Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

इचलकरंजीसाठी पंचगंगेतून पाणी

$
0
0
पंचगंगा नदीतील पाणी पिण्यायोग्य असल्याचा अहवाल पुणे येथील प्रयोगशाळेतून प्राप्त झाल्याने येत्या दोन दिवसात पंचगंगेचा पाणी उपसा सुरू करण्यात येणार आहे. परिणामी, शहरात चार दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता एक दिवस आड होणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा बिस्मिल्ला मुजावर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सांस्कृतिक प्रदूषण दूर करण्याची गरज

$
0
0
‘जगणे ही एक श्रेष्ठ कला आहे. जगताना आनंदाने जगणे आणि दुसऱ्याचे कौतुक करीत जगणे हे महत्त्वाचे आहे. आज सांस्कृतिक प्रदूषण होत आहे. ते दूर करायचे असेल तर मनाची खिडकी उघडावी लागेल,’ असे मत प्रसिद्ध कवी आणि लेखक प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले.

विंधन विहिरींना गरजेनुरूप मंजुरी देऊ

$
0
0
जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी खरोखरच पाणी टंचाईची स्थिती आहे, पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही अशा ठिकाणी विंधन विहिर खुदाईला कोणतीच हरकत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी मागितलेल्या १७ विंधन विहिरींऐवजी २० विंधन विहिरींना मंजुरी देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी दिले.

वारणा नदीपात्रात राजरोस वाळूउपसा

$
0
0
सातवे (ता. पन्हाळा) हद्दीत वारणा नदीपात्रात गेला महिनाभर राजरासपणे वाळू उपसा सुरू असून, हा उपसा अधिकृत की अनधिकृत, याचे उत्तर अधिकाऱ्यांकडेही नाही. पन्हाळा तालुक्याचे तहसीलदार प्रशांत पिसाळ यांनीही त्या विभागातील मंडल अधिकाऱ्यांकडे अहवाल मागविला आहे.

आजराच्या अध्यक्षपदाची उत्सुकता

$
0
0
आजरा तालुका साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या चौथ्या वर्षातील माळ आता कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी आघाडीच्या सुकाणू समितीच्या धोरणानुसार तालुक्यातील प्रत्येक विभागास एकेक वर्ष अध्यक्षपद देण्याचे ठरले आहे.

अतिक्रमणांविरोधात बडगा

$
0
0
शहरांतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी तत्काळ साइड पट्टे मारण्याबरोबर सिग्नल व्यवस्था सुरू करणे, रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्याबरोबरच शहराबाहेरील रिंग रोडवरून वाहतूक सुरू करणे, रस्ता रुंदीकरण करणे याबाबतही निर्णय घेण्यात आला.

यशवंतगडाची जमीन भाडेकरारानेच

$
0
0
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाटे ग्रामपंचायत हद्दीतील शिवकालीन यशवंतगडाची विक्री झालेली नाही, तर ९९ वर्षांच्या कराराने आपण घेतला असल्याचा खुलासा यशवंतगडावरील जमीन व कलमांचे भाडेकरारकर्ते अरविंद पारकर यांनी केला आहे.

प्रशासन ‘व्यग्र’; रंकाळा बेदखलच

$
0
0
रंकाळा तलावाला पडलेल्या भगदाडाची पाहणी करण्यासही महापालिका प्रशासनाला मंगळवारी दिवसभर सवड मिळाली नाही. दत्तोबा तांबट कमान परिसरात ड्रेनेज लाइनची पाहणी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी केली.

नीरव शांतता अन् वन्यजीवांचे चित्कार

$
0
0
घनदाट जंगलातील भयाण, नीरव शांतता...वाऱ्याच्या झुळूकेने होणारी झाडांची,पानाची सळसळ.....दूरवरून ऐकू येणारे वन्य पशु पक्षाचे चित्र-विचित्र आवाज...चांदण्या रात्री अविश्वसनीय अनुभवातून झालेले गवा,अस्वल.सांबर अशासह अन्य वन्यप्राण्यांचे दर्शन....असा अनुभव दाजीपूर अभयारण्यात येत आहेत.

