Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जन्मस्थळ विकासाला गती द्या

$
0
0
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची १४0 वी जयंतीनिमित्त राज्यसरकार व जिल्हा प्रशासनाच्यावतीने कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळ येथे शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हाधिकारी राजाराम माने, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, महापौर सुन‌ीता राऊत यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोल्हापूरची प्रकाशवाट

$
0
0
कोल्हापूर जिल्ह्याच्या वीजबिल थकबाकीचे प्रमाण राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. त्याचप्रमाणे वीज निर्मितीतही जिल्ह्याने आपला वाटा उचलला आहे. जिल्ह्याची विजेची एकूण गरज १००५ मेगावॅट आहे.

राज्यघटनेने ऐक्य अबाधित

$
0
0
‘आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये अनेकवेळा यादवी होऊन लष्कराने देश ताब्यात घेण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात लोकशाहीमध्ये एकदाही लष्कराचा हस्तक्षेप झालेला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळेच आपल्या देशाची अखंडता टिकून आहे,’ प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी केले.

प्रसंगी मुख्यमंत्र्यांना कोल्हापूर बंदी

$
0
0
कोल्हापूरच्या टोल प्रश्नावर मुख्यसमंत्र्यांनी तत्काळ तोडगा न काढल्यास त्यांना प्रसंगी कोल्हापूर बंदी करू, असा निर्वाणीचा इशारा टोल विरोधी कृती समितीने गुरुवारी दिला. येथे आयोजित एक दिवसीय धरणे आंदोलनावेळी हा इशारा देण्यात आला.

वैद्यकीय अधिकारी एक जुलैला देणार सामूहिक राजीनामे

$
0
0
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दहा दिवसांत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन न पाळल्याने आता राज्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सेवा संचालक एक जुलैला सामूहिक राजीनामे देणार आहेत.

शहरात डेंगीचे दोन रुग्ण

$
0
0
किरकोळ तापाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना शहरात डेंगीचे दोन रुग्ण आढळले आहेत. राजारामपुरी आणि आर. के. नगर परिसरातील हे रुग्ण असून, त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

$
0
0
प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा खून केल्याची घटना लक्ष्मीपुरी पोलिसांनी उघडकीस आणली. चोरीच्या संशयाखाली ताब्यात घेतलेल्या संदीप महादेव दळवी (वय २५, रा. बागेवाडी, ता. पन्हाळा) याने खुनाची कबुली दिली असून, शाहूपुरी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याखाली अटक केली.

केएमटीचा मेकओव्हर

$
0
0
तोट्यात धावणाऱ्या केएमटीला उर्जितावस्था आणण्यासाठी प्रशासनाने नव्या १०४ बसेस खरेदीसाठीच्या निविदेला मान्यता दिली. यामुळे येत्या तीन महिन्यात केएमटीच्या ताफ्यात नव्या ७५ बसेस दाखल होतील. त्याचवेळी वडापशी स्पर्धा करून अधिका​धिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी तिकीट दर कमी करण्याचा प्रस्तावही तयार केला असून तो मं​जुरीसाठी आयुक्तांकडे पाठविला आहे.

आजपासून बालरोगतज्ज्ञांची परिषद

$
0
0
बालरोगतज्ज्ञ संघटना व बालरुग्ण विभाग डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या वतीने शनिवारी (दि.२८) व रविवारी (दि. २९) राज्यस्तरीय निरंतर अभ्यास परिषद आयोजित करण्यात आली आहे. परिषद लाइन बाजार डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज येथे होणार आहे.

मुलाकडून पित्याची फसवणूक

$
0
0
बनावट कागदपत्रे तयार करून कार विकून फसवणूक केल्याप्रकरणी वडिलांनी मुलाविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी मुलगा निखिल पांडुरंग पोवार (रा. साईनाथनगर, पुणे) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी दिली.

शिक्षण मंडळ सभापतीपदाच्या निवडणुकीस हरकत

$
0
0
नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाकडे सरकारनियुक्त दोन सदस्यांची नेमणूक झाली नसल्याने शिक्षण मंडळ सभापतीपदाची निवडणूक घेण्यास राष्ट्रवादीचे मेहबूब मुजावर यांनी हरकत घेतली आहे. त्यामुळे सोमवारी (ता ३०) होणाऱ्या सभापती निवडणुकीविषयी साशंकता निर्माण झाली आहे.

