Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

प्रशमच्या प्रयत्नाला लाभले यशाचे पंख

0
0
पेपर लिहायचे सोडाच, पेनाचे टोपणही काढता येत नव्हते. आईने कडेवरून नेले तरच शाळा, अशा प्रतिकूल परिस्थितीत झुंज देत प्रशम प्रशांत शेंडे याने दहावीच्या परीक्षेत ९३.६० टक्के गुण मिळविले. आजाराची पर्वा न करता जिद्दीने पहिली ते दहावीपर्यंत वर्गात पहिला क्रमांक पटकाविला.

‘गेकोमॅन’च्या नावाची पाल

0
0
कास पठारावर पालीची नवीन जात सापडली असून, तिला सरपटणारे आणि उभयचर प्राण्यांचे (हेरपेटॉलॉजी) संशोधक डॉ. वरद गिरी यांचे नाव देण्यात आले आहे. डॉ. गिरी यांचे शिक्षण कोल्हापुरातच झाले आहे.

महापौर राऊत यांना मुदतवाढ

0
0
येत्या सहा महिन्यांत महापौर, उपमहापौरांच्या निवडी करू नयेत असे पत्र राज्य सरकारने महापालिकांना पाठविले आहे. महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना मंगळवारी सायंकाळी हे पत्र मिळाले. राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे विद्यमान महापौर सुनीता राऊत यांना आणखी सहा महिने संधी मिळणार आहे.

अकरावी प्रवेश २७ जूनपासून

0
0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०१४ मध्ये घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या केंद्रीय प्रवेश समितीने प्रवेशाची जय्यत तयारी पूर्ण केली आहे.

दहावी निकालात मार्कांचा पाऊस

0
0
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवारी जाहीर झाला. यंदाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी मार्कांचा पाऊस पाडल्याचे ठळकपणे जाणवले.

टोलमुक्तीचा नारा CMच्या दारी

0
0
आयआरबीकडून सलग दुसऱ्या दिवशी टोल वसुली सुरू राहिली. सोमवारी रात्री काही वेळ बंद राहिलेले नाके मंगळवारी सुरळीत सुरू होते. दिवसभरात नाका परिसरात कुठे आंदोलने झाली नाहीत.

‘एलबीटी’ची बैठक भाजप-सेनेने उधळली

0
0
सोलापूर महापालिकेच्या महापौर अलका राठोड यांनी ‘एलबीटी’बाबत काय निर्णय घ्यावयाचा याबाबत महापालिकेतील स्थायी समितीच्या सभागृहात बोलावलेली बैठक भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली.

६० आरोग्य केंद्र, ग्रामीण हॉस्पिटलला मान्यता

0
0
राज्यात २००१ मध्ये असलेल्या लोकसंख्येच्या आधारावर तयार करण्यात आलेल्या बृहत आराखड्यात आणखी साठ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण हॉस्पिटलच्या स्थापनेस मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण हॉस्पिटलच्या खाटांच्या क्षमतेत वाढ करण्यात आली आहे.

‘मुस्लिम समाजावरील हल्ले पूर्वनियोजित कट’

0
0
‘फेसबुकवर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांची केलेली बदनामी आणि त्यानंतर मुस्लिम समाजावर झालेले हल्ले हा पूर्वनियोजित कट होता,’ असे मत राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी बुधवारी येथे केले.

...अन्यथा पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखू

0
0
दगड खाणीसाठी क्वॉरी झोनमधील ४२ एकर जागा मिळावी, या मागणीसाठी वडार समाजबांधवांनी येथील मंडल अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. जागेबाबत निर्णय घेण्यासाठी दिरंगाई होत असल्याने शहरातील प्रमुख मार्गावरून फेरी काढून प्रशासनाचा निषेध केला.

कळंबा तलाव आटला

0
0
पावसाने ओढ दिल्यामुळे कळंबा तलावातील पाण्याची पातळी खालावली आहे. खालावलेल्या पाणी पातळीमुळे दोन दिवस तलावातील पाण्याचा उपसा करता आला नाही.

