱ्या सांडव्यामधून ३५० मीटर लांबीचा चर खोदण्यात येणार आहे.

पहिल्याच दिवशी १३३३ प्रवेश

$
0
0
अकरावीची प्रवेश प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील १३३३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. १२ हजार ८०४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले.

सोन्याच्या भिशीवर निर्बंध

$
0
0
सराफ दुकानात सुरू असलेल्या सोन्याच्या भिशीवर केंद्र सरकारने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ‘अकरा महिने पैसे भरा व बारा महिन्याच्या रक्कमेएवढी सोन्याची खरेदी करा’ अशा प्रकारच्या लोकप्रिय भिशीवर गदा आली आहे.

कोल्हापुरात रिपरिप

$
0
0
शहर परिसरात आता कुठे हळूहळू पाऊस सुरू झाला आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याचे प्रमुख स्रोत असलेल्या राधानगरी तसेच काळम्मावाडी धरण क्षेत्रात दहा दिवसांपासून चांगला पाऊस सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणाहून पाणी सोडले जात असले, तरी या पावसाने पाणी पातळी व्यवस्थित राखण्याचे काम केले आहे. दरम्यान, शुक्रवारी दिवसभर सर्वत्र पावसाची रिपरिप सुरू राहिली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images