Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आरोग्य अधिकाऱ्यांच्या दवाखान्याला ठोकले कुलूप

0
0
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत खासगी प्रॅक्टीस करत असल्याच्या निषेधार्थ त्यांच्या दवाखान्याला अॅड. संतोष मळविकर यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी कुलूप ठोकून डॉ. खोत यांच्या कृतीचा निषेध नोंदविला.

कामगारांना वस्तूंऐवजी रक्कम

0
0
बांधकाम कामगारांना दिवाळीनिमित्त दोन चादरी, एक ब्लँकेट, एक जेवणाचा डबा आणि एक सतरंजी भेट देण्याची घोषणा कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती. मात्र आचारसंहितेमुळे या भेटवस्तू देता आल्या नाहीत. त्यामुळे आचारसंहितेनंतर या वस्तू देण्याबाबत कामगार संघटनांना पुन्हा आश्वासन देण्यात आले.

मुस्लिम समाजाला आठ टक्के आरक्षण द्या

0
0
हिंदी है हम हिंदोस्ताँ हमारा या संघटनेच्यावतीने मुस्लिम समाजाला आठ टक्के आरक्षण मिळावे आणि मस्जिद परवानगीबाबत जाचक अटी रद्द करून नवीन जीआर त्वरित काढावा, या मागण्यांसाठी काळ्या पट्ट्या बांधून मूक मोर्चा काढण्यात आला.

आजी-आजोबांना आधार!

0
0
साठ वर्षे एकमेकांना सोबत करणाऱ्या तुकाराम आणि अनुसया पाटील यांचे आता शरीर साथ देत नसले तरी त्यांनी थरथरत्या हातांनी परस्परांना आधार देण्याचे व्रत जपले आहे. पदरी मूलबाळच नसल्यामुळे त्यांचं दोघांचे एकमेकांसाठी जगणे सुरू होते.

नर्सेसचे आजपासून काम बंद

0
0
मागण्यांबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही प्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्यामुळे अखेर महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस असोसिएशनने मंगळवार (ता.१७) पासून कोल्हापुरात बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.

पालकमंत्री म्हणून सर्व जबाबदारी माझी नाही

0
0
‘पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील सर्व बाबींची जबाबदारी माझी नाही. मी जिल्हा नियोजन समितीला बांधिल असतो. जिल्ह्यातील मंत्री, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक हे सरकारच्या वतीने स्थानिक कामांची जबाबदारी घेत असतात,’ पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

टोल वसुली आणि विरोध

0
0
शिरोली आणि कळंबा टोल नाका वगळता शहरातील अन्य सात नाक्यांवर टोल वसुली रात्री उशीरापर्यंत सुरळीत झाली. प्रत्येक नाक्यावर पोलिस बंदोबस्त कायम होता. अतिरिक्त पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी सर्व टोलनाक्यांची पाहणी करत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

स्टेडियमचे पाच लाखांचे भाडे थकीत

0
0
शिवाजी स्टेडियमची देखभाल मिळणाऱ्या विविध कार्यक्रम, गाळेधारक आणि क्रीडा संघटनांना दिलेल्या भाड्यातून करण्यात येत आहे. मात्र काहीजण मैदानाचा वापर करुनही भाडे देण्यास टाळाटाळ करत आहेत. यामुळे विविध घटकांकडे क्रीडा संकुलाचे सुमारे पाच लाख रुपयांचे भाडे थकीत राहिले आहे.

वृक्षतोडप्रश्नी शिवसेनेचे आंदोलन

0
0
हॉटेल सुखसागरच्या मालकाकडून विल्सन पुलानजीकच्या झाडांची बेकायदेशीरपणे तोड आणि नाल्यातील जागा हॉटेलला भाडेपट्टीने दिल्याच्या कारणावरून शिवसेनेने सोमवारी रास्ता रोको केला.

कृती समितीच्या आवाहनानंतर तणाव

0
0
टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांनी रात्री नऊ वाजल्यापासून शिरोली टोल नाक्यावर वाहनधारकांना टोल न देण्याचे आवाहन सुरू केले.

