Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आज बारावीचा निकाल

$
0
0
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा ऑनलाइन निकाल सोमवारी (ता.२ जूनला) जाहीर होणार आहे. कोल्हापूर विभागातून १ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

केवळ आश्वासनेच!

$
0
0
सरकारी पातळीवरील समस्या अजूनही प्रलंबित आहेत. लोकप्रतिनिधींकडून सातत्याने अधिवेशनामध्ये आवाज उठवूनही सरकारकडून केवळ लेखी उत्तरे व आश्वासनांशिवाय या प्रश्नांना न्याय मिळत नसल्याची परिस्थिती आहे.

कोल्हापूर: अफवांमुळे तणाव

$
0
0
शनिवारच्या दगडफेक आणि जाळपोळीच्या प्रकारांमुळे रविवारी सकाळपासूनच शहरात तणाव होता. शहराच्या सर्वच प्रमुख चौकात, प्रार्थनास्थळांजवळ सशस्त्र पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. हिंदुत्ववादी पक्ष संघटनांनी ‘कोल्हापूर बंद’ची हाक दिल्याने सकाळपासून बाजारपेठांसह वाहतूक कडकडीत बंद राहिली.

२८ समाजकंटकांना अटक

$
0
0
राष्ट्रपुरूषांच्या बदनामी प्रकरणी झालेल्या निषेध सभेनंतर शनिवारी मध्यरात्री जमावाने जाळपोळ आणि लुटालूट करून पहाटेपर्यंत शहराच्या मध्यवर्ती भागात दहशत निर्माण केली. पोलिसांनी दिवसभरात २८ समाजकंटकांना अटक केली आहे.

विधानसभेला हिशेब चुकता करू

$
0
0
‘म्हैसाळ योजनेच्या पाणीप्रश्नावरून जर कोणी राजकारण करीत असेल तर त्यांना त्यांच्याच पद्धतीने चोख उत्तर देऊ. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उर्वरीत हिशेब चुकता करू,’ असा इशारा खासदार संजय पाटील यांनी आर. आर. पाटील यांना नाव न घेता दिला.

विधानसभेसाठी गुडघ्याला बाशिंग

$
0
0
विविध पक्षांतील प्रमुख कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहे. काही जण आपल्या उमेदवारीबाबत दावा करीत आहेत. तर काही भाजपामध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी काहीनी भलीमोठी होर्डिंग्ज देखील लावली आहेत.

समाजकंटकांवर कारवाईची मुस्लिम समाजाची मागणी

$
0
0
सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व हिंदू देवदेवतांची विटंबना करणाऱ्या प्रवृतींचा सांगली जिल्हा मुस्लिम समाजाने निषेध केला आहे.

बुलेटच्या ठोक्याची मुरगूडकरांना भुरळ

$
0
0
मागील काही वर्षात अज्ञातवासात गेलेली बुलेट पुन्हा मुरगूडची शान बनत आहे. शहरातील युवा वर्गात बुलेट गाडीची जबरदस्त क्रेझ निर्माण झाली असून अवघ्या सहा महिन्यात शहरात शंभराहून अधिक बुलेट दाखल झाल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या ई-टेंडर प्र‌क्रियेत गोलमाल

$
0
0
राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे जिल्हा परिषदेच्या विकासकामांकरीता राबवल्या जाणाऱ्या ई-टेंडर प्रक्रियेबाबत गोलमाल दिसून येतो. सामान्य लोकांना तांत्रिक ज्ञान नसल्याचा गैरफायदा घेत ऑनलाईन प्रक्रिया चुकीच्या पध्दतीने कार्यरत असल्याचा आरोप जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

‘दलितमित्रा’चा मदतीचा हात

$
0
0
शिरोळ तालुक्यातील कोथळी येथे २६ एप्रिल रोजी झालेल्या या दंगलीत शेतमजूर तुळशीदास कांबळे (वय ५५) हे जखमी झाले. २० मे रोजी त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. घरचा कर्ता पुरूष गेल्याने अंध पत्नी व अपंग मुलांसमोर आता जगायचे कसे असा प्रश्न पडला.

