Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

उन्हाळ्याचा ताप वाढला

$
0
0
डोके भणभणून टाकणारे कडक ऊन, पूर्ण बंद झालेला वारा यामुळे बसणारे चटके कमी की काय म्हणून ‘महावितरण’ने जवळपास पाच तास वीजपुरवठा बंद करून शहरवासीयांना भाजून काढले. दुपारी ३ वाजेपर्यंत ही परिस्थिती कायम होती. सर्वच कार्यालयांतील वीजपुरवठा बंद राहिल्यामुळे या वेळेत कामकाज अघोषित बंदच राहिले.

सांगलीत गारांचा मारा सुरूच

$
0
0
सांगली आणि परिसराला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा तडाखा आणि गारांचा मारा सुरूच आहे. मंगळवारी दुपारी कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, विटा, मिरजसह अन्य भागांत जोरदार पाऊस झाला.

भाजपबरोबर मतभेद आहेतच

$
0
0
‘आपल्याबरोबर दलित समाज मोठ्या प्रमाणात महायुतीसोबत आला असल्यानेच गृहमंत्री आर. आर. पाटील आपल्यावर काहीही आरोप करीत आहेत. आपल्यावर आरोप करण्यासाठी ठोस मुद्दाच त्यांच्याकडे नाही. भाजपाबरोबर आमचे वैचारिक मतभेद आहेतच. मात्र, काही समान मुद्यांवर आम्ही एकत्र आलो आहोत. हेडगेवारांच्यासमोर माथा टेकण्याचा प्रश्नच येत नाही,’ असा टोला आरपीआयचे नेते खासदार रामदास आठवले यांनी सांगलीत लगावला.

कर्मचारी सोसायटीला दोन कोटींचा नफा

$
0
0
कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीस २०१३-१४ या आर्थिक वर्षात दोन कोटी २८ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. सलग तीन वर्षे सभासदांना १२ टक्के लाभांश दिला असून, संस्थेने कायम व वर्गणी ठेवीवर १० टक्के व्याज दिले आहे.

इचलकरंजी पाणीप्रश्न पेटणार

$
0
0
इचलकरंजी शहराला पाणी टंचाईने ग्रासले असून पालिकेचे पदाधिकारी केवळ बैठका घेऊन स्टंटबाजी करीत असल्याचे आज पुन्हा दिसून आले. दरम्यान, पंचगंगा नदीच्या पाण्याची उचल करण्यास पालिका प्रशासन तयार नसल्याने दोघांच्यातील मतभेदामुळे शहरवासियांना संपूर्ण उन्हाळा पाण्याचा मुकाबला करावा लागणार आहे.

भोंदूगिरी करणारा गजाआड

$
0
0
मुलगा होणार म्हणून औषध देऊन भोंदूगिरी करणाऱ्या शंकर दत्तात्रय उर्फ एस.डी. कुंभार (वय ६२, रा. साळोखेनगर पाण्याची टाकीजवळ) याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली.

घरफाळाप्रश्नी नव्या मिळकती रडारवर

$
0
0
गेल्या आर्थिक वर्षात टार्गेटपेक्षा झालेली कमी वसुली आणि हजारो मिळकती घरफाळाविना असल्याने या दोन्ही बाबी या वर्षात निकालात काढण्यासाठी घरफाळा विभागाने विशेष कॅम्पचे आयोजन केले आहे.

खंडपीठप्रश्नाची तड लावण्यासाठी रिंगणात

$
0
0
कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची निवडणूक आज (ता. ३०) होत आहे. १५ जागांसाठी जिल्ह्यातील १६५० वकील मतदान करणार असून विद्यमान अध्यक्ष शिवाजीराव राणे पॅनेल व माजी अध्यक्ष व्ही. एन. घाटगे पॅनेलमध्ये निवडणूक होत आहे.

दंगलीतील मुख्य सूत्रधाराला अटक करा

$
0
0
कोथळी येथील दगडफेक व हाणामारीच्या घटनेनंतर दलितांवर दरोड्याचे खोटे गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणाची पोलिसांनी निपक्षपातीपणे चौकशी करून निरपराधांवर कारवाई होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

पदवीधर मतदारयादीतही घोळ

$
0
0
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतदारयादीत अनेक ठिकाणी घोळ झाले आहेत. त्यामध्ये इचलकरंजी शहराचाही समावेश आहे. या संदर्भात आयोग व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार व जनता दलाचे प्रदेश अध्यक्ष, माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी यांनी दिली.

