Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जयंत पाटील-आरआरना धक्का

$
0
0
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक, साताऱ्यात उदयनराजे भोसले आणि माढ्यात विजयसिंह मोहिते-पाटील विजयी झाले आहेत, तर हातकणंगल्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि सांगलीत भाजपचे संजय पाटील यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मोठ्या फरकाने विजय मिळविला.

च‌ित्रकार दळवी यांचे निधन

$
0
0
ज्येष्ठ चित्रकार आणि शिल्पकार जयसिंगराव दळवी (९३) यांचे शुक्रवारी रात्री एक वाजता निधन झाले. गेले वर्षभर ते आजारी होते. त्यांच्या निधनाने कलानगरीचे मोठे नुकसान झाले आहे.

महाडिकांची ‘गोकुळ’मध्ये परीक्षा

$
0
0
लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांना मताधिक्क्य देणाऱ्यास जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात (गोकुळ) ‘मलई’ देण्याची घोषणा आमदार महादेवराव महाडिक यांची सत्त्वपरीक्षा घेणारी ठरणार आहे. अनेक तालुक्यांत ‘गोकुळ’वर लक्ष ठेवून काहींनी महाडिकांना भरभरून मदत केली.

सहानुभूतीला लाभली लाटेची जोड

$
0
0
नेते सांगतील ते जनता सर्वच ऐकत नाही हे हातकणंगलेत राजू शेट्टी यांना मिळालेल्या प्रचंड मताधिक्याने दाखवून दिले. कारखानदारांना जमीनीवर आणणारा हा निकाल आहे. नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर स्वार होताना शेट्टींना साथ मिळाली ती सहानुभूतीची.

दहा वर्षांच्या तयारीनेच वादळात दिवा

$
0
0
महाराष्ट्रातील बडे नेते ‘मोदी’ लाटेत वाहून जात असताना कोल्हापुरात धनंजय महाडिक यांनी मात्र वादळात दिवा लावला. गेली दहा वर्षे केलेली तयारी, युवाशक्तीच्या माध्यमातून केलेले काम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटी​ल यांच्या आवाहनाला करवीरकरांनी दिलेली साथ, काँग्रेसच्या नेत्यांनी केलेली मदत, राधानगरीने दिलेला मदतीचा हात या साऱ्या बाबी महाडिक यांच्या विजयाला कारणीभूत ठरल्या.

विधानसभेची उत्कंठा

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण या दोन्ही विधानसभा मतदारसंघांमधील लढती अटीतटीच्या होतील, हे स्पष्ट झाले आहे. संभाव्य लढतींबाबत उत्सुकता कमालीची ताणली आहे. इच्छुकांनी विधानसभेची मोर्चेबांधणीही सुरू केली आहे.

द्वेषग्रस्त मेंदूने वैश्विक साहित्यनिर्मिती अशक्य

$
0
0
‘मराठी लेखक जात, धर्म, प्रांत, लिंग आणि भाषिक अस्मितेतून बाहेर पडले नाहीत. लेखक जोपर्यंत मेंदूने माणूस होत नाही, तोपर्यंत वैश्विक आणि उदात्त​ लिखाण अशक्य आहे’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी केले.

तयारी वसुलीची आणि विरोधाची

$
0
0
आयआरबीने टोल वसुलीसाठी पूर्णपणे तयारी केली असली तरी वसुली सुरु झाल्यास त्याविरोधात उभे राहण्याची तयारीही टोलविरोधी कृती समितीचीही आहे. ९ जून रोजीचा महामोर्चा यशस्वी करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी जनजागृतीच्या सभा घेण्यात येत आहेत.

मनोधैर्य योजनेतून साडेचार लाखांची मदत

$
0
0
महिलांवरील लैंगिक अत्याचार किंवा अॅसिड हल्ला झाल्यानंतर आरोपीला शिक्षेबाबत कार्यवाही होती. मात्र, ज्या महिलेवर, अल्पवयीन मुलीवर अन्याय होतो तिचे जगणे अवघड होऊन जाते. त्यांना दिलासा मिळावा यासाठी सरकारने सुरू केलेल्या ‘मनोधैर्य’ योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे.

दप्तर, डब्यासह बूटची सुविधा

$
0
0
महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेशाबरोबरच दप्तर, डबा व बूटही देण्याचा विचार प्राथमिक शिक्षण मंडळ करत आहे. त्यादृष्टीने जोरदार प्रयत्न चालविला गेला असून येत्या आठवडाभरात कोणत्या वस्तू द्यायचे हे निश्चित केले जाणार आहे.

