Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

गडहिंग्लजमध्ये गुन्हेगारांची झाडाझडती

$
0
0
गेल्या काही दिवसात शहरातील अवैध धंदे आणि त्यात अडकलेली तरुणाई हा गडहिंग्लजकरांच्या काळजीचा विषय बनून राहिला होता. मात्र पोलिस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुन्हेगारांच्या झाडझडतीचा सपाटा सुरू केला आहे.

विशाळगडावर पाण्यासाठी धावाधाव

$
0
0
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने पावन झालेल्या किल्ले विशाळगडावरील इतिहासाच्या खुणा काळाच्या ओघात नष्ट होवू लागल्या आहेत. गडाचे बुरुज, तटबंदी, ऐतिहासिक वास्तू अंतिम घटका मोजताहेत. सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या या गडावर दररोज भाविक,पर्यटक आणि इतिहासप्रेमींची कायम गर्दी असते.

अवैध धंद्यांविरोधात महिलांचा एल्गार

$
0
0
ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता ऊर फुटेस्तोवर वर्षानुवर्षे विशाळगडावर राबणाऱ्या रणरागिणींनी गडावरील अवैध धंद्यांविरुद्ध एल्गार पुकारला आहे. या लढ्यात विशाळगडासह गजापूर, केम्बुर्णेवाडी व कांबळेवाडीतील शंभरहून अधिक महिला सहभागी झाल्या आहेत.

गडहिंग्लज शहराची हद्दवाढ करा

$
0
0
गडहिंग्लज शहराची प्रलंबित हद्दवाढ तत्काळ व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती गडहिंग्लज शहर हद्दवाढ कृती समितीच्या वतीने कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मंत्री मुश्रीफ गडहिंग्लज दौऱ्यावर आले होते, त्यावेळी कृती समितीच्या शिष्टमंडळाने त्यांच्याकडे मागणीचे निवेदन दिले.

दलित अत्याचारप्रकरणी कडक कारवाई करा

$
0
0
पुरोगामी महाराष्ट्रात दलितांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वारंवार वाढ होत आहे. यामुळे राज्यातील दलित, अल्पसंख्यांक समाज असुरक्षित झाला आहे. खर्डा (जि. अहमदनगर) , देवपुळ (जि. औरंगाबाद), नामेगाव (जि. बुलढाणा) व कोल्हापूर जिल्ह्यातील पुंगाव आणि दानोळी येथील दलितविरोधी घटना या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आहेत.

कायदा केला, फायदाच नाही!

$
0
0
आठ वर्षांपूर्वी घरेलू मोलकरीण कायदा करण्यात आला, मात्र अद्याप तो कागदावरच राहिला आहे. कायदा केला मात्र त्याचा फायदाच झाला नसल्याची टीका शुक्रवारी घरेलू मोलकरणी संघटनेच्या शिष्टमंडळाने केली. जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांनी भेट देऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

भाजीपाला, रानमेव्याची भुरळ

$
0
0
शाहूवाडी तालुक्याचा पश्चिमेकडील भाग पर्यटकांना पर्यटनासाठी नेहमीच खुणावत असतो. प्रति महाबळेश्वर म्हणून उदयास येत असलेल्या आंबा गिरीस्थान, वेडावाकडा घाट, वाघझरा, पावनखिंड, किल्ले विशाळगड पर्यटकांना बाराही महिने भुरळ घालत असतो.

मायक्रोफौनाच्या संशोधनानंतर गरज संवर्धनाची

$
0
0
पश्चिम घाटात ‘इंडियन डान्सिंग फ्रॉग’च्या १४ जातींचा एकाच वेळी शोध लावण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. सर्वसाधारणपणे जैवविविधता संवर्धनामध्ये बेडूक, सरडे, साप, देवगांडूळ, पाल असे लहान जीव नेहमीच दुलर्क्षित रहातात.

जुळ्या-तिळ्यांचा मेळावा ‘लिम्का’मध्ये

$
0
0
पत्की हॉस्पिटल व रिसर्च फाउंडेशनने गेल्यावर्षी घेतलेल्या जुळ्या-तिळ्यांच्या स्नेहमेळाव्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. एप्रिलमध्ये प्रसिध्द झालेल्या लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसच्या २५ व्या विशेष आवृत्तीमध्ये त्याची सचित्र नोंद घेण्यात आली आहे.

