Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

दोन जूनपासून काम बंद

$
0
0
मागण्यांची तत्काळ कार्यवाही न केल्यास २ जूनपासून रा‌ज्यातील बारा हजार वैद्यकीय अधिकारी असहकार सुरू करुन कामबंद आंदोलन करणार आहेत.

१९ गावांची वाहतूक बंद

$
0
0
भाडेतत्त्वावरील ३० बसेस बंदच असल्याने कोल्हापूर शहरांतर्गत प्रवाशांना नियोजित वेळेत बसेस उपलब्ध होण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.

आमदारांची धावपळ

$
0
0
ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता असल्यामुळे आचारसंहिता दीड-दोन महिन्यांत कधीही लागू शकते. त्याआधी सर्व स्थानिक विकासनिधी खर्च करण्यासाठी बहुतांश आमदारांनी जिल्हा नियोजन मंडळाकडे प्रस्ताव पाठवला आहे.

टोलचे राजकारण जोरात!

$
0
0
महापौरांचा अवमान म्हणजे कोल्हापूरच्या जनतेचा अपमान आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माफी मागावी. त्यांनी नोटीस मागे न घेतल्यास वेगळा लढा लढावा लागेल, असा इशारा टोल विरोधी कृती समितीच्या बैठकीत देण्यात आला.

हॉस्पिटल रजिस्ट्रेशन कधी?

$
0
0
कोल्हापूर शहरातील हॉस्पिटलसाठी महापालिकेचे रजिस्ट्रेशन बंधनकारक असूनही कडक अटी व नियमांमुळे डॉक्टरांनी याकडे पाठ फिरवली आहे. आम्ही रजिस्ट्रेशन करण्यास तयार आहोत परंतू अटी शि‌थील करा, अशी मागणी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनकडून करुनही अद्याप याबाबतचे त्रांगडे कायम राहिले आहे.

आर्ट गॅलरी संकटात

$
0
0
भिंतीला गेलेला तडा झाकण्यासाठी केलेले पॅचवर्क, चित्र लावण्यासाठी असलेल्या पिन्सच्या जागीच फिरणारा एक्झॉस्ट फॅन आणि बंद असलेले काही फोकस लाइट अशा अवस्थेतच शाहू स्मारक आर्टगॅलरीची गाडी सुरू आहे.

कोल्हापूरला हद्दवाढ?

$
0
0
पुणे महापालिकेची गुरुवारी हद्दवाढ झाली आहे; पण कोल्हापूरला का नाही, असा सवाल करवीरची जनता विचारत आहे. नगरपरिषधेची महापालिका झाल्यापासून कोल्हापूरला एक इंचही हद्दवाढ झालेली नाही.

'सुंदर'ची मुक्तता

$
0
0
सुंदर हत्तीला बेंगळुरू येथील वाइल्ड लाइफ रेस्क्यू अँड रिहॅ​बिलिटेशन सेंटर येथे सोडण्याच्या हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देणारी आमदार ​विनय कोरे यांची याचिका गुरुवारी सुप्रीम कोर्टाने फेटाळली. त्यामुळे सुंदरला १५ जूनपर्यंत बेंगळुरूला पाठवावे लागणार आहे. ही प्रक्रिया कोरे यांनी राबवायची आहे

शाहू जन्मस्थळामध्ये पुरातन वस्तूंसाठी स्वतंत्र दालन

$
0
0
शाहू जन्मस्थळाच्या कामाच्या तिसऱ्या टप्प्यातील कामाला लवकरच सुरूवात होत आहे. मात्र, शाहू जन्मस्थळाच्या परिसरात अनेक पुरातन वस्तू पडल्या आहेत. १२ व्या शतकापासूनची शिल्पे याठिकाणी पहायला मिळतात. त्यांना शाहू जन्मस्थळाच्या जागेत जागा न मिळाल्यामुळे त्यासाठी स्वतंत्र जागेची मागणी करण्यात आली आहे.

निषेध मोर्चा

$
0
0
अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा (ता.जामखेड) गावातील नितीन आगे या तरूणाचा मृत्यू म्हणजे एकविसाव्या शतकातही दलितांवर होणा-या अत्याचाराचा एक नमुनाच आहे. या घटनेचा निषेध नोंदवितानाच अशा घटनेबाबत संवेदनशीलता हरवून बसलेल्या आघाडी सरकारचा निषेध नोंदवित अन्याय-अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने येथे मोर्चा काढण्यात आला.

