Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

डिचोली ग्रामस्थांचे स्थलांतर

0
0
गेल्या सहा दशकांहून कोयनाधरणांतर्गत ऊन, वारा, पाऊस व हिंस्त्र श्वापदांचा सामना करून संघर्षमय जीवन जगणाऱ्या डिचोली (ता. पाटण) गावातील ग्रामस्थांनी अखेर मनावर दगड ठेवून कोयनावासीयांना ‘अखेरचा हा तुला दंडवत...’ घालत गाव सोडले. या वेळी भावूक झालेल्या डिचोली ग्रामस्थांची कोयनानगर येथे वाजतगाजत मिरवणूक काढून त्यांना निरोप देण्यात आला.

आजरा घनसाळची डीएनए टेस्ट

0
0
चवीला चांगला, सुवासिक आणि अजूनही आपले अस्तित्व टिकवून असलेला आजरा घनसाळ आता अस्सल स्वरुपात उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांकडून नजरचुकीने भातात होणाऱ्या मिसळीमुळे ‘अस्सल आजरा’ मिळत नाही. यासाठी कृषी विभागाने आजरा घनसाळची शिवाजी विद्यापीठात डीएनए चाचणी करून घेतली आहे.

शिष्यवृत्तीचा ऑनलाइन निकाल

0
0
गेल्या अनेक दिवसांपासून या ना त्या कारणाने लांबणीवर पडलेला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल सोमवारी दुपारी ऑनलाईन जाहीर झाला. ५० टक्केहून अधिक निकाल लागल्याची माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त व्ही. बी. पायमल यांनी दिली.

जातपडताळणी मोहीम

0
0
विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक २ कार्यालयामार्फत ३० सप्टेंबर २०१३ पर्यंत समितीच्या कार्यालयाकडे सादर केलेल्या सेवाविषयक जात पडताळणी प्रस्तावांपैकी प्रलंबित जात पडताळणी प्रस्तावांचा निपटारा करण्यासाठी १४ व १५ जून रोजी कागदपत्रांच्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे.

पाणी संस्था कोलमडल्या

0
0
सहकारी पाणी पुरवठा संस्थांच्या माध्यमातून गावपातळीवर विकासगंगा आली. त्या संस्थांमध्ये राजकारण वाढू लागल्याने एकेकाळी व्यवस्थापनामुळे सुरळीत असलेल्या संस्थांचे व्यवस्थापनही कोलमडू लागले आहे.

दीपकच्या आयुष्यात ‘मयुरी’चा प्रकाश

0
0
दीपक पेशाने कलाशिक्षक. उमदा आणि कर्तबगार तरुण. शिर्डी येथे कलाशिक्षक म्हणून काम करताना मयुरी कुलकर्णी ही त्याच कॅम्पसमध्ये शिकत असलेली युवती त्याच्या आयुष्यात आली. दीपक अंध असूनही मयुरी त्याच्या प्रेमात पडली. त्याची परिण‌ती विवाहात झाली. मयुरी दीपकशी कोल्हापुरात विवाहबद्ध झाली. आता मीच माझ्या दीपकची दृष्टी असे ती सांगते.

१२५ जणांवर गुन्हा दाखल

0
0
सोशल साइट्सवर राष्ट्रपुरुषांची बदनामी केल्याच्या प्रकारातनंतर रविवारी काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्यासह शंभर ते सव्वाशे कार्यकर्त्यांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

टोलमुक्तीचे आंदोलन

0
0
टोलमुक्तीचा पुन्हा एकदा एल्गार करीत महामोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरलेल्या कोल्हापूरकरांनी टोलमुक्तीचा नारा पुन्हा एकदा बुलंद केला. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकवटलेले कार्यकर्ते, ‘देणार नाही, देणार नाही टोल आम्ही देणार नाही,’ आणि ‘टोलमुक्त कोल्हापूर’ अशा घोषणा देत सोमवारी रस्त्यावर उतरलेल्या हजारोंच्या जनसमुदायाने टोल विरोधाचा आवाज आणखी बळकट केला

टोलविरोधी आंदोलन

0
0
भगवा, तिरंगा, भगवा, हिरवा, निळा, पांढरा, लाल अशा रंगाचे झेंडे असूनही सर्व पक्ष संघटनांनी एकत्र येऊन आंदोलनाच्या टप्प्यातील तिसऱ्या महामोर्चात वज्रमूठ बांधली. करवीरकर जनतेने पुन्हा एकदा ‘टोल आम्ही देणार नाही’ असे या मोर्चातून सरकारला ठणकावले.

