Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

नव्या सात रस्त्यांचा मार्ग मोकळा

$
0
0
दुसऱ्या विकास आराखड्यातील रस्त्यांसाठी वर्षानुवर्षे रखडलेल्या भूसंपादनासाठी महापालिका आयुक्तांनी बुधवारी संबंधित जागामालकांना जागा विकसन हक्क ह्स्तांतरणपत्र (टीडीआर) किंवा बांधकाम निर्देशांक (एफएसआय) देण्याचे आदेश दिले.

पदवीधरांच्यायोजनांसाठी प्रयत्नशील

$
0
0
‘पदवीधर मतदारसंघातून आजवर निवडून गेलेल्या प्रतिनिधींनी पदवीधरांसाठी काय केले हा प्रश्न अनेक वर्षे अनुत्तरीत आहे. पदवीधरांचे स्वावलंबन आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र योजना आणि दृष्टी विकसित करून प्रतिनिधीत्व करण्याची माझी इच्छा असल्यामुळे उमेदवारी जाहीर केली आहे,’ असे पुणे पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉ. अशोक थोरात यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी उमेदवारी

$
0
0
शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या सर्व प्रश्नांचे निराकरण करुन शैक्षणिक गुणवत्तेसाठी गेली २८ वर्षे मी प्रयत्नशील आहे. सामाजिक प्रश्नांवर आंदोलने आणि शैक्षणिक क्षेत्रात विविध पदांच्या माध्यमांतून केलेल्या कामाच्या शिदोरीवर पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून मी उमेदवारी जाहीर केली असल्याची माहिती शिक्षक हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. प्रतापराव देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मतदार यादीत नाव नोंदवले का?

$
0
0
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. येत्या २० जून रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत अनेकांनी नावे नोंदविलेली नसल्याने मतदानाची संधी मिळत नाही.

वडापशी स्पर्धा आवश्यकच

$
0
0
कमी झालेली बससंख्या, शाळा कॉलेजला असणाऱ्या सुट्या आणि वडाप काढून घेत असलेले उत्पन्न अशा आव्हानात्मक परिस्थितीत केएमटीला उत्पन्न वाढीसाठी स्पर्धेला उतरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

२० वर्षांनी रिक्षा स्टॉपची फेररचना

$
0
0
मोकळी जागा दिसली की लाव रिक्षा ..हे आता शहरात दिसणार नाही, कारण आता शहरात १६७ रिक्षा स्टॉप निश्चित करण्यात येणार आहेत. सध्याच्या स्टॉपमधून ४४ बंद करण्याचा प्रस्ताव आहे. आरटीओ, महापालिका व पोलिस खात्याने सर्व्हे करून हे नवीन स्टॉप निश्च‌ित केले आहेत.

क्रिकेटसाठी स्टेडियम हवे

$
0
0
कुस्ती पंढरी म्हणून कोल्हापूरची ओळख आहे, परंतु आज राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर कुस्तीमध्ये कोल्हापूरची ओळख उरलेली नाही. फुटबॉलची लोकप्रियता प्रचंड असली तरी ती स्थानिक पातळीपुरतीच मर्यादित आहे.

टोलनाक्यांवरील काम बंदोबस्तात

$
0
0
शिरोली, शाहू नाक्यांसह नऊ टोलनाक्यांवर जिल्हा पोलिस प्रशासनाने पोलिस बंदोबस्तास सुरुवात केल्याने कोणत्याही क्षणी टोल वसुली सुरू होण्याची शक्यता आहे. बुधवारी दिवसभर पोलिसांसाठी सुविधा उभारण्याचे काम बंदोबस्तात सुरू झाले.

श्री महालक्ष्मी समूर्त, साकार

$
0
0
देवतांची मंदिरे शक्तिपीठे म्हणूनच ओळखली जातात. अशा शक्तिपीठांपैकीच एक कोल्हापूरची श्री अंबाबाई. सर्वदूर असलेली तिची ही ओळख अत्यंत सुंदर आणि सुबक छायाचित्रांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न ‘श्री महालक्ष्मी समग्र दर्शन’ या पुस्तकातून केला आहे.