विश्वविक्रमाचा प्याला भरला!

$
0
0
राम गणेश गडकरी यांच्या ‘एकच प्याला’ नाटकाद्वारे तळीरामाच्या संगतीने सुधाकरच्या संसाराची कशी वाताहात झाली हे दाखवून दिले आहे. दारुच्या व्यसनामुळे कौटुंबीक सौख्य गमावणाऱ्या हजारो सुधाकरांच्या पत्नी संसार आणि मुलांच्या जबाबदारीचा गाडा ओढत जगत आहे.

आराखडा अडचणींच्या कात्रीत

$
0
0
जिल्ह्याचा प्रादेशिक आराखडा तयार करण्याचे काम अनेक अडचणींचा सामना करत सुरू आहे. विविध अभ्यास गट आणि प्रत्यक्ष लोकसहभाग वाढवल्यामुळे या आराखड्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

अतिक्रमणांवर आज हातोडा

$
0
0
तावडे हॉटेल परिसरात महापालिकेच्या हद्दीत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिका आज (सोमवारी) कारवाई करणार आहे. पहिल्या टप्प्यात ट्रक टर्मिनस, कचरा डेपो व आयलंडच्या आरक्षित जागांवरील ३३ अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत.

५८ वर्षांनी मिळेल घर

$
0
0
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पतीला हुतात्मा होऊन ५८ वर्षे उलटून गेली. केवळ पेन्शनवर कसाबसा उदरनिर्वाह सुरू होता. हुतात्मा पत्नी म्हणून कधी सन्मान झाला नाही. एकुलता एक मुलगा जग सोडून गेला... अशा परिस्थितीत जीवन व्यतित करीत असलेल्या ८१ वर्षीय हुतात्मा पत्नीच्या डोळ्यात उशिरा का होईना आनंदाश्रू पाहायला मिळाले.

दोन भावंडे बुडाली

$
0
0
तलावात हातपाय धुण्यासाठी उतरलेल्या व पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने नगर येथील बुरूड गल्लीतील दोघा सख्या भावांचा रविवारी सायंकाळी सालपे (ता. फलटण) घाटानजीकच्या तलावात बुडून मृत्यू झाला.

'त्याचा' शोध सुरू!

$
0
0
आंजर्ले येथील समुद्रात बुडालेल्या शर्मा कुटुंबातील लहान मुलाचा दोन दिवसांनंतरही शोध लागलेला नाही. स्थानिक मच्छिमार आणि पोलिसांकडून गेली दोन दिवस शोध घेण्यात आला आहे. दरम्यान, समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या डांगी आणि ओझा कुटुंबातील पाच जणांवर सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

अपघातात दुचाकीवरील ३ ठार

$
0
0
संकेश्वरमधील लोहार कुटुंबीय दुचाकीवरून विवाहसोहळ्याला जात असताना मालवाहू ट्रकने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील तिघेजण ठार झाले. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.

सांगली बंदला संमिश्र यश

$
0
0
‘जकातीपेक्षाही जाचक असलेला स्थानिक संस्था कर (एलबीटी) सरकारने रद्द करावा. आम्ही सरकारला पाच जूनपर्यंतचा अल्टिमेटम देत आहोत. त्यानंतर मात्र तीव्र आंदोलनाबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडी सरकारच्या विरोधात प्रचार करू,’ असा इशारा ‘फॅम’चे अध्यक्ष मोहन गुरनानी यांनी सोमवारी सांगलीत दिला.

कोल्हापूर पोलिस सावंत चषकाचे मानकरी

$
0
0
राष्ट्रीय खेळाडू अनिल सावंत स्मृती चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोल्हपूर पोलिसांनी आपल्या बहरदार खेळाच्या जोरावर यजमान पद्मा पथकाचा ४-२ असा पराभव करत मानाचा अनिल सावंत स्मृती चषक पटकावला.

हातोडा पडला

$
0
0
अतिक्रमणांबाबत सावध भूमिका घेणाऱ्या नगरसेवकांनीच पुढाकार घेतल्याने अतिक्रमणांविरोधातील महापालिकेची ताकद दुप्पट झाल्याचे सोमवारच्या मोहिमेवेळी दिसून आले. कोर्टाची स्थगिती नसल्यास कुणाचाही मुलाहिजा ठेवायचा नाही, असेच धोरण महापालिकेने राबवल्याने गांधीनगर परिसराची महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या आहुजा इलेक्ट्रॉनिक्स या चार मजली इमारतीची रयाच उतरवली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images