Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

रंकाळ्यात मासे मृत्युमुखी

$
0
0
कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणारा रंकाळा तलाव पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. हिरव्यागार तवंगाचे प्रमाण वाढण्याबरोबरच जैवविविधता धोक्यात आली आहे. रंकाळ्याच्या काठावर रविवारी अनेक मासे मृतावस्थेत दिसून आले.

शिवाजी स्टेडियमवर ‘ओपन बार’

$
0
0
गंजलेली प्रवेशद्वारे, बैठक व्यवस्थेला गेलेले तडे, ठिकठिकाणी पडलेला कचऱ्यांचा ढीग, मद्यपींनी फोडलेल्या बाटल्यांमुळे शिवाजी स्टेडियमला ओंगळवाणे स्वरूप आले आहे. कधीकाळी हिरव्यागार लॉनने सुसज्ज असलेल्या या स्टेडियमवर लॉन शोधूनही सापडणार नाही, अशी अवस्था आहे.

ध्येयासाठी आरतीची धाव

$
0
0
घरचे कमालीचे दारिद्र्य... मात्र, सतत पुढे जाण्याची आस. यामुळे येईल त्या संकटांवर मात करणे हेच एक ध्येय. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अनेकांनी दिलेला मदतीचा हात यामुळे आपल्या आर्थिक परिस्थितीवर मात करत आज ती रनिंग करीत आहे.

खोडशी बंधारा ३५ वर्षे रखडला

$
0
0
गेल्या ३५ वर्षांपासून धक्के खात सुरू असलेल्या येथील कृष्णा नदीवरील खोडशी बंधाऱ्याचे काम प्रशासकीय मंजुरीअभावी गेल्या दोन वर्षांपासून पूर्णपणे बंद पडले असून, सव्वादोन कोटी रुपयांचा बंधाऱ्याचा खर्च आता २५ कोटी रुपयांवर पोहचला तरी बंधाऱ्याचे काम जेमतेम ६० टक्केच झाले आहे.

मतमोजणीसाठी सांगली प्रशासन सज्ज

$
0
0
सांगली लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी १६ मे रोजी मिरजेतील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये होत असून, मतमोजणी प्रक्रियेची तयारी झाली आहे. सहा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी एकाचवेळी सुरू होईल.

अंनिसच्या आव्हानाला एकही प्रवेशिका नाही

$
0
0
फलज्योतिष हे शास्त्र नसून थोतांड आहे. फलज्योतिषाचा व्यवसाय करणाऱ्यांना ग्राहक कायदा लागू करा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुन्हा एकदा करीत आहे. वर्तविलेले भविष्य खरे ठरले नाही, तर नुकसान भरपाई मिळण्याची संधी ग्राहकाला उपलब्ध राहील.

‘कोयने’तील पावसाची दर १५ मिनिटांनी मोजणी

$
0
0
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या संततधार पावसाचे मोजमाप करण्यासाठी कोयना प्रकल्पाने नव्याने आधुनिक स्वयंचलित यंत्रणा उभारली असून, येत्या पावसाळ्यापासून ती नव्या रुपात कार्यरत होणार आहे.

उलगडला जब्बार पटेलांचा प्रवास

$
0
0
पंढरपुरातून सुरू झालेला प्रवास...सोलापुरातील वैद्यकीय शिक्षण पुढे पुण्यात सांस्कृतिक घडामोडींशी जुळलेली नाळ. घाशीराम कोतवालपासून, सामना, उंबरठा, जैत रे जैत, डॉ. बाबासाहेब आंबेकर ते अगदी अलीकडच्या यशवंतराव चव्हाणपर्यंतचाडॉ. जब्बार पटेल यांचा प्रवास सातारकरांसमोर खुद्द डॉक्टरांनीच उलगडला.

शिक्षकांच्या बदल्या १७ मेपासून होणार

$
0
0
जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया १७ मे पासून सुरू होणार आहे. १७ ते २३ मे या कालावधीत समायोजन तर २६ ते ३१ मे या कालावधीत प्रत्यक्ष बदल्यांची प्रक्रिया राबविली जाईल. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन बदल्याही होण्याची शक्यता आहे.