भुदरगडमध्ये भातक्षेत्र वाढणार

$
0
0
वळीव पावसानंतर भुदरगड तालुक्यात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना जोर आला आहे. तालुक्यात ऊस मुख्य पीक असले तरी त्याला मिळत असलेला अनियमित दर तसेच खते आणि ऊसदर यांचा न बसणारा मेळ यामुळे तालुक्यात यंदा किमान दोन हजार हेक्टर भात क्षेत्र वाढून सुमारे पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड अपेक्षित आहे.

रखडलेल्या प्रकल्पांना ग्रीन सिग्नल

$
0
0
टेंडर प्रक्रियेनंतरची जागेबाबतची प्रशासकीय कार्यवाही पूर्ण झालेल्या महापालिकेच्या तीन प्रकल्पांना आता उभारणीच्या कामकाजाची प्रतिक्षा आहे. आचारसंहिता शिथिल झाल्यास कचऱ्यातून वीजनिर्मिती, स्लॉटर हाऊस (कत्तलखाना), कचऱ्यासाठीची लँडफिल साईट उभारणीचा प्रारंभ मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल.

लिंगायत समाजाने कर्मकांडांतून बाहेर पडावे

$
0
0
अजूनही लिंगायत समाज होम हवन, कर्मकांडातून बाहेर पडला नाही आणि सभा समारंभातून राजर्षी शाहू महाराजांचे नाव घेणारे मुलांच्या लग्नात भटजीला बोलावतात, हे कसल्या मानसिकतेचे द्योतक आहे ?’ असा सवाल इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी उपस्थित केला.

व्हॉइस मॉड्युलेशन, फॅशन डिझायनिंगची संधी

$
0
0
महाराष्ट्र टाइम्सतर्फे फॅशन डिझायनिंग व व्हॉइस मॉड्युलेशन या व्यावसायिक कोर्सेससंदर्भातील माहितीसह करिअरसंधीविषयी माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवारचा दिवस रंकाळ्यासाठी

$
0
0
रंकाळ्याच्या स्वच्छतेसाठी आखलेल्या मोहिमेनुसार येत्या शनिवारी (ता. ३) ‘एक दिवस रंकाळ्यासाठी’ या स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. शहर अभियंता, आरोग्याधिकारी, जलअभियंता व अतिक्रमण विभागप्रमुखांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे कर्मचारी सहभागी होणार आहेत.

नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत सीबीएस

$
0
0
कोल्हापूर बसस्थानकाचा लूक बदलण्याचे काम संथ गतीने सुरु आहे. भर उन्हाळ्यातही स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. तर आरामदायी बैठक व्यवस्थेच्या कामाचा मुहूर्त नाही. मध्यवर्ती बसस्थानकात विकासकामाचेही स्पीड लॉक झाल्याने आणखी काही महिने प्रवाशांना वेटिंगवरच रहावे लागणार आहे.

कमळकर मारहाणीची चौकशी

$
0
0
शाहूवाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर यांना जिल्हा परिषदेच्या आवारात झालेल्या मारहाण प्रकरणाची चौकशी शिक्षणाधिकारी स्मिता गौड यांनी सुरू केली आहे. कमळकर यांनी ज्या सहा शिक्षकांविरुद्ध तक्रारी केल्या आहेत, त्यांची आणि कमळकर यांचीही चौकशीदरम्यान बाजू ऐकून घेतली जाणार आहे.

‘संभाजीनगर’चे विस्तारीकरण कधी?

$
0
0
संभाजीनगर बसस्थानकाचे विस्तारीकरण आणि विकास झाल्यास शहरातील वाहतुकीच्या कोंडीसह सीबीएसवरील ताणही कमी होणार आहे. सध्या रंकाळा आणि सीबीएस आगारातून ऑपरेट होणाऱ्या सर्व एसटी बसेस संभाजीनगर आगारातून धावतील.

शेतकऱ्यांची याचिका फेटाळली!

$
0
0
कर्जमाफीसाठी पात्र असतानाही अपात्र ठरवल्याचा दावा करणारी शेतकऱ्यांची याचिका मुंबई हायकोर्टाने मंगळवारी फेटाळली. त्यामुळे जिल्ह्यातील ४३ हजार अपात्र कर्जदार शेतकऱ्यांकडून ११२ कोटी रुपये जिल्हा बँक वसूल करणार हे स्पष्ट झाले आहे.

युवा शिल्पकारांनी साकारले शिवशिल्प

$
0
0
चित्रकार व शिल्पकरांचा वारसा लाभलेल्या कोल्हापूरची कलानगरी अशी सर्वदूर ओळख आहे. चित्रकारांच्या कुंचल्यातून साकारलेल्या अनेक कलाकृती सातासमुद्रापार पोहचल्या आहेत. यामध्ये आता शिल्पकारांचीही भर पडत आहेत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images