३० जणांनी पाहिले सुंदर जग

0
0
ज्यांचे आयुष्य फक्त आवाज ऐकणे आणि स्वप्नात जग पहाणे यातच निघून गेले असते, अशा तीस अंध व्यक्तींना यंदा सुंदर जग पाहण्याची संधी मिळाली. मरणोत्तर नेत्रदान केलेल्यांमुळे अंध जीवन जगणाऱ्या तीस जणांना डोळे बसविण्यात आले आहेत.

गोकुळचे दूध महागले

0
0
अखेर गोकुळने दूधाच्या विक्री दरात २ रुपयांनी वाढ केली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतरही तो जाहीर करण्याबाबत गोकुळच्या संचालकांनी गुप्तता पाळली. खरेदी-विक्री अशा दोन्ही दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

५८१चौ.किमी जंगल क्षेत्र घटले

0
0
राज्यातील जंगल क्षेत्र सातत्याने कमी होत असून गेल्या तीन वर्षांत राज्यातील ५८१ चौरस किलोमीटर इतके जंगल क्षेत्र कमी झाले असल्याचे विविध सरकारी अहवालांच्या विश्लेषणांवरून दिसून येते. विशेष म्हणजे ही घट वनखाते आणि फॉरेस्ट डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्राच्या अखत्यारीतील असल्याचे दिसून येते.

अंगणवाड्यांचे बांधकाम रखडले

0
0
लोटेवाडी (ता. भुदरगड) येथील दोन अंगणवाडी इमारतींचे बांधकाम मागील दोन वर्षे रखडले आहे. परिणामी ठेकेदारच्या मनमानीपणामुळे अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलांना प्राथमिक शाळेतील इमारतींचा आश्रय घ्यावा लागत आहे.

समाजाला पुढे नेणारा उमेदवार निवडा

0
0
‘यंदाच्या पदवीधर निवडणुकीत विचारधारेला महत्व आले आहे. संसदेला धर्मसंसद करायला निघालेल्या पक्षाच्या उमेदवारापेक्षा समाजाला पुढे नेणाऱ्या प्रवाहातील उमेदवाराची निवड करणे ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी केले.

गाव ठरवणार क्षेत्राची सीमा

0
0
राज्यातील पश्चिम घाट परि-संवेदनशील (इको सेन्सिटिव्ह झोन) क्षेत्राची सीमा ठरविण्याचा अधिकार आता काही प्रमाणात या भागात समाविष्ठ झालेल्या गावांनाच मिळणार आहे.

खेळाडू आरक्षण नियमांची माहिती घ्या

0
0
खेळाडूंना पाच टक्के आरक्षणामधून नोकरीची संधी देताना राष्ट्रीय संघटनांनी अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंसाठी तयार केलेल्या नियमावलीची सरकारने माहिती घ्यावी, अशी मागणी शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या माधवी पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली.

टेक्स्टाइल, मोबाइल रिपेअरिंगकडे कल’

0
0
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तरुण उद्योजकांनी अर्ज खरेदीसाठी रांगा लावल्या आहेत. पहिल्या दोनच दिवसात सुमारे साडेतीनशे अर्जांची विक्री झाली असून २३ ते ३५ वयोगटातील बेरोजगार तरुणांचा टेक्स्टाइल आणि मोबाइल रिपेअरिंग तर महिलांचा मसाले पापड, घरगुती पदार्थ बनविण्याच्या व्यवसायाकडे कल असल्याचे दिसते.

गांडूळ प्रकल्प रखडला

0
0
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोजच्या कचऱ्यामुळे निर्माण होणारी अस्वच्छता व दुर्गंधीची समस्या दूर करण्यासाठी गांडूळ खत प्रकल्प उभारण्याचा निर्णय नोव्हेंबर २०१३ मध्ये प्रशासक महेश कदम यांनी घेतला होता.

स्थलांतर प्रस्तावाने काँग्रेसमध्येच फूट

0
0
पंचायत समिती कार्यालयासाठी शेंडा पार्कातील जागेची मागणी करणाऱ्या वादग्रस्त ठरावावरून बुधवारी (दि.११) होणाऱ्या करवीर पंचायत समितीच्या मासिक सभेत रणकंदन होण्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेससमोर आव्हानांचा डोंगर

0
0
नरेंद्र मोदी यांच्या लाटेत कोल्हापूरात तगलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर विधानसभा निवडणुकीत आव्हानांचा डोंगर उभा आहे. जादा जागा पदरात पाडून विजयाचा झेंडा फडकविण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images