Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

स्कॉलरशिपचा निकाल अंतिम नाही

0
0
इयत्ता चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत मेरिटमध्ये येण्याची अपेक्षा असणाऱ्या विद्यार्थ्यांना बुद्धिमत्तेच्या पेपरमध्ये अत्यंत कमी गुण मिळाल्याने पालक आणि विद्यार्थीही गोंधळून गेले आहेत. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ केंद्रातून परीक्षा दिलेल्या अनेक विद्यार्थ्यांबाबत असा प्रकार घडला आहे.

‘कोयने’तून पुन्हा वीजनिर्मिती

0
0
मागील दहा दिवसांपासून येथील कोयना धरणातून पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी पाणी सोडणे बंद केल्यामुळे दोन वीजनिर्मिती केंद्रातून होणारी वीजनिर्मिती बंद झाली होती. मात्र, भारनियमनाच्या चौफेर टीकेमुळे वीजनिर्मिती कंपनीने पुन्हा वीजनिर्मिती सुरू केली आहे.

बहिष्कृत करून ५० हजारांचा दंड

0
0
कोल्हाटी समाजाच्या बहुचर्चित पंचांनी समाज संघटनेच्या नावाखाली ‘जातपंचायती’ला खतपाणी घालणे सुरूच ठेवल्याचे चित्र समोर येत आहे. आष्टा येथील समाजाने स्वतंत्र मेळावा घेतला म्हणून या कथित जात पंचायतीने आष्ट्यातील कोल्हाटी समाजाला बहिष्कृत करून ५० हजार रुपयांचा दंड मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.

कराडमध्ये ‘स्वाभिमानी’चा मोर्चा

0
0
सातारा जिल्ह्यासह शेजारील सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गत गळीत हंगामात गळीतास गेलेल्या ऊसाचा दुसरा हप्ता प्रतिटन ५०० रूपयांप्रमाणे येत्या दहा दिवसांत द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रविवारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या उपस्थित येथील तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.

प्लास्टिकमुक्त दाजीपूर...

0
0
असंख्य निसर्गप्रेमी व जंगलवेड्या पर्यटकांना भुरळ पडणाऱ्या निसर्गसमृद्ध दाजीपूर अभयारण्यात सध्या प्लास्टिकच्या पिशव्या,बिसरलरीच्या आणि काचेच्या बाटल्या व काचांचे ढीग सर्वत्र विखुरल्याने जंगलाचे मूळसौदर्य हरविण्याबरोबरच नैसर्गिक जलस्त्रोतांना बाधा निर्माण होत आहे.

उलगडले सूर्यकांत खांडेकरांचे अंतरंग

0
0
‘सहजीवनातील अनुभव प्रत्येक विवाहितांच्या गाठीशी असतात. पण एकमेकांच्या सोबतीने हा सहजीवनाचा प्रवास करत असताना जेव्हा त्यातील एक पान गळून पडते त्यानंतर उरलेल्या एकटेपणाला साथ मिळते ती आठवणींची.

‘शाहूंचे विचार संस्कार बनावेत’

0
0
‘ज्याच्या हातात राजदंड असतो, त्याला समाज सुधारण्याचा अ​धिकार असतो. तो अधिकार त्याने समाजोपयोगी उपक्रमांसाठी वापरणे अपेक्षित असते. राजर्षी शाहू महाराजांनी हे आपले राजेपण भान ठेवूनच निभावले.

एमफिल, पीएच.डीची प्रवेश प्रक्र‌िया सुरू

0
0
शिवाजी विद्यापीठाच्या एमफिल आणि पीएचडी अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सुरुवात रविवारपासून झाली. प्रवेश प्रक्रियेची सर्व प्रक्रिया एमकेसीएलकडे दिली आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांच्या परीक्षा २६ आणि २७ जुलै रोजी घेण्यात येणार आहे.

व्हॉट्सअॅप, फेसबुक अन् एसएमएस

0
0
पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र, मतदार पाच लाखांवर. त्या सर्वांच्या संपर्कासाठी उमेदवारांच्या हाती काही दिवस. ही सारी कसरत सांभाळण्यासाठी उमेदवारांनी टेक्नॉलॉजीचा आधार घेतला आहे. सुटीमुळे अनेक मतदारांचा संपर्क झालेला नसल्याने इंटरनेट, व्हॉटसअॅप, एसएमएसच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

बचतगटाच्या प्रणेत्या हरपल्या

0
0
बचतगटांची चळवळ समर्थपणे चालवून महिलांना आर्थिक स्वावलंबनाचे धडे देणाऱ्या, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, कॉम्रेड सुमित्रा संतराम पाटील (वय ९३) यांचे रविवारी वार्धक्याने निधन झाले. स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ कामगार नेते, कॉम्रेड संतराम पाटील यांच्या त्या पत्नी होत.

