Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सरकारी अनास्थेत अडकला गौरवग्रंथ

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्यावरील ग्रंथांच्या आतापर्यंत अनेक आवृत्या प्रकाशित झाल्या. मात्र, लोकोत्तर पुरुष असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या ‘राजर्षी शाहू गौरव ग्रंथा’ची तिसरी आवृत्ती प्रकाशित होण्यासाठी शाहूप्रेमींना तब्बल २५ वर्षे वाट पहावी लागली आहे.

प्रकल्प किमतीविषयी नोटीस

$
0
0
रस्ते प्रकल्पाचा एकूण खर्च, टोलवसुली आणि त्यासाठी येणारा खर्च, वसुलीचा कालावधी स्पष्ट करण्याबाबत हायकोर्टाने आदेश देऊनही राज्य सरकारने चार महिन्यात त्याबाबतची काहीच माहिती दिली नसल्याने टोल विरोधी कृती समितीच्या याचिकाकर्त्यांच्यावतीने सरकार, महापालिका व जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे.

ड्रेनेजलाइनचे काम पूर्ण

$
0
0
रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी गेली पाच वर्षे सुरु असलेले ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. ‘या कामावर आता केवळ फिनीशिंग केले जात असून येत्या आठवड्यात शाम सोसायटी नाला व परताळ्यातील सांडपाणी या लाइनमधून सोडण्यात येणार आहे,’ असे महापालिकेचे जलअभियंता मनीष पवार यांनी सांगितले.

थेट पाइपलाइन ४८४ कोटींची !

$
0
0
कोल्हापूर शहराला थेट पाइपलाइनद्वारे पाणी देण्याच्या योजनेचा सध्याच्या दरानुसार ४८४ कोटी १३ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचा अहवाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (एमजेपी) दिला आहे.

मेनन कुटुंबात कलह

$
0
0
कोल्हापुरातील प्रतिष्ठित औद्योगिक घराणे असलेल्या चंद्रन मेनन कुटुंबातील संपत्तीचा वाद चव्हाट्यावर आला आहे. आईनेच मुलाविरोधात फसवणुकीचा दावा दाखल केला केल्यामुळे कोल्हापूरच्या उद्योग, व्यापार क्षेत्रात तो चर्चेचा विषय बनला आहे.

मुलांच्या दाखल्यासाठी दहा हजार मातांची वणवण

$
0
0
एकीकडे पोटासाठी काम करायचे आणि दुसरीकडे मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी आईचे नाव लागावे म्हणून सरकारचे दार ठोठवायचे अशी कसरत सुरू असलेल्या जवळपास दहा हजार माता मुलांच्या जातीच्या दाखल्यासाठी वणवण करत आहेत.

CM बदलला तरी फरक पडणार नाही

$
0
0
‘राज्यात मुख्यमंत्री बदल झाला किंवा नाही तरीही राज्यातील आघाडी सरकार बदलण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे. त्यामुळे केंद्र सरकारप्रमाणे राज्यातही महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील,’ असा विश्वास केंद्रीय पर्यावरण आणि माहिती प्रसारण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी येथे व्यक्त केला.

वनमंत्री कदमांच्या जावईवर गुन्हा

$
0
0
पलूसच्या आमसभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप राजोबा यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध पलूस पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

‘आगामी अधिवेशन महायुतीचे असेल’

$
0
0
‘मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सिंचन घोटाळ्याचा खड्डा खोदला आहे. त्यावर माती टाकण्याचे काम महायुती करेल. सत्तारुढ सरकारने अनेक घोटाळे केले आहेत. मात्र केवळ अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढून मंत्र्यांना क्लिन चीट दिली जात आहे.

केंद्राकडून निधी आवश्यक

$
0
0
पंचगंगा नदी खोऱ्यातील प्रदूषण रोखण्यासाठी विविध पातळीवर सुरु असलेल्या प्रयत्न व आराखड्यांना बळ देण्यासाठी केंद्र सरकारने प्रायोगिक प्राथमिक योजना राबवण्याची गरज विज्ञान प्रबोधिनीच्यावतीने केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.