व्यक्तिमत्त्व विकासावर व्याख्यान

$
0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीने व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डच्या विविध परीक्षांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन केले आहे. यामध्ये निवृत्त मेजर रचना पाचुंदे-गोडबोले मार्गदर्शन करणार आहेत. १२ मे रोजी सायंकाळी पाच वाजता दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे व्याख्यान होणार आहे.

मसाई पठारावरुन पडून डॉक्टर विद्यार्थ्याचा मृत्यू

$
0
0
मित्रांसोबत मसाई पठारावर सूर्योदय पाहण्यासाठी गेलेल्या डॉक्टर विद्यार्थ्याचा रविवारी पहाटे दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. सोहम सुधाकर लावंड (वय २६, रा. सातारा) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. सातारा येथील संजीवन हॉस्पिटलचे डॉ. सुधाकर लावंड यांचा तो मुलगा होता. या अपघाताची नोंद पन्हाळा पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

तिक‌िटाचे ब्लॅक अद्याप सुपरफास्ट

$
0
0
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कितीही प्रयत्न केले तरी रेल्वे तिकिटांचे ब्लॅक सुरुच आहे. रेल्वेच्या गुन्हा अन्वेषण पथकाने केलेल्या कारवाईमुळे पुन्हा काळाबाजार उघडकीस आला.

बेशिस्तीचा सिग्नलला अडथळा

$
0
0
गेली सहा वर्षे तारेवरची कसरत करत वाहतुकीचे नियोजन करणाऱ्या पोलिसांनी गेल्या महिनाभरात सुरु झालेल्या सिग्नलमुळे मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, कोल्हापूर-रत्नागिरी राज्य मार्गावरील प्रवासी वाहनांना सात सिग्नलला अडथळ्यातून वाट काढावी लागते.

एलबीटी विरोधात पुन्हा आंदोलन

$
0
0
एलबीटी विरोधात राज्यव्यापी आंदोलन पुन्हा एकदा जोमाने सुरू झाले आहे. कोल्हापूर येथे झालेल्या सभेत राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी पुणे येथे १४ मे रोजी पुना मर्चंट येथे सभा होणार असून यासाठी व्यापारी मित्र संघटनेने जोरदार तयारी केली आहे.

चार्जशीटसाठी पोलिस ठाण्यात विशेष कक्ष

$
0
0
प्रत्येक पोलिस ठाण्यात आता गुन्ह्याचा चार्जशीट तयार करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. गुन्हेगार निर्दोष सुटण्याऐवजी त्यांना अधिकाधिक शिक्षा व्हावी यासाठी हा कक्ष कार्यरत राहिल.

कॉलेजांतील सुविधांची तपासणी होणार

$
0
0
सरकारकडून अनुदान घ्यायचे आणि विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करुन द्यायच्या नाहीत असा प्रकार निदर्शनास आल्याने उच्च शिक्षण विभागाने राज्यातील कॉलेजांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण सहसंचालक कार्यालयामार्फत कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील कॉलेजांची १९ ते २९ मे या कालावधीत तपासणी होईल.

दहा अभ्यासक्रमांसाठी १९०८ विद्यार्थी

$
0
0
शिवाजी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांसाठी पहिल्या टप्प्यातील प्रवेश परीक्षा रविवारी झाली. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील विविध परीक्षा केंद्रांवर १९०८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

भाजीपाला कडाडला

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढल्याने शेतीला पाण्याची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे वांगी, भेंडी, दोडका, टोमॅटोच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. तर चाकवत, पोकळा, मेथी या भाज्यांची आवक मंदावली आहे. कांदा, बटाट्याचे दर स्थिर असून हापूस आंब्याचा दरही कमी होत आहे.

बॉक्साइट कंपन्यांवर कारवाईची मागणी

$
0
0
जिल्ह्यातील बेकायदेशीर बॉक्साइट उत्खनन करणाऱ्या कंपन्यावर, या कंपन्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास १४ मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार सुजित मिणचेकर यांनी पत्रकातातून दिला आहे.

तत्काळ सेवेसाठी सीपीआर तत्पर

$
0
0
एकाच छताखाली सुविधा हे सीपीआरचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे पेशंटसाठी सीपीआर हा सर्वात चांगला पर्याय ठरतो. सीपीआरमध्ये कार्यरत असलेले एकवीस विभागांसह अत्याधुनिक ब्लड बँक, हायटेक अॅम्ब्युलन्स आणि मोफत औषधे या बाबी खासगी दवाखान्यांच्या तुलनेत बलस्थान मानावी लागतील.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images