Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

रिक्षामामांची सवारी महागणार

0
0
शाळा सुरु होत असताना शालेय साहित्यांबरोबर पालकांचे लक्ष लागून राहिलेले असते ते विद्यार्थी वाहतुकीच्या दरांकडे. पेट्रोल, डिझेल दरवाढ वारंवार होत असली तरी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, शाळांच्या बस व केएमटी यांची दरवाढ मात्र वर्षातून एकदाच केली जाते.

टाउन हॉल इमारतीचे रूप झळाळणार

0
0
टाउन हॉलच्या इमारतीच्या बाह्य परिसर विकासासाठी राज्य सरकारने १ कोटी ९० लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे. १३ व्या वित्त आयोग योजनेतून हा निधी मिळणार आहे.

वर्षाला चार हजार ब्लड बॅग मोफत

0
0
रक्तदान केले तरी आम्हाला पाहिजे त्यावेळी ते मिळत नाही. मग रक्तदान करुन काय उपयोग, असा विचार करत असाल तर अनेक जिवांना मृत्युच्या खाईत ढकलत आहात हे समजून घ्या.

एलबीटीच हवा

0
0
कोल्हापूर महापालिकेने एलबीटी रद्द करून त्याऐवजी व्हॅटमध्ये वाढ करण्याच्या व्यापाऱ्यांच्या मागणीला विरोध केला आहे. एलबीटी रद्द करण्यासाठी व्हॅटमध्ये वाढ केली तर त्यातून महापालिकेला फारसे उत्पन्न मिळणार नाही.

विकास आराखडा रखडला

0
0
साडेतीन शक्तिरपीठापैकी एक आणि गेल्या काही वर्षात धार्मिक पर्यटकांच्या पसंतीस उतरत असलेल्या कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर परिसराचा १० कोटींचा विकास आराखड्याचा प्रस्ताव गेल्या वर्षभरापासून केवळ कागदावरच आहे.

व्यंकाप्पा पत्की यांचे निधन

0
0
समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते, विधानपरिषदेचे माजी आमदार अॅड. व्यंकाप्पा पत्की यांचे शनिवारी सायंकाळी मिरज येथील सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते.

व्यंकाप्पा पत्की यांचे निधन

0
0
समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते, विधानपरिषदेचे माजी आमदार अॅड. व्यंकटेश उर्फ व्यंकाप्पा नारायण पत्की यांचे शनिवारी सायंकाळी मिरज येथील सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

दिशादर्शक हरपला

0
0
देहदानासारखी चळवळ स्वतःच्या कुटुंबापासून सुरु करून समाजाला दिशा देणारा मार्गदर्शक हरपला, अशा शब्दांत माजी नगराध्यक्ष भिकाजीराव मोहिते यांनी डॉ.सुधाकर गोकाकाकर यांना श्रद्धांजली वाहिली.

जिल्ह्यात बेंदूर उत्साहात

0
0
कर्नाटकी बेंदूर सणानिमित्त जिल्ह्यात बैलांसह जनावरांचे पूजन शेतकरी कुटुंबियांनी केले. बैलांच्या सवाद्य मिरवणूक काढण्यात आल्या.

भुदरगडमध्ये ७९ नवे वर्ग

0
0
आरटीई अभियानांतर्गत भुदरगड तालुक्यात पाचवीचे ६६ व आठवीचे १३ वर्ग प्राथमिक शाळामध्ये सुरू होण्याचे संकेत आहेत. अंतराच्या निकषात बसणाऱ्या गावांच्या शिक्षण समितीने तसे प्रस्ताव सादर केले आहेत.

‘सेट’ परीक्षेत कोल्हापूर तृतीय

0
0
महाराष्ट्र राज्य प्राध्यापक पात्रता परीक्षेत (सेट) राज्यातील २८१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. २०११ पेक्षा हा चांगला निकाल असून यावेळी विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अर्ध्या टक्क्याने वाढून ते ४.०३ टक्के झाले आहे.

