Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सहकार कायद्यासाठी घटनादुरुस्ती

$
0
0
केंद्र सरकारची ९७वी घटना दुरुस्ती, त्यावर गुजरात उच्च न्यायालयाची रद्दबातलची कारवाई आणि मध्यंतरीच महाराष्ट्र राज्याने 'सुधारित विधेयक' तयार करून राज्यपालांकडून मंजुरी घेऊनही हे विधेयक विना अंमल पडून आहे. त्यानुसार संस्थांनी तत्परतेने मान्य केलेले पोटनियमही सहकार खात्याकडे प्रलंबित आहेत. विधेयकावर न्यायालयात घेण्यात आलेल्या आक्षेपांचा विचार व न्यायालात होणारे निर्णय अनिर्णित राहिले आहेत.

विजयी उमेदवारांनापराभूतांकडून आव्हान

$
0
0
नुकत्याच पार पडलेल्या सांगली - मिरज - कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेले माजी महापौर मैनुद्दीन बागवान, सुरेश आवटी, विवेक कांबळे, शिवाजी दुर्वे, संगीता खोत यांच्यासह १७ उमेदवारांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या वेगवेगळ्या १७ याचिका पराभूत उमेदवारांनी गुरुवारी जिल्हा कोर्टात दाखल केल्या. संबंधित याचिकाकर्त्यांनी आपण जिल्हा कोर्टात याचिका दाखल केल्या असल्याचे सांगितले.

कोयनेचे दरवाजे दोन फुटांवरच

$
0
0
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर गुरुवारीही कायम होता. त्यामुळे बुधवारी दोन फुटांवर उचलण्यात आलेले कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे शुक्रवारीही जैसे थे अवस्थेत होते. मात्र, धरणाच्या शिवसागर जलाशयातून नदीपात्रात वक्र दरवाजांतून ९ हजार ५०८ व पायथा वीजगृहातून दोन हजार १११ असे मिळून ११ हजार ६१९ क्युसेक प्रतिसेकंद पाणी सोडण्यात येत आहे.

कळंबा, बालिंगा फिल्टर हाऊस बंद

$
0
0
नदीपासून वितरणापर्यंत पाणी उचलण्यावर चारदा होणारा वीजेचा खर्च कमी करण्यासाठी कळंबा व बालिंगा फिल्टर हाऊस बंद करण्याचा प्रस्ताव महापालिकेने दिला आहे. त्यामुळे वार्षिक दहा कोटीचे वीज बिल बचत होणार आहे. याला पर्याय म्हणून पुईखडी येथे ८० एमएलडीचा नवीन फिल्टर हाऊस बांधण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या तांत्रिक समितीकडे देण्यात आला आहे.

महिला हॉस्पिटलबाबत ऐतिहासिक निर्णय घेणार

$
0
0
कृष्णा पाटबंधारे विभागाच्या ११८ एकर जागेत मेडिकल कॉलेज आणि महिला ग्रामीण हॉस्पिटल एकत्रपणे उभारण्यासाठी दोन दिवसांत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाणार असून, हा एक ऐतिहासिक निर्णय ठरेल, असा विश्वास पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

आयटीआय प्रवेशाचा पुन्हा गोंधळ

$
0
0
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या तांत्रिक अडचणीमुळे प्रवेशाची पहिली फेरी शुक्रवारी झाली नाही. विद्यार्थ्यांना निवड प्रवेश पत्र उपलब्ध न झाल्याने अधिक गोंधळ उडाला. अखेर संस्थेने शुक्रवारीऐवजी शनिवारी (दि. २०) प्रवेश होणार असल्याचे जाहीर केले. विद्यार्थ्यांची मात्र दिवसभर तारांबळ उडाली.

संकटाचा मुकाबला करण्याचे सामर्थ्य दे!

$
0
0
'बा विठ्ठला! राज्य प्रगतिपथावर जाऊ दे. राज्यातील जनतेला सुख, शांती, समाधानाचे दिवस येऊ दे. राज्यावर येणाऱ्या संकटाचा मुकाबला करण्याचे सामर्थ्य दे,' अशी प्रार्थना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठ्ठलचरणी केली. गेल्या वर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती असताना विठ्ठलाला चांगला पाऊस होऊ दे, असे साकडे घातले होते, ते विठ्ठलाने ऐकले. या वर्षी सर्वत्र चांगला पाऊस सुरू झाला आहे. यासाठी विठ्ठलाचे आभार मानल्याची भावना चव्हाण यांनी व्यक्त केली.

हद्दवाढीचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे

$
0
0
शहरालगतची १७ गावे व दोन एमआयडीसींचा समावेश असलेला शहर हद्दवाढीचा प्रस्ताव कोल्हापूर महापालिकेने राज्य सरकारला पाठवला आहे. पंधरा दिवसांपूर्वी प्रस्ताव पाठवला असून नगरसविकास खात्याकडून हिरवा कंदील मिळण्याच्या प्रतिक्षा महापालिकेला आहे.

