Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

करिअरचे दालन खुले

0
0
बारावीनंतर उपलब्ध असलेल्या करिअरच्या विविध संधी घेऊन ‘टाइम्स एज्युफेस्ट’ शनिवारपासून विद्यार्थी आणि पालकांच्या भेटीला येत आहे. तीन दिवस सुरू राहणाऱ्या एज्युफेस्टमध्ये कोल्हापूर, सांगली आणि बेळगाव येथील नामांकित शिक्षणसंस्था सहभागी होत आहेत.

पाइपलाइनचा खर्च केंद्राने करावा!

0
0
थेट पाइपलाइनसाठी येणारा वाढीव खर्च २० ते २५ टक्क्यांच्या आसपास जाणारा आहे. हा खर्च महापालिकेला म्हणजेच पर्यायाने जनतेला परवडणारा नसल्याने याचा भार केंद्र सरकारने उचलावा, अशी मागणी ‘कॉलिंग कोल्हापूर’ संघटनेच्या शनिवारी झालेल्या बैठकीत करण्यात आली.

कोल्हापूर बंद

0
0
सोशल मीडियावर राष्ट्रपुरुषांची बदनामी करणाऱ्या समाजकंटकांचा निषेध करण्यासाठी रविवारी (ता. १ जून) कोल्हापूर बंदची हाक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दिली आहे. उद्या सकाळी ११ वाजता शिवाजी चौकात आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते निदर्शने करतील.

सावकाराला लुटणारे पोलिस निलंबित

0
0
गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस असल्याची बतावणी करीत व्यापाऱ्याचे खंडणीसह अपहरण करणाऱ्या चौघा पोलिसांना १२ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी या चौघांचे निलंबन केल्याचे सांगितले.

दुर्गवैभव

0
0
गडकिल्ले ही देशाची राष्ट्रीय संपत्ती आणि अनमोल ठेवा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण तेरा किल्ले आहेत. अनेक राजवटींचा इतिहास पाहिलेल्या या किल्ल्यांची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. मात्र त्यांच्या देखभालीबाबत पुरातत्व खाते व सरकारच्या पातळीवर उदासीनता दिसून येते.

गडकोटांना वैभव

0
0
विशाळगडसह राजगड व तोरणा या पश्चिम महाराष्ट्रातील तीन किल्ल्यांसह राज्यातील अकरा किल्ल्यांना गतवैभव मिळवून देण्यात येणार आहे. या कामाची सुरुवात पावसाळा संपताच होणार आहे. यासाठी विशेष आराखडाही तयार करण्यात आला आहे. या किल्ल्यांवर पर्यटन वाढण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

सांगली, मिरज, सातारा बंद

0
0
‘फेसबुक’ या सोशल मीडियाच्या माध्यमातून महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात रविवारी तीव्र प्रतिक्रिया उमटली. सांगली, मिरज, कराड, सातारा शहरांत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार दिवसभर थंडावले होते.

१२वीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन

0
0
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा ऑनलाइन निकाल सोमवारी (ता.२) जाहीर होणार आहे. कोल्हापूर विभागीय मंडळाने यासाठी हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

एसटी झाली ६६ वर्षांची

0
0
प्रवाशांच्या सेवेत असलेल्या एसटीचा रविवारी ६६ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. सीबीएसमध्ये केक कापून आणि आतापर्यंतच्या एसटीच्या वाटचालीचा चित्ररथ प्रवाशांना पाहण्यासाठी ठेवण्यात आला. वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रवाशांनीही उत्स्फूर्तपणे सीबीएसवर गर्दी केली.

विद्यापीठात एकाच दिवशी १३४ जणांचा वाढदिवस

0
0
रविवारी (ता.१) विद्यापीठातील वाढदिवस असलेल्या अधिकारी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची संख्या १३४ असल्याने शिवाजी विद्यापीठात आजचा दिवस बर्थ डे स्पेशल झाला.

टोलवसुली लांबणीवर?

0
0
टोल वसुलीची जय्यत तयारी असताना फेसबुकवरील प्रतिमा विटंबना प्रकरणावरून झालेल्या मोडतोडीच्या प्रकरणामुळे टोल वसुली पुढे जाण्याची शक्यता आहे. राज्य राखीव दलाच्या तुकड्यातील जवान शहरात ​अचानक उद्भवलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नेमल्याने टोल नाक्यांवर बंदोबस्त उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे.

...म्हणून 'त्या' विम्यापासून १५१ कुटुंबे वंचित

0
0
कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी अपघात विम्यापासून तांत्रिक अडचणींमुळे १५१ कुटुंबाना लाभ मिळालेला नाही. गेल्या पाच वर्षामध्ये नैसर्गिक आपत्तीसह इतर अपघातांमध्ये ८२२ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र विमा कंपनीकडून केवळ ६३५ शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा विम्याचा लाभ मिळालेला आहे.

बुडून युवकाचा मृत्यू

0
0
विशाळगड पर्यटनासाठी जात असताना गेळवडे धरणात आंघोळ करण्यासाठी गेलेल्या अबुबकर सुलतान मुल्ला (वय १८) या युवकाचा बुडून मृत्यू झाला. मुल्ला हा सांगली येथील संजयनगरमधील हडको कॉलनीत राहणारा आहे.

मनोरुग्ण महिलेवर बलात्कार

0
0
मनोरुग्ण महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी कृष्णा तुकाराम पोवार (वय ४०, रा. गंगारामनगर, टोप, ता. हातकणंगले) याच्याविरोधात शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

...म्हणून तलाव निर्मनुष्य

0
0
बांबवडेतील तलावामध्ये असलेली मगर अद्यापही न सापडल्याने हा तलाव निर्मनुष्य झाला आहे. मगर पकडणारे तज्ज्ञ न सापडल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून वनविभागानेही हात झटकले आहेत.

इदरगंजचे पठार पर्यटकांसाठी खुले?

0
0
संवेदनशील अभयारण्य असलेल्या राधानगरी इदरगंजचे पठार आता सर्वांसाठी खुले होण्याची शक्यता वाढली आहे. विविध अल्पजीवी फुलांनी नटलेले, बहरलेले प्रती कासपठार पाहण्याची पर्यटकांत उत्सुकता असल्याने वनविभागाकडून पठार खुले करण्याच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.

कृषी पर्यटनाला संधी

0
0
राज्य मंत्रिमंडळाने कृषी पर्यटनाचे धोरण निश्चित केले असून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी पर्यटनाचे दालन खुले झाले आहे. या धोरणाचा कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघाचे कोषाध्यक्ष बाळासाहेब डोंगळे यांनी पत्रकार परिषदेत केले.

शाहू स्मारकाचा पडदा पडेना

0
0
दसरा चौकातील शाहू स्मारक भवनच्या मुख्य सभागृहाचा पडदा गेल्या दोन महिन्यांपासून वायर तुटल्याने वरच्यावरच अडकला आहे. त्यामुळे रंगमंच अक्षरशः उघडा पडला आहे.

करमणूक कराचे दहा कोटींचे उद्दिष्ट

0
0
सिनेमा पाहिला, करमणूक झाली आणि सिनेमाची चर्चा कट्ट्यावर रंगली एवढ्यापुरते सिनेमाचे गणित संपत नाही. सिनेमाच्या माध्यमातून लोकांची करमणूक होण्याबरोबरच राज्याला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळत आहे.

अतिक्रमणांचा विळखा

0
0
छोट्या छोट्या प्रमाणात होत असलेल्या अतिक्रमणांकडे महापालिकेकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे शहरात अतिक्रमणाची बजबजपूरी वाढत चालली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images