महिपतराव बोंद्रे यांचे निधन

0
0
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन ‘कृषीभूषण’ पापा ऊर्फ महिपतराव शंकरराव बोंद्रे (वय ८८) यांचे रविवारी दुपारी अडीच वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. रात्री आठ वाजता पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मूलभूत सोयी सुविधांवरही मर्यादा

0
0
जकातही नाही आणि एलबीटी बंद झाला तर शहरवासियांना मूलभूत सुविधा पुरविणे महापालिकेला अवघड जाईल अशी स्थिती आहे. महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नापैकी सर्वाधिक वाटा एलबीटीचा आहे. उत्पन्नाची साधने मर्यादित असताना गाडा हाकायचा कसा असा प्रश्न प्रशासन, पदाधिकाऱ्यांसमोर आहे.

‘लोकसहभागातून विकास’ बासनात

0
0
‘लोकसहभागातून शहराचा विकास’ करण्याची लोक​​प्रिय घोषणा वर्षभरापुर्वी महापालिकेत केली. या घोषणेचे स्वागत झाले. अनेकांनी आम्ही यामध्ये सहभागी होऊ असे सांगत चांगल्या योजनेला हातभार लावण्याचा संकल्प केला. पण वर्षानंतरही या योजनेला मुहूर्तच मिळालेला नाही.

परंपरेला दातृत्वाची साथ

0
0
राष्ट्रपुरुषांच्या बदनामीनंतर समाजकंटकांनी दुकानांच्या केलेली मोडतोड आणि लुटालुटीत नुकसान झालेल्या सर्वधर्मियांना रोख मदत देऊन शहराने पुरोगामी परंपरा आणखी मजबूत केली. ६७ जणांना रोख रक्कमेव्दारे मदत करत शहराच्या वैचारिक वारशाला प्रत्यक्ष कृतीची जोड दिली.

प्रकल्प रखडण्याची भीती

0
0
सातत्याने होत असलेल्या आंदोलनामुळे ठेकेदारांनी फिरवलेली पाठ, निविदा प्रक्रियेला मिळणारा अल्प प्रतिसाद या कारणांनी अनेक योजनांमध्ये अडथळे येत असतानाच एलबीटीही बंद झाला तर महापालिकेचा आर्थिक डोलाराच कोसळणार आहे.

‘लोकसभेत झालेल्या चुका आता टाळा’

0
0
‘लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका टाळून आघाडीचे पदवीधर मतदार संघातील उमेदवार सारंग श्रीनिवास पाटील आणि शिक्षक मतदार संघातून डॉ. मोहन राजमाने यांना पहिल्या पसंतीचे मतदान करून विजयी करावे,’ असे आवाहन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केले.

‘कोयना’पुत्रांच्या आठवणींना उजाळा

0
0
येथील कोयना धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे धरणापूर्वी अस्तित्वात असलेल्या गावांतील पुरातन काळातील अनेक वस्तू उघड्या पडल्या आहेत. तसेच देशाच्या ‘विकासाचे मंदिर’ उभे करण्यासाठी आपल्या घरादारांचा त्याग करून विकासाला योगदान देणाऱ्या कोयना पुत्रांची जुने गावठाणेही दिसू लागली आहेत.

जिल्ह्यात दुबार पेरणीची शक्यता

0
0
रोहिणीसह मृग नक्षत्र पूर्णतः कोरडे गेल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे. जिल्ह्यातील बहुतांशी भागात भात, नाचणीच्या पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी, पावसाचा जोर नसल्याने यामुळे दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘साखरेच्या प्रश्नांबाबत केंद्राकडे प्रस्ताव’

0
0
साखरेच्या दरामध्ये पुन्हा घसरण सुरु आहे. सध्या देशार्तंगत बाजारपेठत साखरेचे दर क्विटंलला २८०० ते २८५० असे आहेत. त्यामुळे साखर कारखानदारी अडचणीत आलेली आहे. यावर्षीचा हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरु करावा लागणार आहे.

कोल्हापूर रेल्वे स्टेशनसाठी अर्थसंकल्पात तरतूद करा

0
0
कोल्हापूरच्या रेल्वेस्टेशन २०१६ मध्ये शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करत असताना त्यापूर्वी येथील विविध प्रश्न सोडवण्यासाठी रेल्वे अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे केली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images