‌शिरोळमध्ये१२ वाळू आवट्या उद्ध्वूस्त

$
0
0
शिरोळ तालुक्यात खिद्रापूर, राजापूर, गौरवाड येथील विनापरवाना १२ वाळू आवट्या महसूल विभागाने उद्ध्वस्थ केल्या. तसेच वाळू उपशाच्या सात यांत्रिक बोटी जप्त करण्यात आल्या. तहसीलदार सचिन गिरी यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे वाळू चोरांचे धाबे दणाणले आहे.

चंदगड तालुक्याचा बारावीचा निकाल ९५ टक्के

$
0
0
तालुक्यातील १३ कनिष्ठ महाविद्यालतील २३१२ विद्यार्थ्यांपैकी २१९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यानुसार तालुक्याचा एकूण निकाल ९४.६५ टक्के इतका लागला. राज्याप्रमाणे चंदगड तालुक्यामध्येही पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढल्याचे निकालावरुन दिसून आले.

इचलकरंजीतील जनजीवन पूर्वपदावर

$
0
0
गेल्या दोन दिवसांपासून शहरात असलेला तणाव सोमवारी निवळल्याचे दिसून आले. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनी दाखविलेल्या संयमाने शहरातील व्यवहार आज पूर्वपदावर आले.

पाणीपुरवठा दुपारनंतर सुरळीत होणार

$
0
0
कृष्णा नळपाणी योजनेच्या नवीन जलवाहिन्या जोडण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. त्यामुळे मागील चार दिवसांपासून शहराला होणारा पाणीपुरवठा थांबला झाला आहे.

एव्हीएचसह प्रांतही हटाओ

$
0
0
चंदगड येथील एव्हीएच प्रकल्प सरकारने तत्काळ बंद करावा, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रांताधिकारी विवेक आगवणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. मात्र निवेदन घेण्यावरून वाद निर्माण झाल्यामुळे ‘एव्हीएच हटाओ’ सोबत ‘प्रांत हटाओ’च्या घोषणांनी जोर पकडला.

दर शुक्रवारी पोलिस ठाण्याला भेट

$
0
0
सुजाण आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी यापुढे कोल्हापुरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना दर शुक्रवारी पोलिस स्टेशनमध्ये चालणाऱ्या कामकाजाची ओळख करुन दिली जाणार आहे.

वीज पडून शेतकरी ठार

$
0
0
वारणा शिवारे (ता.शाहूवाडी) येथे वीज पडून बाबासाहेब श्रीपती मुदळे (वय ३८) या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. वादळी वारे, जोरदार पाऊस सुरू झाल्यानंतर मुदळे हे शेतातून घरी परतत असताना ही दुर्घटना घडली.

‘सुंदर’ला हलविण्यात निसर्गाचा अडथळा

$
0
0
जोतिबाच्या सुंदर हत्तीला ट्रकमध्ये चढवण्याची सर्व तयारी करूनही सोमवारी रात्री वादळी वा-यासह सुरु झालेल्या जोरदार पावसाने मोहीम थांबवण्यात आली. वारणा दूध संघाच्या कार्यस्थळावर लोकांनी गर्दी केली होती. दिवसभर प्रयत्न करणारी केरळ येथून आलेली टीम परत न जाता कोल्हापुरात थांबली होती.

‘पीटीएम’ खंडोबा चषकाचा मानकरी

$
0
0
धडकी भरवणाऱ्या चढाया, तितकाच भक्कम बचाव, आक्रमक चढाईला जोरदार चढाईने दिले जाणारे प्रत्त्युत्तर अशा रंगतदार आणि वेगवान खेळाचा नमुना पाटाकडील तालीम मंडळ (पीटीएम) आणि शिवाजी तरुण मंडळाच्या खेळाडूंनी पेश केला. दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी खंडोबा जल्लोष चषकावर कब्जा मिळवण्यासाठी आमने सामने आले होते.

सर्वसामान्य मतदार हाच माझा गॉडफादर

$
0
0
‘माझा कोणीही राजकीय गॉडफादर नाही. सामान्य मतदार हाच गॉडफादर असल्याने विजय निश्चित आहे’ असा असल्याचा विश्वास पुणे पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांनी व्यक्त केला. निवडणुकीसाठी २ जूनला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images