Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अश्विनी दानिगोंड यांना मेदी बिझ टीव्ही पुरस्कार

$
0
0
मनोरमा इन्फोसिसच्या प्रमुख अश्विनी दानिगोंड यांना नुकतेच ‘मेडिकल कौन्सिल आणि मेदी बिझ टी. व्ही. २०१४’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

सदस्यांचे बदल्यांचे अधिकार ठरणार कळीचा मुद्दा

$
0
0
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी उमेश आपटे यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. २७) होणारी पहिलीच सभा गाजण्याची चिन्हे आहेत. ग्रामपंचायत विभागाच्या कारभाराबाबत सदस्यांनी केलेल्या तक्रारी, पावसाळ्यापूर्वीचा आढावा, सदस्यांचे बदल्यांबाबतचे काढून घेतलेले अधिकार आणि २०१३-१४ च्या सुधारित आणि २०१४-१५ चे अंदाजपत्रकीय बजेटला मंजुरी असे विषय या सभेत असणार आहेत.

वेळकाढूपणामुळे विधानसभा निवडणूकही ठरणार हद्दवाढीत खोडा

$
0
0
महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर गेल्या ४२ वर्षात एक इंचही हद्दवाढ न झालेली​ महापालिका म्हणजे कोल्हापूर. राजकीय नेत्यांनी वेळोवेळी आपली ताकद हद्दवाढीच्या विरोधातच वापरल्याने हद्दवाढ झालेली नाही. न्यायालयाने सहा महिन्यांत निर्णय घेण्याची मुदत दिली असली तरी आगामी विधानसभा निवडणूकही आता हद्दवाढीला खोडा घालणारी ठरणार आहे.

टाइम्स एज्युफेस्ट

$
0
0
शेकडो कोर्सेस आणि करिअरच्या अनेक संधी यातून योग्य पर्याय निवडण्याच्या उद्देशाने दरवर्षी आयोजित केले जाणारे ‘टाइम्स एज्युफेस्ट २०१४’ शैक्षणिक प्रदर्शन ३१ मेपासून सुरू होणार आहे. २ जूनअखेर प्रदर्शन सुरू राहील. प्रदर्शनात विविध अभ्यासक्रमांची ओळख आणि करिअरच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

प्रा. सगरेंचा ३० ला अर्ज

$
0
0
गतवेळच्या निवडणुकीत निसटत्या मतांनी पराभव होऊनही मतदारसंघातील शिक्षकांच्या प्रश्नांबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे. शिक्षकांशी सततच्या संपर्कामुळे एक अतूट नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे पुन्हा पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीला सामोरे जाणार असून, ३० मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक प्रा. दशरथ सगरे यांनी दिली.

LBTविरोधी मोर्चा

$
0
0
लोकल बॉडी टॅक्सच्या (एलबीटी) विरोधात कोल्हापूर महापालिकेवर मंगळवारी (ता. २७) सकाळी ११ वाजता धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेना आणि कोल्हापूर व्यापारी आणि उद्योजक महासंघाने या मोर्चाचे नियोजन केले आहे.

आरोग्यसेवा कोलमडणार

$
0
0
राज्यभरातील विविध जिल्हा, ग्रामीण व प्राथमिक रुग्णालयातील आरोग्यसेवा सोमवारपासून (ता. २ जून) कोलमडण्याची शक्यता आहे. राज्यातील १२ हजारांहून अधिक डॉक्टर प्रलंबित मागण्यांप्रश्नी बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत.

KMTचा संप टळला

$
0
0
केएमटी कर्मचाऱ्यांचा दोन महिन्याचे थकीत पगार १० जूनपर्यंत देण्याचा व त्यासाठी महापालिकेने केएमटीला ५० लाख रुपये अर्थसाह्य देण्याचा निर्णय सोमवारी महापौर, पदाधिकारी, आयुक्त यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

मुंबईच्या मटका बुकींना अटक

$
0
0
करवीर पोलिसांनी मुंबईतील मटका बुकीमालक धर्मेश भूपद गिरी ऊर्फ शेठ (वय ३६, रा. घाटकोपर) व महेश बाळकृष्ण शुकला (२५, रा. वसई ईस्ट, जि. ठाणे) या दोघांना अटक केली. कोल्हापुरातील मटक्याचे पैसे हवालामार्गे मुंबईला जात असल्याचे तपासात पुढे आल्यावर पोलिस प्रथमच मुख्य बुकीमालकांपर्यंत पोचले.

