Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कोल्हापूर बनले कचरा कोंडाळे

0
0
कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील असताना शहरातील कचऱ्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या महापालिकेची यंत्रणा दररोज शहरातून २०० टनांवर कचरा संकलित करत आहे.

रेल्वे गुड्स यार्ड ट्रॅकबाहेर

0
0
रेल्वे गुड्स यार्डमध्ये असलेल्या असुविधांचा फटका निर्यातीला बसला आहे. गेल्यावर्षीच्या उत्पन्नाच्या तुलनेत मध्य रेल्वेच्या कोल्हापूर विभागाला २ कोटी ५० लाख रुपयांचा तोटा झाला आहे.

दागिने लुबाडणाऱ्या महिलेला अटक

0
0
बचत गटाच्या हळदी-कुंकु कार्यक्रमांसाठी अडीच हजार रुपयांची लालूच दाखवून वृद्धेचे दागिने लुटणारी शीतल सखाराम खराडे उर्फ शीतल अरुण काशीद (वय २२, रा. बहिरेश्वर, ता. बालिंगा) या विवाहितेला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली.

थेट पाइपलाइनसाठी आणखी ६५ कोटी

0
0
थेट पाइपलाइन योजनेसाठी स्वतःचा १० टक्के वाटा देण्यासाठी महापालिकेला कर्ज उभारावे लागत आहे. आता कॉन्ट्रॅक्टरने टेंडरमध्ये भरलेल्या दरापेक्षा फक्त तीन टक्के दर कमी करण्याची तयारी दाखवल्याने महापालिकेला आणखी ६५ कोटी रुपये उभे करावे लागणार आहेत.

शेतकऱ्याच्या पोराचा यूपीएससीत झेंडा!

0
0
आई आणि वडीलांनी कधीही शाळा पाहिली नाही. कराड तालुक्यातील आबईचीवाडी येथे उदरनिर्वाहासाठी असलेली शेतीचं आयुष्याची शाळा मानली. पोराने मात्र यूपीएससी परीक्षेत मिळविलेले लख्ख यश पाहून आई-वडीलांना गहिवरुन आले.

सावर्डे-मांगले बंधाऱ्याला गळती

0
0
पन्हाळा तालुक्यातील सावर्डे व शिराळा तालुक्यातील मांगले दरम्यानच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-याला मोठ्या प्रमाणात गळती लागूनसुद्धा वारणा नदीवरील पाणी पट्टी वसूल करणाऱ्या पाटबंधारे विभागाने गांधारीची भूमिका घेतल्यामुळे मोठा अनर्थ होण्याची भीती व्यक्त होत आहे.

‘एव्हीएच’विरोधातील उपोषण मागे

0
0
हलकर्णी एमआयडीसीमध्ये पूर्वत्वास आलेला एव्हीएच प्रकल्प मानवी आरोग्य व पर्यावरणाला घातक असून तो रद्द करावा या मागणीसाठी जंगमहट्टी (ता. चंदगड) येथील रविंद्र पाटील व कुमरी (ता. गडहिंग्लज) येथील नारायण वाईंगडे यांचे सुरू असणारे उपोषण गरूवारी चौथ्या दिवशी सोडण्यात आले.

इथेनॉल पॉलिसी बदलण्याची गरज

0
0
साखर उद्योग वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. खासदार महाडिक यांनी मंत्री गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिले.

बालकाच्या हत्येप्रकरणी महिलेस कारावास

0
0
चार वर्षाच्या बालकाला पळवून नेऊन विहिरीत ढकलून खून केल्याप्रकरणी महानंदा उर्फ अंजू राजू नवगुंदे (वय ३५, आंबेडकरनगर, नांगाव, ता. हातकणंगले) या महिलेला जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जे. जमादार यांनी सात वर्षाची सश्रम कारावास व दोन हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.

वाड्या-वस्त्यांची पाण्यासाठी वणवण

0
0
पाऊस अद्यापही लांबला असल्याने आजरा तालुक्यातील २१ वाड्यावस्त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते आहे. पिण्याच्या पाण्यासाठीचे कुपनलिकांचे स्त्रोत काही ठिकाणी बंद आहेत.

