Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आरोग्य अधिकार अभियानास आजपासून प्रारंभ

$
0
0
छत्रपती शाहू कॅन्सर रिसर्च फाऊंडेशन व एकटी संस्थेमार्फत डॉक्टर्स डे च्या निमित्ताने एक जुलैपासून आरोग्य अधिकार अभियानास सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती एकटी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी दिली.

जिल्ह्यात ११ हजार बालके कुपोषित

$
0
0
जिल्ह्यात ११ हजार बालके कुपोषित असल्याची माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. उद्योजक, दत्तक योजना, आदी उपक्रमांच्या माध्यमातून आगामी सहा महिन्यांत जिल्हा कुपोषणमुक्त केला जाईल, अशी ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली. पाटील म्हणाले, ‘जिल्ह्यात ११ हजार बालके कुपोषित असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

‘फिनोलेक्स’तर्फे वारकऱ्यांसाठी प्रथमोपचार

$
0
0
फिनोलेक्स इंडस्ट्रिज लिमिटेडतर्फे वारकऱ्यांना फिनोलेक्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष योगेश कृपलानी यांच्या हस्ते फिनोलेक्स बॅगचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रथमोपचार सुविधा सुध्दा देण्यात येत आहेत.

तंत्रशिक्षण मंत्री टोपे यांच्यासमवेत आज बैठक

$
0
0
पदवी प्रथम वर्ष जादा प्रवेश प्रश्नांचा तोडगा काढण्यासाठी मंगळवारी (ता. १ जुलै) उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या दालनात विद्यापीठ अधिकारी, संस्थाचालक, प्राचार्यांची बैठक दुपारी दोन वाजता होणार आहे. मंजूर क्षमतेपेक्षा जादा प्रवेश दिल्यास कॉलेजला दोनशे पट दंडाचा बडगा शिवाजी विद्यापीठाने उगारला आहे. त्यामुळे काही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत.

अध‌िकारी बदलीबाबत नियमावली करणार

$
0
0
‘चंदगड, गगनबावडा आदी तालुक्यांत अधिकारी जाण्यास राजी नसतात. त्यामुळे अशा दुर्गम भागातील समस्या कायम राहण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणून आता राज्य सरकारने केलेल्या नियुक्ती निकषानुसार जिल्हास्तरावर नियमावली केली जाईल,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले.

‘मराठा आरक्षण हा अनेक वर्षांच्या संघर्षाचा विजय’

$
0
0
मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांत स्वतंत्र २५ टक्के आरक्षण मिळावे याकरीता मराठा आरक्षण संघर्ष समिती गेली अनेक वर्षे सरकारशी करीत असलेल्या संघर्षाची दखल घेऊन राज्य सरकारला मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावाच लागला. या संघर्षात हातात हात घेऊन काम करणाऱ्या विविध १८ संघटनांचा हा विजय असल्याचे मत मराठा आरक्षण संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष सुरेश पाटील यांनी व्यक्त केले.

प्रशासनाच्या ‘ढिल्या’ कारभाराचा वाचला पाढा

$
0
0
बहुप्रतिक्षीत पालिका सभा सोमवारी विरोधकांनी गाजविली. सत्ताधारी गट व मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांना दोन वेळा माफी मागायला लावून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना वारंवार आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले व फेरलिलावाची नामुष्की ओढवून घ्यायला लावली. नगराध्यक्षा मंजुषा कदम अध्यक्षस्थानी होत्या.

बनावट नोटांप्रकरणी पुराव्याअभावी आठजणांची निर्दोष मुक्तता

$
0
0
कर्जफेडीसाठी बनावट नोटा तयार करुन त्या चलनात आणण्यासाठी जवळ बाळगल्याच्या आरोपातून मुख्य संशयित बाळकृष्ण वस्तारे याच्यासह अन्य आठजणांची येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ए. शहापूरे यांनी सोमवारी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

शिक्षण मंडळ सभापत‌िपदी मुजावर

$
0
0
नगरपालिका शिक्षण मंडळ सभापती निवडणुकीबाबत तक्रार आल्याने सोमवारी होणारी निवड प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी नितीन कोकणे यांनी घेतला. तर सत्तारुढ काँग्रेस सदस्यांनी बहुमताच्या जोरावर बैठक घेऊन सभापतीपदी तौफिक मन्सूर मुजावर यांची बिनविरोध निवड जाहीर केली. सभापती निवडीवरुन मंडळातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत बेबनाव असल्याचे दिसून आले.

काळम्मावाडी योजना मंजूर करून घेऊ

$
0
0
शहरात ४० ठिकाणी कुपनलिकांची खोदाई करण्याबरोबरच शहरवासियांना कायमस्वरुपी पाणी मिळावे यासाठी काळम्मावाडी पाणीपुरवठा योजना केंद्राकडून मंजूर करुन घेऊ तसेच शहरातील पाच उद्यानात खासदार निधीतून खेळणी व लॉनची कामे करुन देणार असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी दिली.

जल-रुद्राभिषेकाने ग्रामदैवताची आळवणी

$
0
0
वरुणराजाची बरसात व्हावी, दुष्काळस्थिती संपुष्टात यावी यासाठी कपिलतीर्थ मार्केटमध्ये कोल्हापूरचे ग्रामदैवत कपिलेश्वर मंदिरात जल-रुद्राभिषेक व मंत्रपठण करण्यात आले. करवीर निवासनी पुरोहित मंडळ व कपिलतीर्थ मार्केट असोसिएशनने याचे आयोजन केले होते. दुपारी तीन वाजल्यापासून सुरू असलेला धार्मिक विधी सायंकाळी सातपर्यंत सुरू होता. वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी विधीत अनेक नागरिकांचा सहभाग होता.

