Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

थकीत वेतनासाठी ‘भीक मांगो’

$
0
0
कोणत्याही लेखी आदेशाशिवाय अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्यापासून वेतन थांबविल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाने सोमवारी भीक मांगो आंदोलन केले.

खराब खेळपट्टीमुळे क्रिकेटला खीळ

$
0
0
खराब झालेली खेळपट्टी, आउटफिल्ड आणि पॅव्हेलियन, ड्रेसिंग रूमची दुरवस्था यामुळे शिवाजी स्टेडियमवर प्रथम श्रेणीचे सामने मिळणे मुश्कील झाले आहे. यामुळे कोल्हापूरच्या क्रिकेट विकासाला खीळ बसली आहे.

रंकाळ्याची भिंत पुन्हा ढासळली

$
0
0
रंकाळा तलावाच्या संरक्षक भिंतीला रविवारी पहाटे भगदाड पडले. सुमारे दहा फूट अंतराचे हे भगदाड आहे. दिवसभरात महापालिकेचा एकही पदाधिकारी अथवा अधिकारी फिरकला नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

प्रशासनाची मतमोजणीसाठी जय्यत तयारी

$
0
0
कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी शुक्रवारी (ता. १६ मे) गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या इमारतीत होत असल्याने मतमोजणी केंद्राजवळील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत.

टोलरूपी राक्षसाचे शिवसेनेकडून दहन

$
0
0
‘कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. या सत्तेचा दोन्ही पक्ष गैरप्रकारांसाठी वापर करीत आहेत. टोलविरोधात उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांना खोटा दिलासा देण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी टोल पंचगंगा नदीत बुडवल्याची वल्गना केली होती.

तपासणीला सहकार्य करा

$
0
0
‘उच्च शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. होणारा खर्च आणि कॉलेज स्तरावरील सुविधांची तपासणी हा त्याचा एक भाग आहे. १९ मेपासून सुरू होणाऱ्या तपासणी मोहिमेला कॉलेजांच्या प्रशासनाने सहकार्य करावे.

शंकराचार्य पीठातर्फे पुरस्कार वितरण

$
0
0
‘काळाच्या ओघात हिंदू संस्कृतीचे विस्मरण होत आहे. धर्माचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे’ असे प्रतिपादन लोणी बुद्रुक (वाशिम) येथील सखाराम महाराज संस्थानचे सदगुरू नाना महाराज जोशी यांनी केले.

सैन्यभरतीसाठी साडेचार हजार उमेदवार

$
0
0
शिवाजी विद्यापीठाच्या अॅथलेटिक्स ग्राउंडवर मंगळवारी झालेल्या सैन्यभरतीच्या पहिल्याच दिवशी साडेचार हजार इच्छुकांनी चाचणी दिली. पहाटे पाच वाजल्यापासून भरतीसाठी आलेल्या तरुणांनी दुपारच्या रखरखत्या उन्हातही जोश कायम ठेवत विविध चाचण्यांमध्ये सहभाग घेतला.

परीक्षा नियंत्रक पदासाठी १७ उमेदवार

$
0
0
शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदासाठी तीन जून रोजी मुलाखती होणार आहेत. प्राध्यापक, प्राचार्य, कम्प्युटर संचालक, तंत्र शिक्षण विभागातील सहायक संचालकसह सतरा उमेदवारांनी या पदासाठी अर्ज केले आहेत.

सुरक्षा विभागाच्या मर्यादा उघड

$
0
0
शिवाजी विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाच्या मर्यादा पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत. कॅम्पसमध्ये ​किरकोळ चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहेत. तंत्रज्ञान विभागातून कम्प्युटरची चोरी, सिंथेटिक ट्रॅकचा अनधिकृपणे वापर केल्याची घटना ताजी असतानाच क्रीडा विभागाच्या परिसरातील केबल चोरीचा प्रकार सोमवारी उघडकीस आला.

जेव्हा स्वतः आबाच टोल धाब्यावर बसवतात

$
0
0
टोलविरोधात आंदोलने करताच कायदा हातात घेणाऱ्यांची गय करणार नाही, अशी विधाने करणारे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सोमवारी (१२ मे) स्वतःची वाहतूक कोंडीत अडकलेली गाडी सोडवण्यासाठी तासवडे टोलनाक्यावरून वाहने विनाटोल सोडली.

शर्यतींसाठी राष्ट्रपतींकडे दाद करणार

$
0
0
दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरुद्ध बैलगाडी चालक मालक संघटना राष्ट्रपतींकडे याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती संघटनेचे पदाधिकारी प्रदीप पाटील यांनी मंगळवारी दिली.

हॅपी बर्थ डे महालक्ष्मी एक्स्प्रेस!

$
0
0
पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसचा त्रेचाळीसावा वाढदिवस मिरज रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने मिरज रेल्वे स्टेशनवर उत्साहात साजरा करण्यात आला.

नव्या जलवाहिन्यांचे काम युद्धपातळीवर

$
0
0
शहरात सध्या नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या वाहतुकीचा बोजवारा टाळण्यासाठी हे काम रात्री सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर सातारकरांना २४ तास पाणी मिळणे शक्य होणार आहे.

लग्नाच्या दिवशीच युवतीची आत्महत्या

$
0
0
लग्नाचा मुहूर्त अवघ्या पाच तासांवर आला असतानाच युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बागलवाडी-काढणे (ता. पाटण) येथे घडली. सीमा वसंत बागल (वय २०) असे या युवतीचे नाव असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही.

कृष्णेतील मासे सांडपाण्यामुळेच मृत्युमुखी

$
0
0
कृष्णा नदीतील मासे मृत्युमुखी पडण्याच्या प्रकारास सांगली शहरातून नदीत मिसळणारे सांडपाणी कारणीभूत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या येथील कार्यालयाने काढला आहे. कृष्णा व वारणा या दोन्ही नद्यांतील पाण्याची पाहणी करून त्यांनी ही शक्यता व्यक्त केली आहे.

लाच घेताना मुकादम अटकेत

$
0
0
विनापरवाना बांधकामाबाबत पाठवलेली नोटीस रद्द करण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना महापालिकेच्या राजारामपुरी विभागीय कार्यालयातील मुकादम सुनील पाटोळे याला शास्त्रीनगरातील घरात सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

‘सर्व रिक्षांना जिल्हा परमीट द्या’

$
0
0
ऑटो रिक्षांच्या शिल्लक परम‌िटचे वाटप करावे. सर्व नवीन रिक्षांना जिल्हा परम‌िट द्यावे यांसह अशी मागणी ताराराणी रिक्षा व्यावसायिक संघटनेच्या शिष्टमंडळाने आरटीओ लक्ष्मण दराडे यांच्याकडे निवेदानातून केली.

मंजूर कामांना दोन दिवसांत वर्कऑर्डर

$
0
0
निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या सर्व कामांना दोन दिवसांत वर्कऑर्डर देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमण तातडीने हटवण्याची मोहीम सुरू करण्याची ग्वाही महापालिका प्रशासनाने दिली.

भात, सोयाबीन वाढीचे उद्दिष्ट

$
0
0
खरीप हंगामासाठी जिल्हा कृषी विभाग सज्ज झाला आहे. भात बियाणे महाबीजमार्फत व इतर खासगी कंपन्यांमार्फत वितरकाकडे पोहोच करण्यात आली आहेत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images