डिपॉझिट वाचलं हे नशीब!

$
0
0
‘मी हरणार हे मला आधीच कळलं होतं, कारण आपलीच माणसं विरोधात काम करत होती. पण माझं नशीब चांगलं की डिपॉझिट जप्त झालं नाही,’ अशी प्रांजळ कबुली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी दिली.

प. महाराष्ट्रात पाऊस

$
0
0
सांगली, सातारा, सोलापूरसह दुष्काळी पट्ट्यात मंगळवारी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. सांगलीसह मिरज, तासागाव, जत, कवठेमहांकाळ भागात तुफान पाऊस झाला.

जिद्दीने मिळाली उभारी

$
0
0
जांभळे काढण्यासाठी चढलेला सोळा वर्षाचा ओंकार झाडावरून खाली पडला. मणक्याना मोठी दुखापत झाल्याने छातीच्या खालच्या भागातील संवेदनाच नष्ट झाल्या. स्थानिक डॉक्टरांनी हा कधीच बरा होणार नाही असे सांगितले.

साताऱ्यात वादळी पाऊस

$
0
0
सातारा शहर व परिसराला मंगळवारी दुपारी चार वाजता अवकाळी पावसाने झोडपून काढले. वेगाने वाहणारा वारा आणि ढगांच्या गडगडाटाने आकाशात काळोख दाटून आल्याने अगदी चार वाजताच रात्र झाल्याचा भास होत होता.

वीज, फोन सेवा कराडमध्ये खंडित

$
0
0
कराड शहर आणि परिसरात मंगळवारी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान मुसळधार वादळी पाऊस पडला. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले, भाजी विक्रेते, पथारी व्यावसायिक यांची तारांबळ उडाली. काही ठिकाणी झाडे पडल्याने वीज आणि फोन सेवा खंडित झाली होती.

पाणीच...पाणी...

$
0
0
सांगली आणि परिसराला मंगळवारी जोरदार वादळी वाऱ्याने चांगलेच झोडपले. मोठे वृक्ष वाहनांवर कोसळले. तर अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक खोळंबली. तासगावचा पूर्व भाग, कवठेमहांकाळ तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. दुष्काळी पट्ट्यातील आटपाडीत सायंकाळी पावसाला सुरूवात झाली.

पेरणीचे ११ लाख हेक्टरवर नियोजन

$
0
0
कोल्हापूर विभागीय कृषी विभागात २०१४ च्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेवर खते, बियाणे व कीटकनाशके मिळावीत यासाठी नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी ११ लाख ४७ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन आहे.

इचलकरंजीचे अंदाजपत्रक अडचणीत

$
0
0
इचलकरंजी पालिकेच्या अंदाजपत्रकातील फुगवलेल्या ७९ कोटी रुपये उत्पन्नवाढीचे मार्ग नेमके कोणते, असा प्रश्न उपस्थित करीत जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी याचा खुलासा पालिकेकडे मागितला आहे.

मानेंवर भ्रष्टाचाराचे आरोप

$
0
0
जिल्हा परिषदेच्या विविध योजना राबविताना जिल्हा परिषद सदस्य, ग्रामसेवक आणि कंत्राटदारांकडून जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने हे पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप जि. प. सदस्य शशिकांत खोत यांनी केला.

६५ कोटींचे बिग बजेट

$
0
0
जिल्हा परिषदेच्या आतापर्यंतच्या अर्थसंकल्पापैकी सर्वात मोठा ६५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सादर केला. गतवर्षी जिल्हा परिषद सदस्यांना मिळणाऱ्या ५ लाखांच्या स्वनिधीत वाढ करून तो १० लाख करण्यात आला.

स्टेपी गरूडांना डायक्लो‌फेनॅकचा धोका

$
0
0
ज्या डायक्लो‌फेनॅकमुळे भारतातील ९७ टक्के गिधाडे नष्ट झाली आहेत, त्यामुळेच स्टेपी गरूड या जातीचे दोन पक्षी राजस्थान येथे मृत झाल्याचे आढळले आहेत. डायक्लोफेनॅकचा धोका फक्त गिधाडांनाच नसून राफ्टरवर्गीय सर्वच पक्ष्यांना असल्याचे या संशोधनाने अधोरेखित केल्यामुळे पर्यावरणक्षेत्रात ‌मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images