‘कारखाना राष्ट्रवादीचा नव्हे’

0
0
आजरा साखर कारखान्याची सत्ता उलथवून टाकण्यात राष्ट्रवादीसह तत्कालीन आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी पुढाकार घेतला होता,त्यामुळेच सत्तांतर झाले. त्यावेळी ठरलेले धोरण बासनात गुंडाळून राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते केवळ राष्ट्रवादीनेच कारखान्यात सत्तांतर केल्याप्रमाणे मनमानी करीत आहेत.

वारणा नदीत बेकायदा वाळू उपसा

0
0
वारणा नदीत सातवे (ता.पन्हाळा) हद्दीत बेकायदा वाळू उपसा पुन्हा सुरु झाला आहे. मागील माहिन्यात महिनाभर सुरु असलेला बेकायदा वाळू उपसा ‘महाराष्ट्र टाईम्स’ मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच ठेकेदाराने बंद केला होता. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जुजबी कारवाईला ठेंगा दाखवत आठ दिवसांपासून पुन्हा वाळू उपसा सुरु झाला आहे.

दगड खाणींसाठी वडार आक्रमक

0
0
दहा वर्षांपासून मागणी करूनही दगड खाणीसाठी जागा न मिळाल्याने जयसिंगपूर येथील वडार समाज बांधव आक्रमक झाले आहेत. खाणीसाठी जागाच नसल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोल्हापूरचा चौकार

0
0
यूपीएससीने गुरुवारी जाहीर केलेल्या निकालात राज्यातील मराठी उमेदवारांनी आपला टक्का कायम राखला. या निकालामध्ये राज्यातील सुमारे ९० उमेदवारांनी यश मिळविले असून कोल्हापूरच्या भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्राच्या (प्री-आय. ए. एस. ट्रेनिंग सेंटर) चार प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

४ जी युगासाठी कोल्हापूर सज्ज!

0
0
इंटरनेट जगतात आतापर्यंत ३ जी सर्वांत जलद समजली जात होती. दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडविणाऱ्या या प्रणालीनंतर आता वेध लागले आहेत ते ४ जीचे. कोल्हापूर शहरातील इंटरनेटधारकांना ही सेवा लवकरच मिळण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे काम सुरू झाले आहे.

मालवाहतुकीची दरवाढ अखेर स्थगित

0
0
रेल्वे गुडस कॉन्ट्रॅक्टरना (हुंडेकरी) सहा पट जादा दर आकारण्याचा घेतलेला निर्णय रेल्वेने पुढील आदेशापर्यंत मागे घेतला आहे. राज्यातील हुंडेकरी ट्रान्स्पोर्ट कॉन्ट्रॅक्टरनी मालाची भरणी उतरणी बंद केल्यानंतर केंद्र सरकारच्या पातळीवर झालेल्या चर्चेनंतर रेल्वेने तातडीने हा निर्णय घेतला.

टोल, एलबीटीमुक्ती हाच महायुतीचा अजेंडा

0
0
‘कोल्हापूरसह राज्य टोल व एलबीटीमुक्त करणे हाच आगामी विधानसभेसाठी महायुतीचा अजेंडा असेल’ अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एकतर्फी प्रेमातून कोतोलीत खून

0
0
पन्हाळा तालुक्यातील कोतोलीपैकी भाचरवाडी येथे सासुरवाडीत आलेल्या एका तरुणाचा गोळीबार करुन खून करण्यात आला. एकतर्फी प्रेमाच्या रागातून लग्नाच्या मागणीला नाकारल्याच्या रागातून संबंधित संशयिेताने सायंकाळी सहाच्या सुमारास हा गोळीबार केला.

नालेसफाई पुन्हा ‘गाळात’च

0
0
पावसाळ्याला सुरुवात झाली असली तरीही अद्याप शहरातील विविध भागांतील नालेसफाईचे काम पूर्ण झालेले नाही. जयंती, दुधाळी यांसह नाल्यांच्या पात्रांमध्ये ठिकठिकाणी खरमाती, केरकचरा, प्लास्टिक साहित्य टाकण्यात आल्याने प्रवाहात अडथळे निर्माण झाले आहेत.

उत्पन्न जाते कोठे?

0
0
शिवाजी स्टेडियमच्या माध्यमातून क्रीडा संकुल समितीला वर्षाला सुमारे दहा लाख ९० हजारांचे उत्पन्न मिळत आहे. यातील बहुतांशी रक्कम वीज बिल, कर्मचारी पगार व जलतरण तलावाच्या मेंटनन्ससाठी खर्च होत आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images