Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पंचगंगेचे पाणी तिस-यांदा पात्राबाहेर

$
0
0
गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार कोसळणा-या पावसाने पंचगंगेचे पाणी आज तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडले. शनिवारीही पावसाचा जोर कायम राहिल्याने शहरात ठिकठिकाणी तळ्याचे स्वरूप आले.

थेट पाइपलाइनला मंजुरी

$
0
0
राज्याचे मुख्य सचिव जयंत बांठिया यांनी ‘होपलेस’ ठरविलेल्या काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेला शनिवारी राज्य सरकारने मंजुरी दिली. ‘यूआयडीएसएसएमटी’ने मंजूर केलेली ४२५ कोटी ४१ लाख रुपयांची योजनी स्वीकारण्यात आली आहे.

प्रवेशाचा घोळ थांबवा; अन्यथा टाळे ठोकू

$
0
0
यावर्षीचा आयटीआय प्रवेशाचा गोंधळ दूर करुन तातडीने सुरळीत प्रवेश प्रक्रिया राबवावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयटीआयचे प्राचार्य दिनेश माने यांच्याकडे केली.

अपंगत्वाचे प्रमाण रोखण्यासाठी सुविधा वाढवाव्यात

$
0
0
भारतात लहान मुलांमध्ये शारिरीक व बौध्दिक अपंगत्वाचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी प्रशासन, स्वयंसेवी संस्था व मेडीकल असोसिएशन यांनी संयुक्तपणे पुढाकार घेऊन शिक्षण व सोयीसुविधा वाढवण्याची गरज असल्याचा सूर कॉमनवेल्थ असोसिएशन फॉर हेल्थ डिसॅबिलीटीच्या (कोमहॅड) वतीने झालेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात व्यक्त झाला.

अनुसूचित जाती योजनेसाठी ६६ कोटी

$
0
0
अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत जिल्ह्यात ६५ कोटी ९२ लाखाची तरतूद करण्यात आल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार गायकवाड यांनी दिली.

सुविधा कमी, अडचणी जादा

$
0
0
लांबी व उंचीने कमी असलेले प्लॅटफॉर्म, कमी जागेमुळे जादा प्लॅटफॉर्म तयार करण्यातील अडचण, उपलब्ध प्लॅटफॉर्मवरही प्रवाशांना जाण्यासाठी होणारा त्रास पाहता सध्याच्या रेल्वे स्टेशनवर सुविधा कमी व अडचणी जादा असाच प्रकार आहे.

संभाजीनगर रिंग रोड बनतोय डेंजर झोन

$
0
0
संभाजीनगर रिंग रोड डेंजर झोन बनत चालला आहे. संभाजीनगरातील कळंबा फिल्टर हाउस ते शेंडा पार्कपर्यंत मेन रोडला जोडणारी पाच धोकादायक वळणे आहेत.

यापुढेही एकत्रित लढणार

$
0
0
‘आम्ही वसंतदादा घराण्याशी एकनिष्ठ आहोत. यापुढील काळातही एकनिष्ठ राहून विधायक राजकारण करणार आहे. एकत्रितपणे लढून आमची ताकद दाखवून देऊ,’ असे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सांगितले.

‘शेकाप’चे अॅड. देसाई यांचे निधन

$
0
0
कराड येथील प्रथितयश वकील व शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अॅड. भाऊसाहेब बळवंत देसाई यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते.

‘टंचाई निवारणा’ची मुदत ३१ जुलैपर्यंत

$
0
0
सांगलीत प्रशासकीय इमारतींसाठी असलेल्या जागेवर नवीन जिल्हाधिकारी कार्यालय बांधण्यासाठी सरकारने २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी रविवारी दिली.

रेल्वेच्या गुलबर्गा विभागीय कार्यालयाला विरोध

$
0
0
रेल्वेमंत्री झाल्यानंतर मल्लिकार्जून खर्गे यांनी सोलापूरला पहिला दणका दिला आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर कार्यालयाचे विभाजन करून गुलबर्गा येथे नवीन विभागीय कार्यालय सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

महापुराच्या चर्चेला पुन्हा मिळाले निमित्त

$
0
0
कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्यांमुळे शिरोळ तालुका सुजलाम् सुफलाम् झाला. कोल्हापूर जिल्ह्याच्या तुलनेत या तालु्क्यात पावसाचे प्रमाण सर्वात कमी आहे.

जयसिंगपुरातील खत कारखान्यामुळे दुर्गंधी

$
0
0
जयसिंगपूरजवळच्या धर्मनगरलगत जनावरांच्या मासांपासून खत तयार करण्याचा कारखाना आहे. या कारखान्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होत असून तिर्थक्षेत्राचे पावित्र्य नष्ट होत आहे.

जिल्ह्यात संततधार कायम

$
0
0
गेल्या चार दिवसापासून राधानगरी तालुक्यात सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसाने राधानगरी धरण सध्या ९२ टक्के भरले असून हे धरण पूर्ण संचयन क्षमतेने भरून धरणाचे दरवाजे खुले होण्यासाठी आता केवळ पाच फूट पाण्याची गरज आहे.

अंगणवाडी सेविकांची ड्रेसकोडच्या नावाखाली लूट

$
0
0
अंगणवाडी सेविकांकडून ड्रेसकोडच्या नावाखाली भुदरगड पंचायत समितीच्या एका विभागाने प्रत्येक सेविकेकडून ४५० रुपये घेऊन ८० ते १०० रुपये किमतीच्या साड्या खरेदी करून हजारो रुपयाचा ढपला पडला आहे.

‘साखर कारखान्यांनी बायप्रॉडक्टकडे वळावे’

$
0
0
‘साखर कारखानदारांनी व्यवस्थापकीय मूल्यांमध्ये बदल करून नव्या बाजारपेठेला तोंड देणे आवश्यक आहे. ऊसाचे उत्पादन केवळ साखरेसाठी नसून इथेनॉल, वीज निर्मितीच्या माध्यमातून साखर कारखानदारीला चांगले दिवस येऊ शकतात.

महामंडळाच्या एफडी मोडल्या नाहीत

$
0
0
‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या मुदतबंद ठेवी (एफ.डी.) मोडून पुणे येथील महोत्सव साजरा केलेला नाही.

‘महाडिकांचा दुटप्पीपणा चालणार नाही’

$
0
0
‘राष्ट्रवादीकडून पुतण्याला खासदारकीची उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करायचे आणि दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या अध्यक्षपदावर हक्क सांगायचा हा आमदार महादेवराव महाडिक यांचा दुटप्पीपणा चालणार नाही’ असा इशारा खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी दिला.

सतेज पाटलांचा मार्ग NCP मुळेच मोकळा

$
0
0
‘थेट पाइपलाइनला मंजुरी मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रयत्न केले. त्यामुळे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला’ असा टोला कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला.

रेल्वे प्रवाशांना दारातच तिकिटे

$
0
0
प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या सोलापूर रेल्वे विभागाने आता प्रवाशांना ‘कॅश’ करण्यासाठी त्यांच्या दारापर्यंत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images