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून

$
0
0
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची घटना रविवारी मध्यरात्री येथे घडली. विजया संतोष सावंत (वय ३२, रा. नाना पाटीलनगर, कोल्हापूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. संशयित संतोष रामचंद्र सावंत (३५) हा पोलिसांत स्वत:हून हजर झाला असून त्याने खुनाची कबुली दिली आहे.

जवाहर कारखान्यात १४ लाख टनांवर गाळप

$
0
0
येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०१३- १४ च्या ऊस गाळप हंगामाची सांगता नुकतीच झाली. यंदाच्या हंगामात १४ लाख २८ हजार ८८ मेट्रिक टन इतके ऊस गाळप होऊन सरासरी साखर उतारा १२.५७० टक्के मिळाल्याने १७ लाख ९७ हजार ३४५ पोत्यांचे साखर उत्पादन झाले.

धरमलेवाडीत आक्रोश, वेदना आणि सन्नाटा

$
0
0
सोळांकूर-ऐनी रस्त्यावर काल (ता.१०) रात्री वडाप जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी असलेल्या अन्य एकाचा आज सकाळी मृत्यू झाल्याने अपघातातील मृतांची संख्या पाच झाली आहे.

अधिकारी गैरहजर राहिल्याने स्थायी समितीची सभा तहकूब

$
0
0
आयुक्त, सहायक आयुक्तांसह ९० टक्के प्रमुख अधिकारी गैरहजर राहिल्याने स्थायी समितीची सोमवारी होणारी बैठक रद्द करण्यात आली.

स्टेडियमची साफसफाई सुरू

$
0
0
शिवाजी स्टेडियमवर ‘ओपन बार’ हे वृत्त सोमवारी (ता. १२ मे) ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रसिद्ध होताच जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.

शुक्रवारी काय होणार?

$
0
0
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी (ता. १६ मे) होणार आहे. या निमित्ताने शहरासह जिल्ह्यात चर्चांचे फड दिवसरात्र रंगू लागले आहेत. आमचा उमेदवार निवडून येणार असे ठामपणे अंदाज व्यक्त करत ईर्ष्येनने पैजा लावण्यात आल्या आहेत.

पुरोगामित्व विचारांत हवे

$
0
0
‘काही राजकारणी दलित अस्मितेचे भांडवल करीत आहेत. अशा तथाकथित नेत्यांना वेळीच ओळखायला शिका. पुरोगामित्व फक्त भाषणात नको, आचरणात हवे’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अच्युत माने यांनी केले.

दुधाळी नाल्यातील सांडपाण्यावर जैविक पद्धतीने प्रक्रिया होणार

$
0
0
दुधाळी नाल्यातील सांडपाण्यावर जैविक पद्धतीने प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न महापालिकेने सुरु केले आहेत. म्हैसूरच्या पृथ्वी इको सायन्स कंपनीतर्फे प्रायोगिक तत्त्वावर विनामूल्य काम सुरु केले आहे.

कृतज्ञता निधीतून सामाजिक बांधिलकी

$
0
0
समाजाने आपल्याला मदत केली, म्हणून आपण स्वतःच्या पायावर उभे राहिल्यानंतर आपणही समाजाचे देणे लागते हे भान ठेवत कदमवाडीतील ‘माझी शाळा’मधील शिक्षकांनी साने गुरुजी कृतज्ञता निधी जमवला आहे.

‘आय कॅन’ ही मानसिकता ठेवा

$
0
0
‘आयक्यू’पेक्षाही ‘आय कॅन’ ही मानसिकता जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे’, असे प्रतिपादन निवृत्त मेजर रचना पाचुंदे -गोडबोले यांनी सोमवारी येथे केले. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्यावतीने आयोजित व्यक्तिमत्त्व विकास आणि सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या विषयावरील कार्यशाळेत त्या बोलत होत्या.

RPIचा परीघ विस्तारायला हवा

$
0
0
‘नुसत्या दलितांच्या बळावर राजकीय यश मिळू शकत नाही हे वास्तव आपण मान्य केले पाहिजे. यासाठी दलित व सवर्णांना आरपीआयच्या एकाच झेंड्याखाली आणावे लागेल. त्यासाठी सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन पक्ष व्यापक बनविण्याची गरज आहे’ असा सूर सोमवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) चिंतन शिबिरात व्यक्त झाला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images