‘कागल’मध्ये भगवा फडकविणार

0
0
मंडलिक गटामुळे ज्या मुश्रीफांना मानाची पदे मिळाली त्यांनीच लोकसभा निवडणुकीत प्रा.मंडलिकांचा पराभव केला. त्याची परतफेड करण्यासाठी माजी खासदार सदाशिवराव मंडलिक देतील त्या उमेदवाराला विजयी करुन विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा.

पहिल्या पावसात रस्ता गेला वाहून

0
0
लक्ष्मीपुरी येथील पोलिस वसाहतीतील आमदार फंडातून तयार केलेला डांबरी रस्ता पहिल्याचा पावसात वाहून गेला. प्रत्येक खोलीत एक पाण्याचा नळ द्या या मागणीकडेही साफ दुर्लक्ष झाले आहे. फुटलेल्या गटर, बंद पडलेल्या खोल्यात उंदीर, घुशी व मुंगसाच्या वावरामुळे पोलिसांची कुटुंबे त्रस्त झाली आहेत.

महालक्ष्मी मंदिरासाठी प्राधिकरण

0
0
‘शेगाव, शिर्डीच्या धर्तीवर महालक्ष्मी मंदिराचा विकास करण्यासाठी प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लवकरच घोषणा करतील’ असे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

कोल्हापूरच्या ‘लक्ष्मी’ची गेली रया

0
0
कोल्हापूर शहरातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणजे लक्ष्मीपुरी होय. धान्य बाजार, कांदा बटाटा मार्केट, भाजीमंडई, किरकोळ व्यापार, कोंडाओळ, इंजिनीअरिंग संदर्भातील विविध उत्पादने, बँका, पतसंस्था, मॉल, सायकलची दुकाने, हॉटेल्स असा सगळा पसरा असलेली ही बाजारपेठ म्हणजे कोल्हापुरची लक्ष्मीच होय.

पुन्हा टोलचा झोल

0
0
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांनी संरक्षण दिल्यानंतर सहा दिवसांनी सोमवारी सायंकाळी सव्वापाच वाजता शहरातील टोल वसुलीला सुरुवात झाली. शिरोली, शाहू, फुलेवाडी या तीन नाक्यांसह शहरातील सर्व नऊ नाक्यांवर एकाचवेळी वसुली सुरू झाली.

इचलकरंजी विभागात मानसी चव्हाण अव्वल

0
0
मार्च २०१४ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल मंगळवारी लागला .येथील मराठी मिडियम हायस्कूलची विद्यार्थीनी मानसी रमेश चव्हाण हिने ९८ टक्के गुण मिळवून इचलकरंजी विभागात अव्वल येण्याचा मान मिळविला आहे.

महसूल अधिकाऱ्यांना कोंडले

0
0
वडार समाजाच्या दगड खाण जागेच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी येथील गावचावडीस कुलूप ठोकून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना कोंडले.

कोल्हापूर विभाग ९३.८३ टक्के

0
0
आठवडाभर लांबलेला दहावीचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला अन् गेल्या पंधरा दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या मनातील हुरहूर अखेर दूर झाली. ९५.५७ टक्के निकाल लागलेला कोकण विभाग पहिल्या तर ९३.८३ टक्के निकालाने कोल्हापूर विभाग दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

पोलिस आणि जनतेत संघर्ष नको

0
0
टोलच्या मुद्द्यावरून जनता आणि प्रशासनात भांडण नको. तुमचा संघर्ष आयआरबी कंपनी आणि राज्य सरकारच्या धोरणाविरोधात आहे. पोलिसांना नाहक टार्गेट करू नका. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार प्रशासन कार्यवाही करत आहे.

मोटार झाडावर आदळून दोघे ठार

0
0
कोल्हापूर- पन्हाळा मार्गावर बांबरवाडीजवळ मोटार वेगाने झाडावर आदळून झालेल्या अपघातात अक्षय आप्पासाहेब पाटील (वय २३, रा. शुगरमिलजवळ, कसबा बावडा) व प्रसाद मुकुंद जाधव (२५, रा. कसबेकर पार्क, न्यू पॅलेस) हे दोघे तरुण ठार झाले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images