कोणतीही शाळा बंद पडू देणार नाही

$
0
0
‘वीस पटाच्या शाळा बंद पडू देणार नाही, त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे प्रयत्न केले जातील. शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांचीही भेट घेतली जाणार आहे’ अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

जिल्ह्यात पाच जागा लढवणार

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाच मतदारसंघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. महायुतीच्या माध्यामातून या जागांची मागणी करण्यात येणार असल्याचा ठराव आरपीआयच्या बैठकीत करण्यात आला.

कामगारांना महिन्यात पैसे

$
0
0
‘राज्यात पाच कोटी कामगार आहेत. यातील दोन कोटी संघटीत आणि तीन कोटी असंघटीत आहेत. कामगारांच्या व्यथा चळवळीतील कार्यकर्त्यालाच समजतात. सातत्याने आंदोलने, मोर्चे, आणि चळवळीव्दारे संघर्ष केला म्हणून आज लाल बावटा संघटनेमुळेच गरीब माणूस दोन घास सुखाचे खात आहे,’ असे गौरवोद्गार कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.

जयसिंगपुरात अफवेमुळे पंपांवर रांगा

$
0
0
पेट्रोलची आयात थांबणार असून मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होणार असल्याची अफवा व्हॉटस् अॅपवरून पसरली. अन् जयसिंगपूर शहर व परिसरात पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या रांगाच रांगा लागल्या.

सैन्यात नोकरीच्या आमिषाने फसवणूक

$
0
0
कराड तालुक्यातील एका तरुणाने भुदरगड तालुक्यातील सहा तरुणांकडून सैन्यात नोकरी लावतो म्हणून सुमारे १५ लाख रुपये उचल करून या तरुणांची फसवणूक केली आहे. या फसवणूक प्रकरणी भुदरगड पोलिसांनी अमित आनंदराव चव्हाण (वय २५, रा. उंडाळे, ता. कराड, जि. सातारा) याला मुंबईतून अटक केली.

वाहनांमुळे आरोग्य धोक्यात

$
0
0
कोल्हापूर शहरातील वाहनधारकांची संख्या वेगाने वाढत असून शहरापुढे त्यामुळे अनेक समस्यांचे डोंगर उभे राहात आहेत. भौतिक संपन्नतेला नियोजनाची जोड मिळण्याची तातडीची गरज आहे.

राज्याचे पाणी व्यवस्थापन पडद्यावर

$
0
0
राज्यातील धरणांतील पाणीसाठा, क्षमता, नदीजोड प्रकल्प, पाण्याच्य योग्य व्यवस्थापनातून शेती विकासाच्या योजना आणि सिंचन प्रकल्पांची सद्यःस्थिती याविषयीची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता रटाळ माहितीपत्रके आ​णि आकडेमोडीच्या अहवालाला छेद देण्यात आला आहे.

भाजीपाला कडाडला, कडधान्याची घसरण

$
0
0
रोहिणी व मृग ही दोन महत्त्वाची नक्षत्रे कोरडी गेली. त्याचा परिणाम भाजीपाला मार्केटवर झाला असून सर्वच भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. पावसाळा सुरू होताच कडधान्याच्या मागणीमध्ये वाढ होते.

प्रत्यक्ष सर्वेक्षण व्हायला हवे

$
0
0
‘पश्चिम घाटासंदर्भात स्थापन केलेल्या कस्तुरीरंगन समितीशी संबंधित सहा राज्ये आहेत. प्रत्यक्ष जमिनीवरून सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. त्याबाबत सूचना देण्यात आल्या असून गावांशीही चर्चा करून निर्णय घेऊ’ असे केंद्रीय पर्यावरण आणि माहिती प्रसारण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी येथे व्यक्त केला.

चोरट्यांच्या उच्छादाने शहर त्रस्त

$
0
0
शहर व परिसरात चेन स्नॅचरसह चोरट्यांनी गेल्या तीन आठवड्यात मोठा धुमाकूळ घातला आहे. या वाढत्या घटनांमुळे नागरिकामध्ये भितीचे वातावरण आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेण्याचे १२, घरफोडीच्या दहा घटनांसह एका प्रकरणात बॅग चोरीही झाली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images