दुचाकी चोर अटकेत

$
0
0
इचलकरंजी शहर व परिसरात मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास गावभाग पोलिसांनी गजाआड केले. मोहब्बत उर्फ मेहबूब अल्लाउद्दीन नदाफ (वय २८ रा. संगमनगर ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे.

अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

$
0
0
बिद्री (ता. कागल) येथे बंद घराच्या पाठीमागून प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कमेसह अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास केला. कोल्हापूरहून तातडीने श्वानपथकाला पाचारण केले पण त्यातून फारसे काही हाती लागले नाही.

एव्हीएच प्रकल्प हटवणारच

$
0
0
हलकर्णी एमआयडीसीमध्ये होऊ घातलेल्या एव्हीएच प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रकल्पामुळे मानवी जीवन धोक्यात येणार असून पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे. याचा सर्वाधिक फटका परिसरातील लोकांना बसणार आहे. सरकारने हा प्रकल्प तत्काळ बंद करावा, यासाठी कृती समितीच्या पुढाकाराने सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत चंदगड तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

नजरा टँकरकडे

$
0
0
उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत आहेत, तशी सातारा जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नानो तोंड वर काढले आहे. सातारा जिल्ह्यातील माण व खटाव या दुष्काळग्रस्त तालुक्यांतील गावांसह ४९ गावे व ७३ वाड्यांतील ५५ हजार ९०१ इतक्या लोकसंख्येला ३३ टँकरने पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

कराडमध्ये डेंगी

$
0
0
कराड शहराजवळील मलकापूर येथील व्यंकटेशनगरसह कोयना वसाहतीत डेंगीचे तीन रुग्ण आढळल्यानंतर मलकापूर पंचायतीने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. पाच आरोग्य पथकांमार्फत प्रत्येक घर तपासण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

मिरज दंगलः १३ जणांची सुटका

$
0
0
मिरज दंगलीवेळी दाखल झालेल्या गुन्ह्यातून माजी आमदार नितीन शिंदे, अॅड. स्वाती शिंदे यांच्यासह तेरा जणांची कोर्टाने गुरुवारी सबळ पुराव्याअभवी निर्दोष मुक्तता केली.

तासगाव कारखाना संकटात

$
0
0
तासगाव तालुका सहकारी साखर कारखाना राज्य सरकारच्या आदेशानुसार अवसायकांकडे द्या, अशी मागणी करत कारखान्याच्या सुमारे अडीचशे कामगारांनी अयोध्या टॉवर येथील राज्य सहकारी बँकेच्या कार्यालयासमोर गुरुवारी दुपारपासून धरणे आंदोलने केली.

नातवाने केली आजीची हत्या

$
0
0
जीप गाडी खरेदी करण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून सावत्र नातवाने आजीचा खून केल्याची घटना शाहूवाडी तालुक्यातील मोसम पैकी पाटीलवाडी येथे घडली. यात सखुबाई राजाराम कांबळे (वय ४५) या आजी मृत झाल्या. यातील आरोपी आकाश यशवंत कांबळे याला शाहूवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले.

स्मिताला हवी मदत

$
0
0
सोलगे मळा, इचलकरंजी येथील स्मिता सुनील माने (वय १४) सध्या दोन्ही किडनी निकामी झाल्याने मृत्यूशी झुंज देत आहे. पण परिस्थितीअभावी उपचारासाठी होणाऱ्या प्रचंड खर्चामुळे तिचे पालक हतबल झाले आहे.

भारनियमनाचे राजकारण

$
0
0
कोळशाची कमतरता, गॅसचा तुटवडा आणि विजेचा वाढलेला वापर, वादळी वाऱ्यामुळे पडलेले खांब आणि बंद पडलेल्या डीपी अशा कारणांमुळे राज्यातील काही भागांमध्ये वीज गायब झाली. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने भारनियमन सुरू केल्याचा आरोप होऊ लागला आहे.

४३ हजार गुरुजी नोंदणीविना

$
0
0
पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे वारे वेगाने वहात असले तरी पाच जिल्ह्यांतील एक लाख १० हजार शिक्षकांपैकी केवळ ६७ हजार जणांनी नावनोंदणी केली आहे. तब्बल ४३ हजार शिक्षकांनी नावनोंदणी केलेली नाही.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images