शाहू टॉकीजचे आज ६८ व्या वर्षात पदार्पण

$
0
0
मराठी चित्रपटांचे खऱ्या अर्थाने माहेरघर असलेल्या शाहू टॉकीजला गुरूवारी (१५ मे) ६७ वर्षे पूर्ण होत आहेत. हजारो मराठी सिनेमांनी या चित्रपटगृहात यशाची गोल्डन ज्युबिली साजरी केली आहे.

१७४ गावांचे फेरसर्वेक्षण

$
0
0
पंचगंगा नदी प्रदूषण संदर्भात ‘नीरी’ने दिलेला अहवाल परिपूर्ण नसल्याने उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने येत्या चार आठवड्यात प्रदूषणाचा फेरसर्व्हे करुन अहवाल देण्याचा आदेश ‘नीरी’ला दिला असल्याची माहिती अॅड. धैर्यशील सुतार यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

टोलविरोधात २० ठिकाणी जनजागृती सभा घेणार

$
0
0
टोलला कायमचा टोला देण्यासाठी शहर आणि परिसरात कॉर्नर आणि जाहीर सभा घेण्याचे नियोजन टोलविरोधी कृती समितीच्या बैठकीत जाहीर करण्यात आले.

प्रबोधन चळवळीपुढे आव्हान आधुनिक अंधश्रद्धांचे

$
0
0
सनातनी धर्मातील अंधश्रध्देवर प्रहार करण्याऐवजी आता नवविज्ञान तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या अंधश्रध्दांचे आव्हान प्रबोधन चळवळीपुढे आहे. या अंधश्रध्दांचा परामर्श प्रबोधनवादी चळवळीने घेण्याची गरज आहे.

मराठा आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करा

$
0
0
मराठा समाजाला तातडीने आरक्षण जाहीर करावे. मूठभर रक्षा विसर्जन, टोलमुक्तीच्या लढ्यात सहभागासह एकूण पाच ठराव अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हा शाखेच्या मराठा मेळाव्यात करण्यात आले.

त्रिसरण, पंचशील पठणाने शहरात बुद्ध जयंती

$
0
0
विविध संस्था संघटनांच्यावतीने भगवान गौतम बुद्ध यांची २५५७ वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. शहर तसेच पांडवदरा मसाई पठार, पन्हाळा व कुशिरे पोहाळे येथे येथे त्रिसरण, पंचशील पठण झाले. समस्यांबाबत अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

टॅट्यूमुळे सातजण भरतीप्रक्रियेतून बाहेर

$
0
0
आर्मी रिक्रुटमेंट ऑफीसतर्फे शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर सुरू असलेल्या सैन्य भरती प्रक्रियेत ७००० उमेदवारांची चाचणी घेण्यात आली. पात्र उमेदवारांची गुरूवारी वैद्यकीय चाचणी होणार आहे.

वाळू उपसा बेकायदाच

$
0
0
वारणा नदीत सातवे (ता.पन्हाळा) हद्दीत गेले महिनाभर सुरू असलेला वाळू उपसा बेकायदाच सुरू असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच ठेकेदाराने नदीकाठावरचे सर्व साहित्य गायब केले आहे.

फुटबॉल सरावासाठी पर्याय हवा

$
0
0
सद्यःस्थितीत पाहता छत्रपती शिवाजी स्टेडियमवर लॉनची स्थिती दयनिय आहे. याला कारणीभूत गोष्ट आहे, ती पाण्याचे दुर्भिक्ष. लॉनचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी स्टेडियमवर शाश्वत पाण्याचा स्रोत निर्माण करण्याची गरज आहे.

राज्य सरकारचे 'मिशन आंबा'

टोलप्रश्नी फाटाफूट टाळा!

$
0
0
आणीबाणीची वेळ आहे. टोलविरोधी समितीत एकजूट ठेवा. अनेक डावपेच आखावे लागणार आहेत. समितीत फाटाफूट होऊ देऊ नका. टोल विरोधी कृती समिती आणि महायुतीची एकीची ताकद दाखवा, असा सल्ला ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी दिला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images