Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

दरोडेखोरांना लावला मोक्का

0
0
जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना सुट्टीवर येऊन टोळी करून खून, दरोडा, लूटमार असे गंभीर स्वरुपाचे अकरा गुन्हे करणाऱ्या पाचजणांच्या टोळीला मोक्का लावण्यात आला आहे.

भुदरगडमध्ये पाऊस

0
0
महिनाभर पाठ फिरविल्यानंतर मंगळवारी दुपारी भुदरगड तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. सुमारे एक तास गारगोटी शहरास मुसळधार पावसाने झोडपून काढले. कडगाव, पिंपळगाव भागात हलक्या सरी झाल्या तर कूर, मडिलगे परिसरास पावसाने हुलकावणी दिली. मात्र या परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण होते.

अॅड. काटकर यांना अटक व सुटका

0
0
गावकामगार तलाठी यांच्या बोगस सह्या करून संस्था नोंदणी केल्याप्रकरणी पोर्ले तर्फ बोरगांव गावचे सरपंच आणि पन्हाळा तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष अॅड.शाहू काटकर यांच्यासह नऊजणांना मंगळवारी पन्हाळा पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका झाली.

जोतिबा मंदिरातील दुर्मिळ कागदपत्रे जनतेसमोर येणार

0
0
जोतिबा मंदिरातील जुनी व अतिशय दुर्मिळ कागदपत्रे आता जनतेसमोर येणार आहेत. चारशे वर्षांपासूनची ही कागदपत्रे पुरालेखागार विभागाला देण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला आहे. मोडी लिपीतील ही कागदपत्रे भाषांतरासह स्कॅनिंग करून ऑनलाइन उपलब्ध करण्यात येणार आहेत.

नव-याच्या हाती बेड्या

0
0
फेसबुकवर चॅटिंग करत मैत्रीतून प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर विवाहाचे आमिष दाखवून पुण्यातील तरुणीची फसवणूक करणाऱ्या संशयित संग्राम राजेंद्र नाळे (वय २२, रा. सांगरूळ, ता. करवीर) याला मंगळवारी राजारामपुरी पोलिसांनी अटक केली.

सिग्नलवर स्पीकर, पोलिसांना मायक्रोफोन

0
0
कोल्हापूर शहरातील ​शिस्तबद्ध वाहतुकीसाठी सिग्नलच्या ठिकाणी नियंत्रण करणाऱ्या वाहतूक पोलिसांना मायक्रोफोन, तर सिग्नलवर स्पीकर बसविण्याची घोषणा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली.

तोरस्करांचा होणार हुतात्म्यांच्या यादीत समावेश

0
0
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कोल्हापुरातील लढ्यात पोलिसांच्या गोळीबारात हुतात्मा झालेले शंकरराव तोरस्कर यांचे नाव राज्य सरकारच्या हुतात्मांच्या यादीत समावेश करण्यासाठी सरकारी दरबारी हालचाली सुरू झाल्या आहेत.

पाइपलाइन योजना वेबसाइटवर

0
0
काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेची संपूर्ण माहिती महापालिकेच्या www.kolhapurcorporation.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आली आहे.

'युनिट‌ी'ची नेमणूक बेकायदा

0
0
पुण्यातील युनिटी कन्सल्टंट कंपनीने थेट पाइपलाइन योजनेचा डीपीआर (सविस्तर अहवाल प्रकल्प) १९९७ मध्ये टास्क कंपनीने तयार केलेल्या ‘डीपीआर’ची कॉपी-पेस्ट (नक्कल प्रत) आहे.

आर्टस्, सायन्सचा निकाल शनिवारपर्यंत

0
0
सीनिअरच्या आर्टस् आणि सायन्सच्या दुसऱ्या वर्षाचा निकाल येत्या चार दिवसांत जाहीर करण्याचे आदेश शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी परीक्षा विभागाला दिले.

...तर उमेदवार पाडू

0
0
आम्ही आगामी विधानसभेला जास्तीजास्त जागा लढवणार असून जिंकण्याची खात्री नसली तरी काहींचे उमेदवार मात्र पाडू शकतो,’ असा इशारा माजी आमदार लक्ष्मण माने यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.