शेवटच्या दिवसापर्यंत प्रचाराचा जोर कायम

0
0
पुणे पदवीधर - शिक्षक मतदारसंघात निवडणूक प्रचाराचा जोर शेवटच्या दिवसापर्यंत कायम होता. गेली सहा महिने वैयक्तिक भेटीनंतर आता जाहिराती आणि सार्वजनिक प्रचार साधनांच्या माध्यमातून प्रचार सुरू होता.

‘शिक्षक’, ‘पदवीधर’साठी उद्या मतदान

0
0
पुणे पदवीधर व शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी शुक्रवारी (ता.२०) मतदान होणार आहे. जिल्ह्यातील २१७ मतदान केंद्रांतून या दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान होईल.

पर्यायी रस्त्यांकडे महापालिकेची वाटचाल

0
0
आयआरबी कंपनीकडून टोलवसुली सुरू झाल्यानंतर महापालिकेनेही पर्यायी रस्ते निर्मितीसाठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. आयआरबीच्या टोलनाक्यांना पर्यायी रस्ते निर्मितीचा महापालिकेचा विचार आहे.

हद्दवाढीसाठी सोमवारी विशेष सभा होणार

0
0
जिल्हाधिकारी कार्यालय व नगररचना विभागाचा सकारात्मक अभिप्राय मिळाल्यानंतर हद्दवाढीसाठी निर्णायक पाऊल टाकण्यासाठी महापालिकेची विशेष सभा २३ जूनला होणार आहे. या सभेत घेतलेल्या निर्णयाची माहिती महिनाअखेर राज्य सरकारला कळविण्यात येईल.

जुन्या वाहनांवर करडी नजर

0
0
घरची लक्ष्मी म्हणून वीस पंचवीस वर्षानंतरही खिळखिळी झालेली वाहने वापरणाऱ्या वाहनमालकांवर आता आरटीओ खात्याने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. वाहनांची नोंदणी रद्द करा, अन्यथा पर्यावरण कर तरी भरा अशा नोटिसा तब्बल ६५ हजार वाहनमालकांना धाडल्या आहेत.

रेल्वे स्टेशनला आले ‘अच्छे दिन’

0
0
केंद्र सरकार अनेकवेळा मोहिमांची घोषणा करत असते. त्यातील शेवटपर्यंत कार्यरत असणाऱ्या यंत्रणेत फार मोठा फरक पडल्याचे जाणवत नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या पंतप्रधान रेल्वे स्वच्छता मोहिमेच्या घोषणेनंतर येथील रेल्वे स्थानकाला दररोज झळाळी येत आहे.

नदीपात्रातील मंदिरे खुली

0
0
पावसाने धरलेली ओढ व राजाराम बंधाऱ्यांची पातळी झपाट्याने खाली गेल्याने नदीपात्रातील मंदिरे खुली झाली आहेत. पंचगंगा नदी पात्रातील ब्रम्हदेवांचे मंदिर खुले झाले आहे. मंदिरातील देवतांचे दर्शन घेण्यासाठी पंचगंगा नदी परिसर व राजाराम बंधारा परिसरातील भाविकांची गर्दी वाढली आहे.

जन्मस्थळाचे सारेच अर्धवट

0
0
दीर्घकाळ सुरू असलेल्या लक्ष्मी-विलास पॅलेस या शाहू जन्मस्थळाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पातील सात इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. गेले अनेक वर्षे शाहू जन्मस्थळाचे काम रेंगळतच सुरू होते.

विनाटेन्शन वीज कनेक्शन

0
0
शहरातील वीजग्राहकांना काही महिन्यांत विनाअडथळा वीज मिळणार आहे. नवीन कनेक्शनही तातडीने उपलब्ध होणार आहेत. केंद्र सरकारच्या ‘इन्फ्रा टू’ योजनेत शहराचा समावेश झाल्यामुळे हे फायदे मिळणार आहेत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images