नवभांडवलशाहीच्या बाजूचा निकाल

$
0
0
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल भांडवलशाही विरोधातला नसून तो नवभांडवलशाहीच्या बाजूचा असला तरी, तो व्यक्तिद्वेषाचा निकाल असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक व राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबोधिनीच्या वतीने ‘लोकसभा निवडणूक २०१४ अन्वयार्थ’ व्याख्यानमालेंतर्गत ‘नमोवाद आणि जातीचे एकसंधीकरण’ या विषयावर ते बोलत होते.

हद्दवाढीविरोधात एक जुलैला

$
0
0
कोल्हापूर महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीला विरोध करण्यासाठी १ जुलैला पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर गोकुळ शिरगाव बस थांब्याजवळ सकाळी १० वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

महिलांच्या छेडछाडीविरोधात आवाज रंगमंचावर

$
0
0
‘महिलांच्या असुरक्षिततेवर अनेक व्याख्याने झाली. मोर्चा आंदोलनांनी देश ढवळून निघाला. मात्र तरीही गावातल्या गल्लीपासून ते दिल्लीतल्या कॉलनीपर्यंत महिलांवरील अत्याचारांची संख्या घटलेली नाही. महिलांकडे पाहण्याचा वासनांध दृष्टिकोन बदलायचा असेल तर प्रवृत्तीत आतून बदल व्हायला हवा.

आजपासून २० टक्के पाणीकपात!

$
0
0
जून महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरवल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्य धरणांमध्ये सध्या केवळ ६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. कोल्हापूर शहरासाठी भोगावती नदीतून बालिंगा व शिंगणापूर येथून केल्या जाणाऱ्या पाणी उपशात २० टक्के कपात करण्यात आली आहे.

पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया सुरू

$
0
0
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेस शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी शासकीय तंत्रनिकेतनमधून ८६९ अर्जांची विक्री झाली, तर शहरातील अन्य एआरसीमधून ६०० हून अधिक अर्जांची विक्री झाली. प्रवेश प्रक्रिया ६ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. पॉलिटेक्निकच्या ७०० जागा आहेत.

पंचायत समिती सभापतींचे आरक्षण जाहीर

$
0
0
पंचायत समितीच्या आगामी अडीच वर्षांसाठी सभापतीपदांचे आरक्षण शुक्रवारी जिल्हाधिकारी राजाराम याने यांच्या उपस्थितीत जाहीर झाले. रोटेशननुसार जाहीर करण्यात आलेल्या या आरक्षणात हातकणंगले, राधानगरी, गगनबावडा या पंचायत समितींचे सभापतीपद खुल्या वर्गासाठी निश्चित झाले.

शिवाजी विद्यापीठाची एम.एड. प्रवेश प्रक्रिया १ जुलैपासून

$
0
0
शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागात एम.एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेची सुरुवात एक जुलैपासून होणार आहे. शिक्षणशास्त्र अधिविभागासाठी प्रवेश प्रक्रिया स्वतंत्रपणे राबविली जाणार असल्याची माहिती शिक्षणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. एम. एस. पद्मिनी यांनी दिली.

पहिल्याच दिवशी अकरावीसाठी ८४५५ अर्ज विक्री

$
0
0
अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला शुक्रवारी प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी ८४५५ अर्जांची विक्री झाली. सायन्स शाखेसाठी सर्वाधिक ४७०२ अर्जांची विक्री झाली. त्या खालोखाल कॉमर्सच्या २६०५, तर आर्टसच्या ११४८ अर्जांची विक्री झाली. पहिल्याच दिवशी ६४३ अर्जांची स्वीकृती झाली.

उत्पादननिर्मितीच निर्यातीचा पाया

$
0
0
‘देशांतर्गत बाजारपेठ आणि ‌निर्यात या दोन्हींचा विचार करून दर्जेदार उत्पादनाची निर्मिती करणे हा निर्यातीमधील यशाचा पाया आहे’, असे प्रतिपादन फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशनचे निर्यात सल्लागार मुकुल बागकर यांनी शुक्रवारी येथे केले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images