विठ्ठला पाऊस पडू दे!

0
0
पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाचे ढग राज्यावर गडद होऊ लागलेत. त्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय. त्यामुळे 'राज्यात भरपूर पाऊस होऊ दे, दुष्काळाचं सावट दूर करून समृद्धी नांदू दे', असं साकडं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी श्री विठ्ठलाला घातलं आहे.

रंकाळ्यात दूषित पाणी

0
0
रंकाळा तलावातील दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर काढण्यासाठी महापालिकेने सांडव्याच्या बाजूने चर खोदण्याचा निर्णय घेतला असून, प्रत्यक्ष कामाला बुधवार (ता.९) पासून प्रारंभ होणार आहे. ३५० मीटर लांब आणि आठ फूट खोलीची चर खोदून रंकाळ्यातील पाणी सोडण्याचे नियोजन आहे.

पोटातून १० किलोचा ट्यूमर काढला

0
0
पत्की हॉस्पिटलमध्ये अवघ्या तीन टाक्यांद्वारे २३ पौंड वजनाच्या स्त्री बिजकोषाच्या ट्यूमरची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. १९ वर्षांच्या युवतीवर शस्त्रक्रिया करून दुसऱ्याच दिवशी तिला डिसचार्ज देण्यात आला. डॉ. सतीश पत्की यांच्या नेतृत्वाखाली शस्त्रक्रिया करण्यात आली.

साखर उद्योगाच्या अपेक्षा

0
0
अर्थसंकल्पाकडून साखर उद्योगाच्या अपेक्षा

बळीराजाच्या कष्टाला फळ दे!

0
0
राज्यावर अवर्षणाचे संकट घोंगावत असतानाही देशभरातून आलेल्या तब्बल आठ लाख भाविकांनी पंढरपुरात हजेरी लावून विठुरायाच्या चरणी माथा टेकवला. ‘बा विठ्ठला, राज्यात भरपूर पाऊस होऊ दे, बळीराजाने पेरलेल्या कष्टाला चांगले फळ येऊ दे!’ असे साकडे राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठ्ठलाला घातले. बुधवारी पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली.

अकरावी प्रवेशाची आजपासून धामधूम

0
0
अकरावी सायन्सचा विवेकानंद कॉलेजचा कट ऑफ पॉइंट ९०.६० टक्के, काँमर्सचा शाखेचा न्यू कॉलेजमध्ये ७५.२० आणि आर्टसचा न्यू कॉलेजमध्ये ६७.४० टक्के इतका सर्वाधिक कट ऑफ पॉइंट लागला. या वर्षी सायन्ससह आर्टस आणि कॉमर्सचा कट ऑफ पॉइंट सरासरी एक टक्क्याने घटला आहे.

नोकरीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा

0
0
‘महिला व्यवसाय प्रशिक्षण अभियान’ अंतर्गत विविध पदांच्या भरतीच्या नावाखाली हजारो उमेदवारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. सध्या या पदांच्या भरतीला स्टे दिला असल्याचे मोघम उत्तर संबंधित कार्यालयातून मिळते.

वाहतूक कोंडीचे लक्ष्मीपुरीला टेन्शन

0
0
रस्त्यांची रुंदी कमी व वाहनांची संख्या जास्त असा प्रकार असल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे. शहरात चारचाकी घेऊन जायचे ठरवल्यास गाडी कुठे लावायची, कोणत्या रस्त्यावर कोंडी नसते याचा घरातच विचार करावा लागतो.

वडापची घुसखोरी रोखण्यासाठी ‘आखणी’

0
0
बसस्टॉपसमोर थांबून प्रवाशी घेऊन जाणाऱ्या वडाप रिक्षांना रोखण्यासाठी आता बसस्टॉपसमोर पट्टे मारून केएमटीने जागा निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. महत्त्वाच्या व वर्दळीच्या रस्त्यांवरील ३०० च्या आसपास बसस्टॉपवर पट्टे आखण्यात येणार आहेत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images