अन् अयान कुशीत विसावला

0
0
बुधवारी सकाळी नकळत रेल्वेत बसलेला अयान हा सात वर्षांचा मुलगा कोल्हापुरात पोहचला. भांबावलेल्या अवस्थेत तो दिवसभर शहरात फिरत होता. गर्दीत हरवून जाण्याची आणि आई-वडिलांपासून कायमीचे दूरावरण्याची वेळ त्याच्यावर आली होती.

स्मृतिगंधाने आयुष्य दरवळलं

0
0
प्रा. डॉ. कवी सूर्यकांत खांडेकर यांच्या पत्नी अनुराधा यांनी पतीच्या सहवासातील काही क्षण वेचून ते शब्दांच्या माध्यमातून मांडले. वयाच्या ८३ व्या वर्षी पुस्तकाच्या निमित्ताने खांडेकर यांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला.

टोलला नकार हा गुन्हा नाही

0
0
‘टोल कायदेशीर की बेकायदेशीर याचा निर्णय अजून कोर्टाने द्यायचा आहे. त्यामुळे कोणी टोल दिला नाही तर तो गुन्हा नसून टोल वसुलीसाठी कर्मचाऱ्यांनी नागरिकांना अटकाव केल्यास तो गुन्हा आहे.

‘एलबीटीऐवजी पर्याय हवा’

0
0
महापालिकेला या आर्थिक वर्षात १५० कोटीचे उत्पन्न एलबीटीतून अपे​​क्षित आहे. त्यामुळे १५० कोटी उत्पन्न देऊ शकणारा व महापालिकेची स्वायतत्ता टिकून ठेवणारा इतर कोणताही पर्याय महापालिका स्वीकारेल, असा प्रस्ताव महापालिकेने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सादर केला आहे.

पतीने केली पत्नीची हत्या

0
0
चारित्र्याच्या संशयावरून शहरातील यादवनगर येथे राहणाऱ्या आरती संजय केंगार (वय २८) हिचा पती संजय केंगार याने डोक्यात पाटा घालून खून केला. पती संजय केंगार खुनानंतर फरारी आहे.

शहरात पेट्रोल विक्री निम्म्यावर

0
0
शहराच्या हद्दीबाहेर चार रुपये स्वस्त दराने पेट्रोल-डिझेल मिळत असल्याने शहरातील पेट्रोलचा खप निम्यावर आला आहे. त्यामुळे शहरातील पेट्रोलपंपधारक अडचणीत आले आहेत. शहरात दरमहा १६ लाख लिटर तर शहरालगच्या पंपांवरून ६६ लाख लिटर पेट्रोलची तर डिझेलची शहरात ४ लाख ६० हजार लिटर तर शहरालगतच्या पंपांवर पावणेदोन कोटी लिटर डिझेलची विक्री होत आहे.

स्कूल चले हम...!

0
0
जून महिन्यात नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होते. त्यामुळे मुलांसाठी गणवेश, बूट-सॉक्स, चपला, वह्या-पुस्तके, पेन, दप्तर, कंपास, रंगपेटी अशा शैक्षणिक साहित्याच्या खरेदीची झुंबड उडालेली असते.

‘विशेष’ मुलांचे ग्रेट बाबा

0
0
आईविना मुलांचा सांभाळ करणे हे कोणत्याही पित्याच्यादृष्टीने आव्हानात्मक असते. त्यातही मुले जर ‘विशेष’ (गतिमंद) असतील तर त्यांचे बाबा ग्रेटच म्हणायला हवेत.

शूटिंगने केला गल्ला फुल्ल

0
0
सिनेमांचे माहेरघर असूनही चित्रनगरीचा प्रस्ताव खोळंबून राहिला असला तरी नैसर्गिक व ऐतिहासिक वैभव असलेल्या कोल्हापूर परिसरात यंदाच्या समरसिझनमध्ये शूटिंग शेड्यूलने कोट्यवधींचा गल्ला जमवून दिला आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images