खत प्रकल्प बारगळणार?

$
0
0
विविध कंपन्यांनी निविदा न पाठविल्याने मलकापूर नगरपालिका कचऱ्याच्या विल्हेवाटीतून उभारणार असलेला सेंद्रिय खत प्रकल्प बारगळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

लाटणे मोर्चा

$
0
0
आशा कर्मचारी व गटप्रवर्तकांना ग्रामीण पातळीवरील आरोग्य कर्मचारी म्हणून सेवेत कायम करा, त्यांचे मानधन निश्चित करा यांसह इतर मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर शुक्रवारी लाटणे मोर्चा काढण्यात आला.

पटसंख्या वाढवण्याची धडपड

$
0
0
खासगी शाळांचे आव्हान, पटसंख्येवरील परिणाम यावर मार्ग काढण्यासाठी महापालिका शाळांतील शिक्षक उन्हाळी सुट्टी संपण्यापूर्वीच कॅम्पेनिंग करणार आहेत. पटसंख्या वाढीसाठी पालक, विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाणार आहे.

खासगी सावकारीप्रकरणी अटक

$
0
0
खासगी सावकाराकडून घेतलेल्या ५० हजार रुपयांच्या कर्जापोटी वर्षभरात ६० हजार देऊनही आणखी ५० हजारांची मागणी झाल्याने त्रस्त झालेल्या महिनेने खासगी सावकाराविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी शिवाजी खेडकर आणि त्याची पत्नी शोभा (दोघेही रा. मोरे-माने नगर) या दोघांना रात्री उशिरा अटक केली.

शहर अभियंत्यांवर हल्ला

$
0
0
टोलनाक्यांच्या परिसरात उभारण्यात आलेले शेड महापौरांनी काढून टाकण्याचे आदेश दिलेले असतानाही अडचणी सांगत कारवाई टाळणाऱ्या शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी फैलावर घेतले. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत हे आयआरबी कंपनीच्या बाजूने झुकत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

मान्सूनपूर्व पाऊस

$
0
0
ढगाळ वातावरणामुळे मान्सूनची चाहूल लागलेली असताना शुक्रवारी सकाळी शहरात मान्सूनपूर्व सरींनी हजेरी लावली. पावसाने काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक हजेरी लावली. त्यामुळे काही काळ हवेत गारवा निर्माण झाला असला तरी त्यानंतरच्या उघडिपीमुळे मात्र दिवसभर उष्मा जाणवत होता.

ट्रक-एसटी टक्कर, चार ठार

$
0
0
मिरज-पंढरपूर मार्गावर कुची (ता. कवठेमहांकाळ) जवळ थांबलेल्या ट्रकला एसटी बसने दिलेल्या धडकेत कोल्हापूरच्या महिलेसह चारजण जागीच ठार, तर १५ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बसवाहकाचाही समावेश आहे.

जुना राजवाडा अडचणीत

$
0
0
मराठ्यांची राजधानी व १८५७ चा बंडाचा साक्षीदार असलेल्या जुना राजवाड्यावर उगवलेल्या झाडांच्यामुळे धोका निर्माण झाला आहे. झाडे काढण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाड्यातील महत्त्वाचा भाग ढासळण्याच्या मार्गावर आहे.

एसटीची भाडेवाढ

$
0
0
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विविध मार्गावर केलेली भाडेवाढ येत्या एक जून पासून लागू करण्यात येणार आहे. साधी, जलद, रातराणी, निमआराम या बसच्या भाड्यात वाढ केली आहे.

कॅन्सरचा विळखा

$
0
0
भारताला जगातील तोंडाच्या कॅन्सरची राजधानी म्हटले जाते. तंबाखूजन्य पदार्थांच्या धूम्रपानामुळे होणाऱ्या कॅन्सरचे दुष्परिणाम माहिती असूनही बहुतांश तरुणाई गुटख्याच्या नादाला लागली आहे. या गुटख्यामुळे तंबाखूपेक्षा अधिक वेगाने कॅन्सर होतो व त्याचवेगाने तो वाढतोही.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images