Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पंढरपूर ते बारामती मोर्चात सहभागी होऊ नका

0
0
‘आमदार, खासदार व्हायचे डोहाळे लागलेल्या व राष्ट्रवादीत दुखावलेल्या काही लोकांनी शरद पवार यांच्या द्वेषापोटी पंढरपूर ते बारामती मोर्चा काढून धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी करण्याचा खटाटोप सुरू केला आहे.

कण्हेर धरणाने तळ गाठला

0
0
पाऊस लांबल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने कण्हेर धरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे धरणाशेजारील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

अजितराव घोरपडे भाजपकडून लढणार

0
0
‘आगामी विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री अजितराव घोरपडे तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील. त्याचा लवकरच भाजप प्रवेश होईल,’ अशी घोषणा खासदार संजयकाका पाटील यांनी केली आहे.

भाजीपाल्याचे दर स्थिर

0
0
गेल्या आठवड्यात भाजीपाल्याच्या दरात पाच ते दहा रुपयांची वाढ झाली होती. या आठवड्यात या दरामध्ये बदल झालेला नाही. भाजीपाल्याचे दर स्थिर असले तरी मूग, मटकी व हरभरा डाळीच्या दरात सरासरी चार ते सात रुपयांची वाढ झाली आहे.

बनावट नोटांचे कनेक्शन सीमाभागात

0
0
बनावट नोटांप्रकरणी काही दिवसांपूर्वी कागल पोलिसांनी कारवाई करून कुर्ली (ता. चिकोडी) येथील तेजस्विनी पाटील हिला अटक केली असली तरी सहा एप्रिलला बनावट नोटा खपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीस कागल पोलिसांनीच जेरबंद केले होते.

संजय घाटगेंवर फौजदारी करणार

0
0
दिंडेवाडी ते बारवे प्रकल्पाच्या पुनर्वसन व चिकोत्रा प्रकल्पाबाबत माजी आमदार संजय घाटगे हे जनतेत आपल्याबाबत गैरसमज पसरवत आहेत, त्यामुळे आपण त्यांच्या विरोधात बदनामीचा दावा दाखल करणार असल्याचे पत्रक जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

जयसिंगपुरात आता एलईडी पथदिवे

0
0
शहरात चार हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता जयसिंगपूर नगरपालिकेने ग्रीनसिटीकडे आणखी एक पाऊल उचलले आहे. शहरात एलईडी पथदिवे बसविण्यात येणार असून यामुळे विजेची मोठी बचत होणार आहे.

‘आरक्षण मिळवणारच’

0
0
‘समाजाचा विकास साधायचा असल्यास एकटेपणाने वाटचाल न करता अन्य समाजांना सोबत घ्या,’ असा सल्ला आमदार अॅड. रामहरी रुपनवर यांनी दिला. महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या मल्हार सेना व युवक संघटनेच्यावतीने रविवारी शाहू स्मारक भवनमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच नूतन आमदार रुपनवर व आमदार रामराव वडकुते यांचा सत्कार करण्यात आला.

विठूनामाच्या गजरात रंगले रसिक

0
0
शास्त्रीय सुरावटीवर आधारित भक्तीगीतांचे सादरीकरण, पंढरीच्या विठूरायाची महिमा गाणाऱ्या संत रचना, अभंगातून साकारणारी विठूरायाची अनेकविध रूप आणि त्यामध्ये तल्लीन होणारा रसिकजण सूर आणि भक्तीचा हा सोहळा शाहू स्मारक भवनमध्ये रंगला.

टोल नाक्यांवरचे कर्मचारी चांगल्या कुटुंबातीलच

0
0
‘टोल नाक्यावर नियुक्त कर्मचारी चांगल्या कुटूंबांतील आहेत. त्यांना गुंड म्हणणे चुकीचे आहे. टोल नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत’ असा खुलासा करत आयआरबी कंपनीने टोलविरोधी कृती समितीचे आरोप फेटाळले आहेत.

पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती

0
0
सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने १२ आणि १३ जुलै रोजी पन्हाळा-पावनखिंड या दोन दिवसांच्या पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

होमिओपॅथी डॉक्टर देणार अॅलोपॅथीच्या प्रिस्क्र‌िप्शन

0
0
होमिओपॅथीच्या डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासाठी आता कायद्याचे संरक्षण मिळाल्यामुळे त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु, फारमॅकॉलॉजीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची अट अद्यापही राज्य सरकारने कायम ठेवली असून, त्यानंतरच होमिओपॅथना अॅलोपॅथीच्या औषधांचे प्रिस्क्रिप्शन लिहिता येणार आहे.

प्राधिकरणाचा चेंडू सरकारच्या कोर्टात

0
0
महालक्ष्मी मंदिराच्या तीर्थक्षेत्र आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राधिकरणाला मंजुरी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बऱ्याच कालावधीनंतर हा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे.

ड्रेनेजलाइन वर्षभर वापराविना

0
0
गेल्या सहा वर्षांपासून शहरात रस्ते खोदून ड्रेने​जलाइन टाकली गेली. त्यासाठी ५२ कोटी रुपये खर्चही झाले. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ७६ आणि २२ कोटी रुपये खर्चून दोन प्रकल्पही उभारण्यात आले.

सीपीआरच्या प्रसुती विभागावर ताण

0
0
ग्रामीण भागात सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे सीपीआर हॉस्पिटलमध्ये २० टक्के रूग्णांची वाढ झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरही आंदोलनात सहभागी झाल्याने सीपीआर विभागाच्या प्रसुती विभागावर चांगलाच ताण पडला असला आहे.

मध्यरात्रीपासून केएमटी थांबणार ?

0
0
‌थकित पगारांच्या देण्यासह अन्य मागण्यांची पूर्तता न केल्याने केएमटी कर्मचारी सोमवारी (ता.७) मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. हंगामी चालक-वाहकांना सेवेत कायम करणे, रिक्त जागांची भरती, गेल्या दोन महिन्याचा थकित पगार आणि सहावा वेतन आयोग लागू करावा अशा प्रमुख मागण्या आहेत.

घरफाळ्यासाठी प्रॉपर्टीवर बोजा

0
0
नोटीसा बजावून दंडात्मक कारवाईचा आदेश दिल्यानंतर जप्तीची कारवाई करूनही काही मिळकतधारकांनी घरफाळा भरण्यास टाळाटाळ केली आहे. काही जणांनी दहा वर्षे घरफाळा भरलेला नाही. त्यामुळे थकीत फाळा दहा लाखावर गेला आहे.

'नाथांच्या पालखीशी दुजाभाव का?'

0
0
पंढरपूरला येण्यासाठी संत एकनाथांच्या पालखीला दरवर्षी चंद्रभागा नदी होडीतून पार करावी लागते. कित्येक वर्षाची ही मागणी चार वर्षांपूर्वी मंजूरही झाली. पण अद्यापही हा पूल बांधला गेला नाही. हा एकनाथ महाराजांच्या सोहळ्याशी दाखवलेला दुजाभाव आहे, अशी भूमिका घेत नाथ महाराजांची पालखी व्हळे मुक्कामी थांबून राहिली आहे.

सीनिअरच्या पहिल्या वर्गात अटींवर प्रवेश

0
0
नऊ अटींचे पालन करूनच बी. ए., बी. कॉम. आणि बी. एस्सी. अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या वाढीव विद्यार्थ्यांच्या प्रवेशास मान्यता देण्यात आली.

पर्यावरणासाठी सातारकर आग्रही

0
0
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सातारा शहरातून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र, ग्रामीण भागात अद्याप पुरेशी जागृती झालेली नाही. वर्ये गावाजवळ वेण्णा नदीत व माहुली गावात कृष्णा नदीत सुमारे पाच ते सात हजार मूर्तींचे विसर्जन होते.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images