‘कामगार कल्याण मंडळाला जागा उपलब्ध करून देऊ’

$
0
0
‘कामागारांच्या विकासासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल’ असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी येथे केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कोल्हापूर गटाचा कामगार मेळावा सोमवारी झाला. त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी जेनेसिस इन्स्टिट्यूटऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य प्रा. दिनकर घेवडे होते.

वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या स्वागताची तयारी वाया

$
0
0
वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा दौरा रद्द झाल्याने सीपीआर हॉस्पिटलच्या आवारात डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी केलेली स्वागताची तयारी वाया गेली. दरम्यान, मंत्री आव्हाड मंगळवारी (ता. १ जुलै) कोल्हापूर दौऱ्यावर येणार असल्याचे सीपीआर प्रशासनाने स्पष्ट केले.

मुलाला वाचविण्याची आईची धडपड

$
0
0
अपघातामध्ये तरूण मुलाचे दोन्ही जबड्याचे सांधे निकामी झाले, मुलावर मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये उपचार करायचे ठरले आहे. दोन्ही जबड्याच सांध्याचा खर्च तीन लाखापर्यंत आहे. मात्र आर्थिक परिस्थितीअभावी उपचार करणे शक्य होत नाही. मात्र, मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी कागल तालुक्यातील व्हन्नूर येथील श्रीमती मालन सदाशिव खापणे या धडपडत आहेत. रक्कम जमविण्यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे.

भावी पोलिसांची बांधिलकी अन् कृतज्ञता

$
0
0
पोलिस प्रशिक्षण घेत असतानाच सोलापूर येथे दुर्दैवी मृत्यू ओढवलेल्या उजळाईवाडी (ता. करवीर) येथील प्रशिक्षणार्थी पोलिस संदीप जगताप यांच्या कुटुंबीयांना प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी आणि कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्य मानून दोन लाख ६३ हजार रुपयांची मदत केली. संदीप यांच्या मृत्यूने त्यांची आई, पत्नी आणि बहीण यांच्यावर आभाळच कोसळले आहे. आपल्या दिवंगत सहकाऱ्याच्या कुटुंबीयांना भावी पोलिसांनी केलेली मदत अनेकांच्या दातृत्त्वाला प्रेरक ठरू शकते.

पाइपलाइन योजनेचा प्रारंभ आचारसंहितेपूर्वी

$
0
0
थेट पाइपलाइन योजनेच्या निविदेला स्थायी समितीच्या विशेष बैठकीत उपसूचनेसह मंजुरी देण्यात आली. ४८८ कोटी ७४ लाखाची ही निविदा आहे. हैदराबादच्या जीकेसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लि​मिटेडने ही निविदा भरली आहे. त्यामुळे योजनेच्या कामाचा प्रारंभ विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेआधीच होणार आहे. सभापती सचिन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

‘थेट पाइलपाइन’ राबविताना जनभावना लक्षात घ्या

$
0
0
थेट पाइपलाइन योजना कार्यान्वित करताना भोगावती आणि पंचगंगा नदीतील पाणी उपसा बंद करू नये. शहरांतर्गत पाइपलाइन दुरुस्ती ते प्रकल्पात तांत्रिक बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्था ठेवावी यासह धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानंतर पर्यायी नियोजन करावे अशा ​विविध मुद्यांचा उहापोह थेट पाइपलाइन योजनेच्या सादरीकरणाप्रसंगी करण्यात आला.

माधुरी नकाते यांचा विजयी

$
0
0
संभाजीनगर प्रभागाच्या चुरशीने झालेल्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार माधुरी किरण नकाते विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार स्वाती सासने यांचा २८६ मतांनी पराभव केला. नकाते यांना १६०९ तर मत सासने यांना १३२३ मते मिळाली. जनसुराज्य-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती ​शशिकला यशवंत बराले (७६१ मते) यांना मतदारांनी नाकारल्याचे स्पष्ट झाले.

पुन्हा ताराराणी आघाडी!

$
0
0
महापालिकेत सतरा वर्षे सत्तेवर राहिलेल्या आणि पाच वर्षांपूर्वी विसर्जित केलेल्या ताराराणी आघाडीचे पुनरुज्जीवन देण्यात येणार आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत ही आघाडी ताकदीने रिंगणात उतरणार आहे. आघाडीचे नेते व कारभाऱ्यांनी तसे संकेत दिले आहेत. संभाजीनगर पोटनिवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेल्या माधुरी नकाते यांना या आघाडीचे सदस्यत्व देण्याचा हालचाली सुरू झाल्या आहेत. आठ दिवसांत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

शिवाजी मार्केटकडे दुर्लक्ष

$
0
0
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ना बंदिस्त शटर, ना वॉचमेनची नियुक्ती, ना नियमितपणे होणारी स्वच्छता, बंद अवस्थेतील विद्युत दिवे, भिंतीला ठिकठिकाणी पडलेले तडे अशी अवस्था महापालिकेच्या शिवाजी मार्केटची झाली आहे. बाहेरून शिवाजी मार्केटची टुमदार इमारत नजरेत भरते, पण इमारतीचे अंतरंग मात्र बघवत नाही. अशी अवस्था झाली आहे. या इमारतीच्या देखभालीकडे महापालिकेचे पूर्ण दुर्लक्ष आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images