'थंडगार' ढगांचे तांडव

$
0
0
विदर्भाच्या दक्षिण भागात पावसाने हाहाकार उडवला असताना उपराजधानीतही पावसाचा पिच्छा कायम आहे. शुक्रवारी सायंकाळी ५.३० च्या दरम्यान थंडगार ढगांद्वारे जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत शहरात धो-धो पाऊस कायम होता. रात्री ८.३० पर्यंत अवघ्या तीन तासांत .... मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मनसेचा मोर्चा

$
0
0
जत तालुका कायम दुष्काळी जाहीर करावा, खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, जत तालुक्याचे विभाजन करून दोन स्वतंत्र तालुके करावेत, अशा मागण्या करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढला.

पत्नीच्या जबाबाने पती निरूत्तर

$
0
0
आटपाडी तालुक्यातील करगणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आपल्या पत्नीचे अपहरण झाल्याच्या तक्रार करणाऱ्या पतीराजाला खुद्द पत्नीच्या जबाबानेच निरूत्तर केले. पण आपल्या पत्नीला लिहिता वाचता येत नसल्याने ती सुखरूप आपल्या ताब्यात मिळेपर्यंत करगणीच्या सरपंचपदाची निवड स्थगिती करावी, अशी मागणी दुर्योधन नारायण पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

स्केटिंगमध्ये वाद विवाद, पत्रकबाजी

$
0
0
खेळ आणि राजकारण, खेळ आणि वाद यापासून स्केटिंगही वेगळे राहिले नाही. स्केटिंगमध्ये शालेय मुलांची संख्या मोठी. शहर आणि परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये तर स्केटिंगची मोठी आवड. मुलांच्या आवडीला प्राधान्य देत पालक मंडळी स्केटिंगचा हट्ट पुरवितात. आवश्यक ती साधने उपलब्ध करतात. पालक आणि पाल्यांची नेमकी हीच मानसिकता हेरून शहर आणि परिसरात स्केटिंग अकॅडमी वाढल्या आहेत.

१५ बंधारे पाण्याखाली, नऊ मार्ग बंद

$
0
0
गेल्या चार दिवसांपासून उघडझाप असलेल्या पावसाने शुक्रवारपासून दमदार हजेरी लावली. दुपारनंतर सुरू झालेल्या संततधार पावसाने नागरिकांची तारांबळ उडविल्याने जनजीवन विस्कळीत झाले. ठिकठिकाणच्या रस्त्यांवर पाणी साठल्याने वाहनधारकांना त्यातूनच मार्ग काढावा लागला.

टोल वसुलीसाठी 'आयआरबी' हायकोर्टात

$
0
0
टोलविरोधी कृती समितीचे तीव्र आंदोलन आणि जिल्हा पोलिस अधिक्षकांनी टोलला बंदोबस्त पुरविण्यात दाखविलेली असमर्थता या पार्श्वभूमीवर शांततेत टोलवसुली करण्यासाठी पोलिस संरक्षण मिळावे, यासाठी आयआरबी कंपनीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यामध्ये राज्याच्या पोलिस महासंचालकांसह जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस अधीक्षक यांना वादी बनविण्यात आले आहे.

चंद्रभागेच्या तीरी भक्तीच्या सरी

$
0
0
गेल्या वर्षी ओढ दिलेल्या पावसाच्या सरी राज्यभरात यंदा चांगल्याच बरसल्याने दिलासा मिळालेल्या भाविकांनी आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी अलोट गर्दीत हजेरी लावली. यंदा आषाढीच्या यात्रेसाठी भाविकांची विक्रमी गर्दी जमली. विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येत पंढरपूरला जमलेल्या वारकऱ्यांमुळे चंद्रभागेच्या वाळवंटात भक्तिरसाच्या सरी बरसल्या.

ट्रकने फरफटत नेल्याने वकिलाचा मृत्यू

$
0
0
पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने स्कूटरला शंभर फूट फरफटत नेल्याने झालेल्या अपघातात वकील दिलीप अण्णासाहेब बहिरशेठ (वय ५५, रा. दामिनी हॉटेलनजीक, ताराबाई पार्क) हे गंभीर जखमी झाले.

‘ठिबक सिंचनच भविष्याचा आधार’

$
0
0
‘ऊस शेतीत ठिबक सिंचन महत्त्वाचे आहे. ठिबकमुळे फक्त पाण्याची बचत होते असे नाही, तर उसाच्या उत्पन्नातही वाढ होते. अशा प्रकारे शेती केली तरच ऊस शेती आणि साखर कारखानदारीही टिकेल’ असे प्रतिपादन आमदार सा. रे. पाटील यांनी केले.

पूरस्थितीत खबरदारी घ्या

$
0
0
संभाव्य पूर परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने योग्य तयारी केल्याबद्दल गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी समाधान व्यक्त केले. पूर ओसरू लागल्यानंतर आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाने उपायोजना कराव्यात असा आदेश पाटील यांनी दिला.

दिवसभर संततधार

$
0
0
शनिवारी दिवसभर सुरू राहिलेल्या संततधार पावसाने शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्था कोलमडली. उमा टॉकीज चौक, फोर्ड कॉर्नर परिसरात वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली.

उजळाईवाडीत सात ठिकाणी चो-या

$
0
0
उजळाईडीवाडी (ता. करवीर) येथील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील स्ट्राँगरुम व पोस्ट ऑफिसमध्ये चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र, सीसीटीव्ही असल्याचे दिसून आल्याने बँकेतील स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडल्यानंतरही चोरटे माघारी फिरले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images